वेदान्त काव्यलहरी - एकादशीचें पंढरींतलें चित्र
सदर ग्रंथाची किंमत होती - जो जी देईल ती.
सदर पुस्तकाबद्दल दैनिक सकाळ २६/०६/१९३८ चे अंकात अभिप्राय छापून आलेला आहे.
ज्यासी नावडे एकादशी । तो जिताचि नरकवासी ॥१॥
ज्यासी नाहीं एकादशीव्रत । जाणा तो नर आहे प्रेत ॥२॥
एकादशीं अन्नपान । श्वानविष्टेंचें समान ॥३॥
अशुद्ध विटाळशीचा खळ । विडा भक्षिता तांबूल ॥४॥
करी कामिनीचा संग । तया जोडे क्षयरोग ॥५॥
ऐसें व्रताचें महिमान । तुका सांगे आक्रंदून ॥६॥
परी पुरीं जगन्नाथ । एकादशीं खाती भात ॥७॥
एकादशीव्रत । महाधोर पाप तेथ ॥८॥
तिथें एकादशी आली । देवे खाडयांत घातली ॥९॥
तिथें तिचा गर्व खालीं । अन्नसंतर्पणें धाली ॥१०॥
विडे तांबूल भक्षितां । तिथें नाहीं कांहीं चिंता ॥११॥
राधाकृष्ण रतिभोग । एकादिशी दिनीं सांग ॥१२॥
दिसे राउळीं प्रत्यक्ष । पाहतां पदरीं पडे मोक्ष ॥१३॥
म्हणती आहे कृष्णलीला । नेत्रपारणें फेडिला ॥१४॥
दोहिकडे कृष्ण देव । मग कां हो ऐसा भाव ॥१५॥
मग खरी कीं पंढरी । किंवा जगन्नाथ पुरी ॥१६॥
हें तो तुकयानें जाणीलें । गुरूकृपें ज्ञान झालें ॥१७॥
परि मूर्खाचा अभिमान । जाइना जों आहे प्राण ॥१८॥
N/A
References : N/A
Last Updated : April 21, 2014
TOP