मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|वेदान्त काव्यलहरी|
योगी सिद्धपुरुषाची व्याख्या

वेदांत काव्यलहरी - योगी सिद्धपुरुषाची व्याख्या

सदर ग्रंथाची किंमत होती - जो जी देईल ती.
सदर पुस्तकाबद्दल दैनिक सकाळ २६/०६/१९३८ चे अंकात अभिप्राय छापून आलेला आहे.


अष्टांगयोग साधुनि अणिमादिक साधिलें तरी सिद्ध ॥
ऐसेचि नव्हे केवळ, सिद्ध तया म्हणति पूर्ण जो शुद्ध ॥१॥
सिद्धपुरुष म्हणजे, जो अपुल्या कामांत पावतो सिद्धी ॥
अवघड इतरांना जें, त्यांतचि जो चालवी सहज बुद्धी ॥२॥
सर्व बरोबर जुळलें, तेथेंचि पूर्ण योग समजावा ॥
ये ज्यास जुळवितां, तो योगी; त्यासीच सिद्ध जाणावा ॥३॥
मिरची, मीठ, मसाला यांचा जुळवोनि योग जी करिते ॥
सर्वांग पाकसिद्धि सुंदर, ती योगिनी म्हणो येते ॥४॥
जरि कायद्यांत असला पूर्ण, समज तोच कायदेसिद्ध ॥
जाणे वनस्पतीच्या गुणधर्मा, तोच औषधीसिद्ध ॥५॥
शोधिल यंत्र कुणी जो, म्हणता ये त्यांस त्यांतला सिद्ध ॥
वाकबगार असे जरि जोड शिवणार, पायतणसिद्ध ॥६॥
कुणिच नसे या जगतीं, म्हणतां येईल ज्या सकलसिद्ध ॥
एकांत सिद्ध तो नर, दुसर्‍या कामांत होई हतबुद्ध ॥७॥
यास्तव कोण असो, मग त्यासी धरितां नये अहंकार ॥
मी एक सिद्धयोगी, न शिवो ऐसा कुणा न कुविचार ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : April 16, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP