मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड ६| अध्याय ३१ खंड ६ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ खंड ६ - अध्याय ३१ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत अध्याय ३१ Translation - भाषांतर ॥ श्रीगणेशाय नमः । शक्ती म्हणती आदिशक्तीप्रत । जगदंबिके आम्ही भाग्यवंत । म्हणोनि ऐकिलें माहात्म्य अद्भुत । मयूरक्षेत्राचें सिद्धिप्रद ॥१॥आतां देवेशि सांग आम्हांप्रत । मुद्गलें ज्यास उपदेशिलें ज्ञान पुनीत । ते शिवादि देव काय करित । कामासुरभयें संत्रस्त ॥२॥आदिशक्ति सांगे तयांसी । महाभाग मुद्गल जातां स्वगृहासी । योग्यांच्या गुरूस प्रणामासी । करून गेले देव तेव्हा ॥३॥मयूरक्षेत्रीं जाऊन । यात्रा करिती यथाशास्त्र विधान । सुरर्षि नंतर करिती भजन । सर्वही ते तपयुक्त ॥४॥एकाक्षरविधानें तोषविती । ते देव ऋषि विनायका भावभक्ति । तेव्हां त्यांसी वर देण्या प्रकटती । ढुंढिवेषें गजानन ॥५॥मयूरावरी आरूढ । पाहून विघ्नेश्वरासी प्रगूढ । देवर्षी करिती प्रणाम प्ररूढ । महाहर्षं चित्तांत ॥६॥परम भक्तीनें वंदून । विघ्नपा भावबळें पूजून । विष्णुमुख्य त्याचें करिती मनन । करांजली जोडूनियां ॥७॥मयूरेशासी सर्वसिद्धिप्रदासी । ज्ञानदात्यासी भक्तिपालासी । स्वानंदवासीसी परात्परतरासी। ढुंडिराजा तुज नमन असो ॥८॥सर्वांच्या मातापित्यासी । अनादीसी सर्वांस पूज्यासी । परमात्म्यासी अनंतरूपासी । अनंत आननधरा नमन तुला ॥९॥सिद्धिबुद्धि प्रदात्यासी । सिद्धिबुद्धिवरासी । ज्येष्ठराजासी ज्येष्ठांस वरदासी । त्रिनेत्रा तुज नमन असो ॥१०॥चतुर्भुजासी कंजपाणीसई । महोदरासी सर्पेंशवासीसी । मायाश्रयासी मायाचालकासी । विलासीसी तुज नमन असो ॥११॥ब्रह्माच्या ब्रह्मरूपासी । गणेशासी एकदंतासी । सर्वादि पूज्यासी सर्व मूर्तीसी । शूर्पकर्णा तुज नमन असो ॥१२॥योगासी शांतिदासी । पूर्वांगीं विष्णुरूपासी । दक्षिणांगीं शंकररूपासी । पश्चिमेस शक्तिदेहा नमन तुला ॥१३॥उत्तरेस भानुरूपासी । किती स्तुति करावी अशक्य आम्हांसी । वेद योगीही धरिती मौनासी । तेथ आमुचा काय पाड ? ॥१४॥चित्त पंचविध असत । देवदेवेशा भ्रमात्मिका माया वर्तत । चित्रा मयूरसंज्ञा ती ज्ञात । तिच्या स्वामे वंदन तुजला ॥१५॥माया मयूराख्याच्या असत । तेथ क्रीडाकर्ता तूं जगांत । म्हणोनि मयूरेशनामें प्रख्यात । साक्षात् दिससी निःसंशय ॥१६॥तुझ्या अंघ्रीचें झालें दर्शन । धन्य जन्म धन्य ज्ञान । धन्य तप विद्यार्जन । आम्हीं झालीं कृतकृत्य ॥१७॥ऐसी तयाची स्तुति करिती । प्रेमभरें ते नाचती । नयनांतून त्यांच्या वाह्ती । आनंदाश्रू त्या समयीं ॥१८॥शरीरीं रोमांच दाटले । मयूरेशाच्या नयनाकार कसे झाले । तेव्हां गननाथ त्यांस म्हणाले । भक्तितुष्ट परम प्रसन्न ॥१९॥देवेशांनो मी प्रसन्न । मागा आतां वरदान । जें जें मागाल तें तें देईन । स्तोत्रतुष्ट मीं तुम्हांसी ॥२०॥तुम्हीं रचिलेलें हें स्तोत्र । मज आवडलें पवित्र । सर्वसिद्धिप्रद सर्वत्र । होईल पाठका श्रोत्यासी ॥२१॥पाठका श्रोता जें जें इच्छित । तें तें सर्व त्यास लाभत । ऐसा वर हर्षयुक्त । देतसें मीं त्या नरासी ॥२२॥देवेशादि तेव्हां म्हणत । गणाध्यक्षा नमन तुजप्रत । प्रसन्न जरीं आम्हांवर सांप्रत । दृढ भक्ति तुझी सतत देई ॥२३॥कामासुराचा वध करावा । भयंकर जो असे सर्वां । स्थानभ्रष्ट केलें देवां । कर्मभ्रष्ट त्यानें मुनीश्वरांसी ॥२४॥म्हणून त्या असुराचें हनन । करी गजानता तूं बलसंपन्न । तथास्तु म्हणून अंतर्धान । पावले तेव्हां गणनाथ ॥२५॥देव हर्षयुक्त होऊन । परतले वरदान लाभून । गिरिगुहांत बसले लपून । गणेशाच्या भजनीं रत ॥२६॥मुनि देवनायक शक्तिसहित । योग्य काळाची वाट पहात । तदनंतर कामासुर सभेंत । एकदा बैसला होता तैं ॥२७॥आकाशवाणी तो ऐकत । भयदायक अत्यंत । कामासुरा ऐक वृत्तान्त । देवांनी प्रार्थिला मयूरेश्वर ॥२८॥तो ब्रह्म असे साक्षात । तुज ठार मारील निश्चित । त्यायोगें विश्व सुखयुक्त । करील विघ्नराजा तो ॥२९॥ही आकाशवाणी ऐकत । तैं तो असुर पडला मूर्च्छित । ती वाणी महाक्रूर अन्य दैत्यांप्रत । भयंकर ते सर्व आत्मे ॥३०॥महासुराजवळीं ते येती । महायत्नें त्यास सावध करिती । तैं तो कामासुर तयांप्रती । सांगे वृत्त आकाशवाणीचें ॥३१॥तें जाणून क्रोधपर । दैत्यवीर करिती विचार । देव आद्य शत्रू भयंकर । आमुचे ऐसें श्रुति सांगे ॥३२॥आम्हीं स्वामी आपणांसी । केलें होतें निवेदनासी । मारावें सर्व देवांसी । त्यांनी हें कृत्य दारुण केलें ॥३३॥तरी आतां चिंचा कां करिता । आपणा कैसी भयवार्ता । उत्पत्ति स्थिति संहारयुक्ता । अशक्य असे मारणें तुम्हां ॥३४॥महाभागा आम्हां आज्ञा द्यावी । देवहननाची संधि द्यावी । देव मरतां अनुभवावी । निःसपत्न अवस्था सदा ॥३५॥त्यांचेम ऐकून वचन । कामासुरें संमति देऊन । आज्ञापिलें करा देवकंदन । महा असुर तैं आनंदले ॥३६॥कुंभकर्णादि वीर जाती । गिरिकंदरीं काननीं शोधिती । मेरुगुहासंस्थ पाहती । देव ऋषिवृंदास तेव्हां ॥३७॥त्यास ठार मारण्या टाकित । शस्त्रें ते दैत्य जयोद्यत । शिव मुख्य़ देव तैं स्मरत । मयूरेशासी भयभीत ॥३८॥दयासिंधो यावें । आम्हां भयग्रस्तांस रक्षावें । त्यांनीं स्मरन करितां भक्तिभावें । धावला हेरंब मूषकध्वज ॥३९॥मयूरावर बैसून । शस्त्रधर प्रकटला प्रसन्न । तेजोराशिमय रूप तें पाहून । विस्मित देव स्तुति गाती ॥४०॥नाना स्तोत्रें ते म्हणती । गजानन तेजःपुंज त्यासी म्हणती । सुरर्षिजनहो मीं विकट जगतीं । भजा मजसी चिरकाल ॥४१॥कामयुक्त माया मयूरा । विविधात्मिका मीं रचिली रुचिरा । कामहीन मीं मज स्मरा । भजा तुम्हीं कामनाशार्थ ॥४२॥मायासुखें देवेशांनो व्हाल । विकट तरी मज प्रिय विमल । माझें रूप अति सबल । पाहण्या समर्य व्हाल तुम्हीं ॥४३॥त्याचें तें ऐकून वचन । सुरर्षि ते शोकमग्न । बलें चित्तनिरोध करून । निष्काम करिती आदरें ॥४४॥तेव्हां ते देव मुनि पाहत । गणेश्वरासी पुढयांत । त्यास प्रणास करून स्थित । दैत्यशस्त्रें विद्ध ते ॥४५॥अति क्रोधपर तैं विकट सांगत । भयहीन व्हा आतां चित्तांत । माझ्या दर्शनें संरक्षणयुक्त । मुक्त तुम्हीं सर्वही ॥४६॥माझा अनुग्रह तुम्हांवरी । शस्त्रें धेऊनियां करी । जावें तुम्हीं युद्धक्षेत्रीं । मी वधीन त्या कामासुरासी ॥४७॥हें आश्वासन लाभत । तेव्हां ते देवेंद्र शस्त्रयुक्त । दैत्यमुख्यांसवें लढत । तेजयुक्त विशेष ते ॥४८॥इंद्रे वज्राघात केला । तेव्हां कुंभकर्ण रणीं पडला । अन्य दैत्यसंघ भयभीत झाला । पळ काढिला तयानें ॥४९॥तो कुंभकर्ण राक्षसेश लाभत । दोन मुहूर्त जाता शुद्धि त्वरित । सावध होता तोही भयभीत । पळून गेला रणांतुनी ॥५०॥त्या वेळीं जय लाभून । देव गेले परतून । विकटास हर्षभरें प्रणाम करून । जयजयकारें स्तवन करिती ॥५१॥ओमिति श्रीमदांत्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणें षष्ठे खंडे विकटचरिते विकटप्रादुर्भावो नाम एकत्रिंशत्तमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु । N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP