मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|वेदान्त काव्यलहरी|
आत्मा कशासारखा आहे

वेदांत काव्यलहरी - आत्मा कशासारखा आहे

सदर ग्रंथाची किंमत होती - जो जी देईल ती.
सदर पुस्तकाबद्दल दैनिक सकाळ २६/०६/१९३८ चे अंकात अभिप्राय छापून आलेला आहे.


आत्मा कसा असे हा, अंबट कीं तुरट, गोड, कडु अथवा ॥
मृदु कठिण, अणू, मोठा, सुंदर भेसूर तो असे किंवा ॥१॥
आत्मा सुगंध अथवा दुर्गंधीनें असेच कीं भरला ॥
कर्कश अथवा मंजुळ, नाद कसा काय येतसे त्याला ॥२॥
सुखदु:खरूप आत्मा, किंवा त्याचा प्रकाश दीप जसा ॥
अथवा सूर्यप्रकाशासम तो, किंवा मुळीच नाहिं कसा ॥३॥
गोडास गोड न कळें, आत्मा म्हणुनीच गोड कडु नाहें ॥
मृदु, कठिण, अणू, मोठा असता, कळतें न तें; तसा नोहे ॥४॥
कर्कश, मंजुळ नोहे, सुख नोहे, दु:खगंधही नोहे ॥
तत्सम तो जरि असता, कळतें ना ते तयास कीं पाहे ॥५॥
रूप तयाचें असतें दीप रवी तेजसें; न ते कळतें ॥
कांहीं नसे; नव्हे तो ऐसाही, म्हणुनि शून्यही कळतें ॥६॥
त्यासीं कळे सकलही, न कळें कोणास तो स्वसंवेद्य ॥
कळणें मात्र असे तो, मौनेंची होय वेदप्रतिपाद्य ॥७॥
“नेती” शब्दानेंची, त्याचें अस्तित्व वेद करि सिद्ध ॥
कांहीं नसोन आहे हें त्याचें रूप जाणती बुद्ध ॥८॥
सीतास्वयंवरी बहु राजे, शब्दें तया निषेधून ॥
रामास पाहतांची, सीता मौनेंच हो अधोवदन ॥९॥
तैसेंच वेद वर्णी शब्दें सकळास, एक सोडून ॥
तो एक जाण आत्मा, पडले वेदास येथची मौन ॥१०॥
जें जें वदसीं तैशी माया, आत्मा नव्हे वदे तैसा ॥
निरुपम त्यासम तोची, तेथें आत्मा वदू अमुक कैसा ॥११॥
मौनेंच गुरु बोधी, मौनेंची शिष्य करितसे श्रवण ॥
ग्रंथीभेद तयाचा होई, संदेहरहित होऊन ॥१२॥

N/A

References : N/A
Last Updated : April 16, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP