मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|वेदान्त काव्यलहरी|
आत्मभजन

वेदांत काव्यलहरी - आत्मभजन

सदर ग्रंथाची किंमत होती - जो जी देईल ती.
सदर पुस्तकाबद्दल दैनिक सकाळ २६/०६/१९३८ चे अंकात अभिप्राय छापून आलेला आहे.


पद चाल --- [नियम पाळावे]

चालवी सकला । त्या भजे आत्मरामाला ॥ध्रु०॥
चाल :--- सकलेंद्रिय जो ह्रदयीं राहुनी । चेष्टवितो अविरत दिनरजनी ।
ऐशा दीन दयाळा सोडुनी । भजशि कोणाला ॥१॥
भूत प्रेतवेताळ देवता । दगड धातु मूर्तीस पूजितां ।
सांग तुला रे लाभ कोणता । आजवरि झाला ॥२॥
श्वाशि कुणाचें गाशि कुणाला । प्रभूद्रोह हा नच कां झाला ।
देह जयाचे सत्तें जगला । त्यास विस्मरला ॥३॥
शुभाशुभादिक कर्में जितुकीं । आचरशी स्वाभाविक तितुर्की ॥
ह्रदयस्थाला अर्पुनि टाकी । सोडुनि “मी” ला ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 17, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP