मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|जनांस शिक्षा| ५६७१ ते ५६८० जनांस शिक्षा ५५२३ ते ५५३० ५५३१ ते ५५४० ५५४१ ते ५५५० ५५५१ ते ५५६० ५५६१ ते ५५७० ५५७१ ते ५५८० ५५८१ ते ५५९० ५५९१ ते ५६०० ५६०१ ते ५६१० ५६११ ते ५६२० ५६२१ ते ५६३० ५६३१ ते ५६४० ५६४१ ते ५६५० ५६५१ ते ५६६० ५६६१ ते ५६७० ५६७१ ते ५६८० ५६८१ ते ५६९० ५६९१ ते ५७०० ५७०१ ते ५७१० ५७११ ते ५७२० ५७२१ ते ५७३० ५७३१ ते ५७४० ५७४१ ते ५७५० ५७५१ ते ५७६० ५७६१ ते ५७७० ५७७१ ते ५७८० ५७८१ ते ५७९० ५७९१ ते ५८०० ५८०१ ते ५८१० ५८११ ते ५८२० ५८२१ ते ५८३० ५८३१ ते ५८४० ५८४१ ते ५८५० ५८५१ ते ५८६० ५८६१ ते ५८७० ५८७१ ते ५८८० ५८८१ ते ५८९० ५८९१ ते ५९०० ५९०१ ते ५९१० ५९११ ते ५९२० ५९२१ ते ५९३० ५९३१ ते ५९४० ५९४१ ते ५९५० ५९५१ ते ५९६२ जनांस शिक्षा अभंग - ५६७१ ते ५६८० तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा. Tags : abhangmarathisanttukaramअभंगतुक्राराममराठीसंत जनांस शिक्षा अभंग - ५६७१ ते ५६८० Translation - भाषांतर ॥५६७१॥संतां नाहीं मान । देव मानी मुसलमान ॥१॥ऐसे पोटाचे मारिले । देवा आशा विटंबिलें ॥२॥घाली लोटांगण । वंदी नीचाचे चरण ॥३॥तुका ह्मणे धर्म । न कळे माजल्याचा भ्रम ॥४॥॥५६७२॥भुंकुनियां सुनें लागे हस्तीपाटी । होऊनि हिंपुटी दु:ख पावे ॥१॥काय त्या मशकें तयाचें करावें । आपुल्या स्वभावें पीडतसे ॥२॥मातलें बोकड विटवी पंचानना । घेतलें मरणा धरणें तें ॥३॥तुका ह्मणे संतां पीडितील खळ । घेती तोंड काळें करुनियां ॥४॥॥५६७३॥निंबाचिया झाडा साकरेचें आळें । आपली तीं फळें न संडीच ॥१॥तैसें अधमाचें अमंगळ चित्त । वमन तें हित करुन सांडी ॥२॥परिसाचे अंगीं लाविलें खापर । पालट अंतर नेघे त्याचें ॥३॥तुका ह्मणे वेळू चंदना संगतीं । काय ते नसती जवळिकें ॥४॥॥५६७४॥माकडा दिसती कंवटी नारळा । भोक्ता निराळा वरील सारी ॥१॥एक रस एका तोंडीं पडे माती । आपुलाले नेती विभाग ते ॥२॥सुनियांसी क्षीर वाढिल्या ओकवी । भोगित्यां पोसवी धणीवरी ॥३॥तुका ह्मणे भार वागविती मुर्ख । नेतील तें सार परीक्षक ॥४॥॥५६७५॥किती चौघाचारें । येथें गोविलीं वेव्हारें ॥१॥असे बांधविले गळे । होऊं न सकती निराळे ॥२॥आपलें आपण । केलें कां नाहीं जतन ॥३॥तुका ह्मणे खंडदंडें । येरझारीं लपती लंडें ॥४॥॥५६७६॥जाणिवेच्या भारें चेंपला उर । सदा बुरबुर सरेचिना ॥१॥किती याचें ऐकों कानीं । मारिलें घाणीं नाळकरी ॥२॥मिठेंविण आळणी बोल । कोरडी फोल घसघस ॥३॥तुका ह्मणे डेंगा न कळे हित । किती फजित करुं तरी ॥४॥॥५६७७॥ऐसें ठावें नाहीं मुढा । सोस काकुलती पुढां ॥१॥माझीं नका जाळूं भांडीं । पोटीं भय सोस तोंडीं ॥२॥पातलिया काळ । तेव्हां काय चाले बळ ॥३॥संचित ते करी । नरका जाया मेल्यावरी ॥४॥परउपकार । न घडावा हा विचार ॥५॥तुका ह्मणे लांसी । आतां भेटों नये ऐसी ॥६॥॥५६७८॥नाहीं देवाचा विश्वास । करी संतांचा उपहास ॥१॥त्याचे तोंडीं पडे माती । हीन शूकराची जाती ॥२॥घोकुन अक्षर वाद छळणा करीत फिरे ॥३॥ह्मणे देवांसी पाषाण । तुका ह्मणे भावहीन ॥४॥॥५६७९॥अभक्ताचे गांवीं साधु ह्मणजे काय । व्याघ्रवाडां गाय सांपडली ॥१॥कसाबाचे आळी मांडिलें प्रमाण । बस्वणाची आण तया कायी ॥२॥केळी आणि बोरी वसती सेजारी । संवाद कोणे परी घडे येथें ॥३॥तुका ह्मणे खीर केली कार्हेळ्याची । शुद्ध गोडी कैची वसे तेथें ॥४॥॥५६८०॥अंगा भरला ताठा । नये वळणी जैसा खुंटा ॥१॥कैसें न कळे त्या डेंगा । हित आदळलें अंगा ॥२॥जीव जाते वेळे । भरे लकडा ताठी डोळे ॥३॥मुसळाचें धनु । तुका ह्मणे नव्हे अनु ॥४॥ N/A References : N/A Last Updated : April 04, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP