मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|वेदान्त काव्यलहरी|
पाळणा

वेदांत काव्यलहरी - पाळणा

सदर ग्रंथाची किंमत होती - जो जी देईल ती.
सदर पुस्तकाबद्दल दैनिक सकाळ २६/०६/१९३८ चे अंकात अभिप्राय छापून आलेला आहे.


चाल --- (राजस बाळा.)

निज गुरुनाथा । हालवितो मी पालख ताता ॥धृ०॥
चाल --- गुरुदेवा । श्रम तुज झाले ।
गति, स्थिती, लय जगताचा करिता ॥१॥
जा आतां । सुखशेजेला ।
दत्तशिशू । विनवी गुरुमाता ॥२॥
==
ईश्वरी अगाध लीला

पाळणा --- चाल (झिम्मा खेळू या)

निज निज रे बा धनशाम । तुजला हालविते सुखधाम ।
जगताचा हा करुनि पसारा । शिणला आत्माराम, ॥धृ०॥
तूं शशि रविदीपा उजळी । भूमी उदकीं कशि धरिली ।
खांबावांचुनि नील नभाचा । मंडप मोठा घालीग ॥१॥
बाइग छिद्रें किति देहांत । ठरवी जीवनवायू त्यांत ।
करणी याची अगाध बाई । निज निज दीनानाथ ग ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : April 21, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP