मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड ४| अध्याय ३२ खंड ४ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० अध्याय ५१ अध्याय ५२ खंड ४ - अध्याय ३२ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत मलमासकृष्णपक्षचतुर्थीवर्णनम् Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः । अधिक मासांत जी संकष्ती येत । तिचें माहात्म्य सांगा मजप्रत । गणेश कथा ऐकोन तृप्त । अद्यापि ना झालें मन ॥१॥ऐसी दशरथाची प्रार्थना ऐकत । तेव्हां वसिष्ठ तयासी सांगत । आंध्र देशी राजा धर्मदत्त । होता धर्मपरायण ॥२॥यज्ञयाग तो बहु करित । नीतिज्ञ अखिलास तोषवित । प्रजेपासून षष्ठांशच घेत । सर्वशास्त्र पारंगत ॥३॥परी त्यासी व्याधी जडत । जलोदर रोगाची अकस्मात । अतिपापें तो पीडित । सार्वभौम भूमिपाल ॥४॥नाना उपाय तो करित । परी रोगमुक्ति ना प्राप्त । तुलादानादिक करित । महादानें तो भक्तीनें ॥५॥तीर्थयात्रा हिंडत । देवता आराधन विधियुक्त । तथापि न होय रोगवर्जित । अति दुःखित मानसी ॥६॥आत्महत्या करण्या उद्युक्त । जाहला नृप तें प्रजा दुःखित । तेव्हां महायोगी अष्टावक्र येत । अकस्मात राजगुहीं ॥७॥विषप्राशनाचा बेत । नृपानें दूर ठेवून सांप्रत । अष्टावक्र पूजा विधियुक्त । करुन भोजन दिलें तयासी ॥८॥नंतर प्रणाम करुन विनवित । धन्य माझा जन्म वाटत । तुमच्या दर्शनें योगेश्वरा उदात्त । जीवन धन्य मज वाटतें ॥९॥मी आत्मघातास उद्युक्त । जाहलो होतों संभ्ररान्त । आतां होऊन दर्शन तुमचें पुनीत । नरकापासून वाचलों मी ॥१०॥हें ऐकता वर्तमान । वसिष्ठ विचारी प्रसन्नमन । महाराजा देहघाता मन । कोणत्या कारणास्तव झालें? ॥११॥तू रोगदुःखमुक्त । होशील हयांत संशय नसत । तुझा जाणला मीं वृत्तान्त । चतुर्थीव्रत विसरलासी ॥१२॥राष्ट्राकडून पाप झालें । तैसेंचि तें तव हस्तें घडलें । चतुर्थीव्रतहीनत्वें आलें । पतितत्त्व नराधमा तुला ॥१३॥सर्व व्रतांत मुख्य मानावें । चतुर्थीचें व्रत बरवें । तें न करता भोगावें । पापाचें फळ आपुल्या ॥१४॥म्हणोनि आता प्रजेसहित । पडशील तूं नरकांत । जरी वाचण्या इच्छा असत । तरी हें व्रत राज्यांत करी ॥१५॥ऐसें बोलून चतुर्थीमाहात्म्य वर्णित । अष्टावक्र करुणायुक्त । तें ऐकून सुविस्मित । धर्मदत्त म्हणे तयासी ॥१६॥पुण्यपावन हें व्रत । पूर्व पुण्ये कळलें मजप्रत । आतां गणेशस्वरुप उदात्त । दयानिधे वर्णन करी ॥१७॥त्या देवासी सदैव पूजीन । मुनींद्रा मी अनन्य मन । त्या देवाधिपाचें महिमान । असामान्य मज वाटतें ॥१८॥अष्टावक्रं सांगी तयाप्रत । महाभागा ऐक उचित । सर्वसिद्धिप्रद असत । स्वरुप त्या गणेशाचें ॥१९॥निर्गुण गणवाचक वर्तत । जें ब्रह्म तें मस्तक असत । त्याचा देह सगुण ख्यात । योगरुप गजानन ॥२०॥सिद्धि ती भ्रांतिरुप । बुद्धि भ्रांतिधरा अपाप । त्यांच्या साधनें खेळे विघ्नप । मायासाहाय्यें सत्य हें ॥२१॥स्वसंवेद्ययोगें लाभत । दर्शन त्याचें महान उदात्त । त्या कारणें योगी वर्णित । स्वानंदवासी प्रभु ऐसें ॥२२॥संयोगांत हा गकार । योगांत आहे णकार । त्यांचा स्वामी तो थोर । गणेशान विघ्नेश्वर ॥२३॥शांतियोगें तो लाभत । पंचधा चित्तवृत्ति जी असत । त्यांत पंचधा मोह वसत । समरुप मीं असे ॥२४॥ऐश्या विचारें चित्त त्यागून । चित्तचालक लाभे पावन । म्हणोनि हा गणनाथ महान चिंतामणि नामें ख्यात ॥२५॥त्यास भज तूं महाभागा आतां । त्यायोगें शांतिलाभ भक्ता । शांत होऊनिया जगता । पूजनीय तूं होशील ॥२६॥ऐसे सांगून त्यास देत । गणेशमालामंत्र उदात्त । विधिपूर्वक नंतर होत । अंतर्धान अष्टावक्र ॥२७॥धर्मदत्त राजा हर्षयुक्त । आपणासी धन्य मानीत । भाग्यगौरवें उत्साहयुक्त । मलमास कृष्ण चतुर्थी करी ॥२८॥प्रजाजनांसमवेत आचरित । नृप तेव्हां संकष्टीचें व्रत । व्रतमुख्यत्वें प्रसिद्ध करित । पृथ्वीवरे सर्वत्र ॥२९॥त्यायोगें रोगविनिर्मुक्त । धर्मदत्त राजा त्वरित । प्रजाजन ही समस्त । झाले निरामय प्रसन्न ॥३०॥राजा नित्य गणपतीस भजत । अनन्यचित्त भक्त । गणेशप्रीतिस्तव देत । नानाविध दानें तो ॥३१॥नंतर राज्यावर स्वपुत्रास । बसवून भोगी एकांतवास । स्त्रीसहित ध्यानमार्गास । अवलंबिलें भजनार्थ ॥३२॥अंतीं विघ्नेशांप्रत जात । तल्लीन झाला भक्तिरत । जन सर्वही ब्रह्मभूत । क्रमाक्रमानें जाहले ॥३३॥ऐसें ह्या व्रताचें माहात्म्य कथिलें । दुसरेही असे वृत्त भलें । तें आतां पाहिजे श्रवण केलें । मुक्तिप्रद कथानक ॥३४॥गांधार देशांत क्षत्रिय राहात । पापी परद्रव्यहारक चौर्यरत । द्युतमद्यासक्त परस्त्रीलंपट । गोमांसाभक्षक असत्यपर ॥३५॥तो दुर्बुद्धि कलह सतत । हिंसाकर्म सदा आचरित । तेव्हां राजा त्यास करित । घोर वनीं हद्दपार ॥३६॥वनांत वाटमारी करित । ब्राह्मणांदीसी ठार मारित । स्त्रियांचाही वध भयरहित । पापी दुष्ट तो नित्य करी ॥३७॥नंतर द्रव्य जोडून अपार । भोगिले भोग अपार । नाना चोर्या करुन उग्र । त्या दुष्ट पातक्यानें ॥३८॥पुढें एकदा मलभासी जात । तो पापी एका पर्वतद्रोणींत । कृष्णचतुर्थी ती असत । हिंसार्थ लोभी त्या वेळीं ॥३९॥नंतर एक मार्गस्थ पाहत । मानव तो अवचित । शस्त्रधारी तो धावत । वधार्थ त्याच्या त्या समयीं ॥४०॥त्या क्रूरकर्म्यास पाहून । तो वाटसरु करी पलायन । कोसभरी तो पापी मागें लागुनी । पडला मार्गात अडखळून ॥४१॥त्यास पडलेला पाहत । तेव्हां वाटसरु क्रोधें हाणित । एक पाषाण क्रोधयुक्त । मस्तकावरी त्याच्या तें ॥४२॥त्यायोगें त्या पाप्याचें फुटत । क्षत्रियाचें मस्तक क्षणांत । त्या कारण व्याकुळ अत्यंत । शुद्ध हरपली तयाची ॥४३॥रात्रीं चंद्रोदयापर्यंत । तो तैसाचि बेशुद्ध पडत । परी चंद्रोदयानंतर सावध होत । स्वल्प पायस पानकरी ॥४४॥नंतर दुसरे दिनीं पंचमी असत । तेव्हां तो प्राण सोडित । स्वानंदपुरीं जात । गणेशास पाहून मुक्त झाला ॥४५॥तो पापकर्मा क्षत्रिय होत । व्रतप्रभावें ब्रह्मभूत । नकळत जेव्हां त्यास घडत । संकष्टीचा उपवास ॥४६॥तरी ज्ञानपूर्वक करिती व्रत । त्यांचें पुण्य अगणित । नानाजन भोगित । व्रतप्रभावें हृदयोप्सित ॥४७॥अन्तीं ते ब्रह्मभूत होत । ऐसा महिमा अगाध असत । मलमास संकष्टीचा पुनीत । ऐकतां वाचिता इष्टलाभ ॥४८॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे चतुर्थे खंडे गजाजनचरिते मलमासकृष्णपक्षचतुर्थीमाहात्म्यवर्णनं नाम द्वात्रिंशोऽध्यायः । श्रीगजाननार्पणमस्तु । N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP