मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड ४| अध्याय ४२ खंड ४ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० अध्याय ५१ अध्याय ५२ खंड ४ - अध्याय ४२ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत लोभासुरशान्तिवर्णनम् Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः । मुद्गल म्हणती दक्षाप्रत । शुक्रवचन ऐकून आश्चर्ययुक्त । लोभासुर त्यास प्रणाम करित । म्हणे करीन मीं ऐसेंचि ॥१॥आपणासहित जाऊन । करीन मी गजानना त्या नमन । हित माझें साधीन । गुरु तुमचें वचन अटळ ॥२॥त्या कवीस घेऊन जात । तदनंतर गजाननाप्रत । शरण जाण्या उत्सुक चित्त । लोभासुराचें त्या समयीं ॥३॥नगराच्या वेशीपाशी येत । तों तें महास्त्र पाहत । समीपस्थ दानवां जाळित । त्या अस्त्रासी प्रणाम करी ॥४॥गजाननाचा परशु ज्वलंत । पाहता लोभासुर भयभीत । गर्व सोडुनी हात जोडित । स्तुतिस्तोत्र तें गायिलें ॥५॥शस्त्र राजासी ब्रह्मरुपासी । नाना शस्त्रांच्या आधारासी । प्रलयाग्निसम स्वरुपधारकासी । अनंतवीर्ययुक्ता तुज नमन ॥६॥भास्करासम अमित तेजासी । दृश्यादृश्यमयासी सर्वदर्पहरासी । धर्मसंस्थापकासी । नानारुपधरा नमन ॥७॥साक्षात् गजाननाचे जें वीर्य नियत । तेंच तूं महाशस्त्र अद्भुत । कैसी स्तुति करुं मीं सांप्रत । शरणागत पालका तुज नमन ॥८॥सदा स्वानंद संस्थितासी । नमन परशो माझें तुजसी । भयभीत मीं शरण तुजसी । रक्षण करी माझें आतां ॥९॥ऐशियापरी लोभासुर स्तवित । तें काव्यही त्या शस्त्रा प्रार्थित । तदा शांतिधारण करुन जात । पुनरपि परशू गजाननकरीं ॥१०॥तदनंतर शुक्राचार्या सहित । लोभासुर विघ्नेश्वरा भेटण्या जात । त्या महादैत्या पाहून विस्मित । देवर्षि झाले त्या समयीं ॥११॥परस्परांकडे पाहती । कुतुहल आनंद व्यक्त करती । गजाननासी प्रणाम करिती । लोभासुर तैसा शुक्राचार्य ॥१२॥त्याची पूजा शुक्रहस्तें करवित । प्रणाम पुनः पुन्हा करित । हात जोडून प्रभूस नमित । स्तवन करी भक्तिभावें ॥१३॥गजवक्त्रासी बुद्धिचालकासी । नाना सिद्धिप्रदात्यासी । ब्रह्मासी हेरंबासी । स्वानंदवासीसी तुज नमन ॥१४॥परात्परतरासी विघ्नेशासी । सुरासुरप्रियकर्त्यासी । सुरासुरमया तुजसी । नमस्कार माझा असो ॥१५॥विधर्मस्थांचा नाशकर्त्यासी । देवांच्या पालकासी । दैत्यांच्या संरक्षकासी । सर्वांचा दर्पहर्त्यास नमन ॥१६॥गणेशासी लंबोदरासी । देवेशासी दैत्येशासी । मूषक ध्वजासी अनादीसी । सर्वांधिरुपा तुज नमन ॥१७॥आदिमध्यांतहीनासी । आदिमध्यांतस्वरुपासी । ब्रह्मेशासी ब्रह्मासी । महेश पालका तुज नमन ॥१८॥ब्रह्मदात्यासी सदा शांतिधरासी । शांतीच्या शांतिरुपासी । योगासा एकदंतासी । सर्वेशा वक्रतुंडा तुज नमन ॥१९॥महोदरासी पूर्णासी । पूर्णानंदासी सर्वमूळबीजासी । मात्यापित्यासी ज्येष्ठराजासी । ज्येष्ठपालका तुज वंदन ॥२०॥ज्येष्ठांच्या पालकासी । बीजरुपासी गणाधीशासी । जगतांच्या ब्रह्मासी । गजचिन्हें उपलब्धासी नमन ॥२१॥बोधहीनासी रुपासी । सदा सांख्यमयासी । विदेहासी प्रत्यक्ष रुपधरासी । गणाधीशा तुज नमन ॥२२॥तुझें स्तवन करण्या न शक्त । वेद योगि आदि बलवंत । तेथ पामर मी काय स्तवूं सांप्रत । नमन करितों वर देई ॥२३॥तुझ्या दर्शनाचें हें महिमान । कीं मी केलें अल्प स्तवन । आतां अभयद होऊन । हया दासाचें रक्षण करी ॥२४॥ऐसी प्रार्थना करुन । लोभासुर करी वंदन । त्या भक्तासी बोले वचन । दयासिंधु भक्तपालक ॥२५॥महालोभा माग वर । देईन मी तो तुज सत्वर । तुझ्या काव्यें भक्तीनेंही फार । संतोष मजला जाहला ॥२६॥तूं रचिलेलें हें स्तोत्र उत्तम । पुरवील वाचितां अर्थकाम । हे जो वाचील वा ऐकेल मनोरम । त्यास पीडा तूं न करी ॥२७॥ऐसा वाचक अथवा पाठक । पुत्रपौत्रादियुक्त निःशंक । भोग भोगून ऐहिक । अंतीं स्वानंदलोकीं जाय ॥२८॥ब्रह्मभूत तो होईल । जो या स्तोत्रेम मज स्तवील। सर्वदा माझी मान्यता पावेल । यांत संशय कांहीं नसे ॥२९॥तो असुरस्वभावहीन होईल । सुख सात्त्विक पावेल । तुज मारण्या आलों सबल । निःसंशय मीं क्रोधयुक्त ॥३०॥परी आतां तूं शरणागत । दानवोत्तमा सांप्रत । म्हणोनि मारणार नाहीं तुज निश्चित । अभय तुला देत असे ॥३१॥गजाननाचें हें वरदान । ऐकतां लोभासुर प्रसन्न । भक्तिभावें बोले वचन । महाबुद्धी तो ब्रह्मनायकासी ॥३२॥गजानना वर ऐसा मजप्रत । देई तूं सुखद उदात्त । तुझ्या भक्ति स्वरुपें लाभत । गाणपत्य प्रियता ऐसें करी ॥३३॥मज देई शाश्वत स्थान । तैसी वृत्ति दे ठरवून । माझें कार्य मज सांगून । करवून घेई तें प्रभो ॥३४॥गजानन म्हणे तयाप्रत । माझी परमाद्य भक्ती मनांत । तुझ्या होईल दृढ सतत । महामते लोभासुरा ॥३५॥गाणपत्यांत तुझा स्नेह पावेल । वृद्धि सर्वदा अमल । आपुल्या स्थानीं स्थिर सबल । भक्तियुक्त तूं होशील ॥३६॥जेथ माझें न होय पूजन । स्मरण तैसेंचि मनन । जेथ कर्मदींत प्रारंभीं उद्धत मन । तें तेथ कर्म तूं हरण करी ॥३७॥जैसे मज देव प्रिय असत । तैसाचि तूं लाभो सांप्रत । माझे जे भक्त ख्यात । त्यासी रक्षी विशेषें तूं ॥३८॥माझ्या भक्तीचें रुप चित्तांत । लोभा तूं वागवी सतत । ऐसें ऐकून वचन उदात्त । लोभासुर प्रणाम करी ॥३९॥गजाननासी वंदून । शुक्रासहित करी गमन । आपुल्या नगरीस परतून । विचार करी स्वमानसीं ॥४०॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे चतुर्थे खण्डे गजाननचरिते लोभासुरशांतिवर्णनं नाम द्विचत्वारिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP