वेदांत काव्यलहरी - चार मतें
सदर ग्रंथाची किंमत होती - जो जी देईल ती.
सदर पुस्तकाबद्दल दैनिक सकाळ २६/०६/१९३८ चे अंकात अभिप्राय छापून आलेला आहे.
आपण दास प्रभूचे ईश्वरचि श्रेष्ठ यापरी द्वैत ॥
मध्वाचार्यपथाचें जीवेश्वरविषयि हेंच स्पष्ट मत ॥१॥
ईश्वर अंशी त्याचा जीव असे अंश यापरी सत्य ॥
रामानुजपंथाचें हेंच असें कीं विशिष्ट अद्वैत ॥२॥
ब्रम्हच हें जग नटलें, सत्चित्-आनंदरूप हें त्याचें ॥
सद्रूपें जड, सत् चित् दोन पदें रूप स्पष्ट जीवाचें ॥३॥
श्रीकृष्ण परि असे हा सत्-चित्-आनंद तीन पदयुक्त ॥
भजनीय म्हणुनि तोची, हा वल्लभपंथ शुद्ध अद्वैत ॥४॥
कमिअधिक ईश्वराचा भाव असे वल्लभीय पंथांत ॥
सर्वच ब्रम्ह असे हें, शांकरमत तेंच केवलाद्वैत ॥५॥
वाचारंभण केवल, भेद दिसे तोच औपचारीक ॥
घट मृत्तिकाच केवल, घटनामें प्रतित शब्दची एक ॥६॥
जग मिथ्या, ब्रम्ह असे एकचि तें सत्य, जीव शीव भेद ॥
नाहींच कधीं, त्यांचें ऐक्य सदा फोल इतर ते वाद ॥७॥
N/A
References : N/A
Last Updated : April 16, 2014
TOP