मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|वेदान्त काव्यलहरी|
आत्मप्रकाश

वेदांत काव्यलहरी - आत्मप्रकाश

सदर ग्रंथाची किंमत होती - जो जी देईल ती.
सदर पुस्तकाबद्दल दैनिक सकाळ २६/०६/१९३८ चे अंकात अभिप्राय छापून आलेला आहे.


सांगे घडयाळ बधुनी काय दिसे स्पष्ट प्रथम द्दष्टीसी ॥
कांटे दोन निदर्शक वेळाचे, आणि आंकडे म्हणसी ॥१॥
ताकोनि स्थूल द्दष्टी, कांटे अकडयाहुनी अती स्पष्ट ॥
व्यापक, स्वच्छ दिसेना काय प्रथम कांच, पाहि रे नीट ॥२॥
हो ! हो ! कांच दिसे मज प्रथम, तयामागुनी दिसति कांटे ॥
अगदींच कसा चुकलों, ही द्दष्टी स्थूल, फसवि मज वाटे ॥३॥
चुकलास पुन्हां निरखी कांचेवरि त्याहुनी अती स्वच्छ ॥
व्यापक प्रकाश उघडा सूर्याचा, कां दिसे न अगदीच ॥४॥
प्रथम प्रकाश दिसतो, तदनंतर कांच, मागुती कांटे ॥
नंतर अकडे दिसती, स्पष्ट अनुक्रम असाच ना वाटे ? ॥५॥
ही ही भूल असे रे, रवि प्रकाशावरी प्रकाश तुझा ॥
पडला व्यापक, उघडा, प्रथम अती स्वच्छ वळख रे राजा ॥६॥
जों जों व्यापक वस्तू, स्वच्छ अधिक, ती पडे न द्दष्टीस ॥
नियम असा साधारण, म्हणुनि विवेकेंच पाहणें त्यास ॥७॥
जरि कोटि सूर्य असले, एके कालींच तळपले वरती ।
तुझियाच प्रकाशानें येति प्रकाशास, तुजविणें न गती ॥८॥
रवि दीप प्रकाशापरि म्हणशिल जरि तूं प्रकाश रे अपुला ॥
फसशील; प्रकाशाचा अर्थ तुला पाहिजे प्रथम कळला ॥९॥
झांकोळिल्या पदार्था उघडे पाडोनि ज्ञान दे त्याचे ॥
हें कार्य प्रकाशाचें, रवि दीपादीक करिति हें साचे ॥१०॥
रवि दीप उघड करिती जड वस्तू, घेउनी तुझी सत्ता ॥
रवि दीपासहि करिशी उघड, तयासी प्रकाश धनदाता ॥११॥
रूपप्रकाशाचें तव ‘कळणें,’ तूं ज्ञानमात्र सर्वत्र ॥
व्यापुनि भरला जगतीं, सर्वांचा आदि अंत चिन्मात्र ॥१२॥
तूं नसतां मग कोठें, जड जंगम सूर्य आणि आकाश ॥
तुझिया कृपाकटाक्षें, आहे अस्तित्व जाण सर्वांस ॥१३॥
सूर्यास किरण जैसें, ज्ञान तसें किरण ज्ञानमात्राचें ॥
जागृत जगत प्रकाशे, ज्ञानप्रकाशांत सर्व जग नाचे ॥१४॥
स्वप्नांतही दिसें तुज, स्वप्नजगत याच ज्ञानकिरणानें ॥
जागृत जग लोंपोनी, दुसरें जग दाविलें प्रकाशानें ॥१५॥
द्दष्टांत सिनेमाचा, जग बाहेरील गडप अंधारें ॥
झोत प्रकाशाचा ये पड द्यावरि, द्दश्य त्यांत जग दुसरें ॥१६॥
सूप्तीत ज्ञान किरणें, केवलज्ञानांत येति परतोनी ॥
याकारण जगत नसे गाढ सुषुर्प्तीत ज्ञप्तिवांचोनी ॥१७॥
जग आणि ज्ञान जागरि, स्वप्नी तें ज्ञान आणि जगभास; ॥
सूप्तींत तूंच केवल, जागृति नी स्वप्न पावती नाश ॥१८॥

N/A

References : N/A
Last Updated : April 16, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP