मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|वेदान्त काव्यलहरी|
आरत्या

वेदांत काव्यलहरी - आरत्या

सदर ग्रंथाची किंमत होती - जो जी देईल ती.
सदर पुस्तकाबद्दल दैनिक सकाळ २६/०६/१९३८ चे अंकात अभिप्राय छापून आलेला आहे.


आरती चाल ----(आरती भुवन सुंदराची)
आरती सिद्धराम प्रभुची ॥ सच्चिदानंद सद्ररूची ॥
स्वरूपा वर्णन करिताची ॥ वाचा बंद पडे श्रुतिची ॥
चाल :--- प्रकाशा जो सकला देई ॥ त्यास शशिसूर्य,॥
प्रकाशूं जाय; घडे हे काय, साधनांची ॥
रीघ मग होय तेथ कैची ॥१॥
बहुत साधनें न ये हाता ॥ तोच दे भेट शरणभक्ता ।
टाकिता मी आणिक ममता ॥ आयता प्राप्त गुरुदाता ॥
चाल :--- म्हणोनी अहंकार गळतां ॥ धुंडणे त्यास,
नको सायास, अंतरी वास, भेट त्याची,
नित्य दत्तात्रय घे साची ॥२॥

आरती
चाल --- [स्वकुल तारक सुना]
ओवाळूं आरती । प्रीती ॥धृ०॥
चाल :--- पूर्ण परात्पर पुराणपुरुषा । चंद्रर्सूज्योतीची दीप्ती ॥१॥
सच्चितसुखघन पूर्ण विरामा । गुरुमुर्ती तूं मम निजशांती ॥२॥
निखिल निरंजन ज्ञानमात्र तूं । मी तरि केवल तुझीच स्फूर्ती ॥३॥
सिद्धरामप्रभु दिगंत -- कीर्ती । दत्त गातसे तव दिनराती ॥४॥
ध्रुवपद बदलून -- शेजारती :--- करितो शेजारती । प्रीती ॥
निज निज आता सद्नुरुमूर्ती ॥धृ०॥
ध्रुवपद बदलून -- पाळणा :--- पालख तव हलविती । प्रीती ॥
ध्रुवपद बदलून -- काकडरती :--- ओवाळू कांकडा । ज्योती ॥
ऊठ दर्शना देइ प्रभाती ॥धृ०॥


References : N/A
Last Updated : April 21, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP