वेदांत काव्यलहरी - शरीरही आपलें नाहीं
सदर ग्रंथाची किंमत होती - जो जी देईल ती.
सदर पुस्तकाबद्दल दैनिक सकाळ २६/०६/१९३८ चे अंकात अभिप्राय छापून आलेला आहे.
पद चाल - (जावो जावो ए मेरे साधू)
नाहीं नाहीं शरीरहि हें अपुलें ॥ध्रु०॥
चाल :--- माझें म्हणशी शरीर, त्यावरि परकी सत्ता चाले ॥१॥
तात म्हणे मम पुत्र, बहिण मम बंधू ऐसी बोले ॥२॥
पत्नि म्हणे हे पति मम, त्यावरि सत्ता माझी चाले ॥३॥
सरकाराची सत्ता, चोरहि तोडी कैसें न कळे ॥४॥
देह तुझा मग किति रोगांनीं त्यांत बनविलें जाळें ॥५॥
डसती विंचू विखार आणिक ढेंकुण पिसवा मुंगळे ॥६॥
प्रधान शिरकमलीं ऊ नांदे घेउनि पोरें बाळें ॥७॥
कुणी घेतली तुझी संमती प्रकारास या सगळे ॥८॥
मी माझेपण फोल उमजुनी, आतां उघडी डोळे ॥९॥
N/A
References : N/A
Last Updated : April 17, 2014
TOP