मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड ४| अध्याय ३० खंड ४ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० अध्याय ५१ अध्याय ५२ खंड ४ - अध्याय ३० मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत मार्गशीर्षकृष्णचतुर्थीमाहात्म्यवर्णनम् Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः । मार्गशीर्ष संकष्टीचें महिमान । वसिष्ठ सांगती दशरथाप्रत प्रसन्न । इतिहास तो पुरातन । हरिश्चंद्र राजाचा ॥१॥तेजस्वी हरिश्चंद्र प्रतापवंत । अयोध्येंत राज्य करित । नानाधर्म परायण सदगुणयुक्त । कर्मपरायण उदार दाता ॥२॥जें जें ब्राह्मण मागत । तें तें हर्षभरें तयास देत । त्याच्या पुण्याची तुलना नसत । धरातलावरी समग्र ॥३॥त्यास पीडा देण्या जात । विश्वामित्र योगी याच स्वरुपांत । त्यास आपुले सर्व राज्य देत । दानरुपें हरिश्चंद्र ॥४॥राज्यभ्रष्ट नृपास करित । परप्रांतीही त्यास छळित । परी तो नृप धर्मयुक्त अत्यंत । ढळला नाही अल्पांशेही ॥५॥आपुलें ब्रीद राखित । हरिश्चंद्र होता भटकत । मार्गशीर्ष संकष्टी दिनीं घडत । न कळत त्यास उपावास ॥६॥क्षुधार्त तैसा तृषार्त । हरिश्चंद्र राजा असत । विश्वामित्र सत्त्वपरीक्षा घेत । ऐसा संपूर्ण दिन गेला ॥७॥परी चंद्रोदय होता अन्न । काही दैवयोगें मिळून । नृपें केलें तें भक्षण । पुढें एक आश्चर्य घडलें ॥८॥मार्गशीर्ष कृष्ण पंचमी उजाडली । तेव्हां एक घटना घडली । विश्वामित्राची बुद्धि जाहली । संभ्रान्त एकाएकी तेव्हां ॥९॥तें पाहून विस्मित । योगी विचार करी मनांत । संकष्टीचें व्रत नृपें केलें तें ज्ञात । होऊन वरद त्यास झाला ॥१०॥हरिश्चंद्रासी तो सांगत । महाबुद्धे ऐक वृत्तान्त । चतुर्थीचें व्रत तुझ्या राज्यांत । नष्ट झालें होतें पूर्वीं ॥११॥त्यायोगें पीडा तुज प्राप्त । मीही त्या कारणें क्षोभित । सर्व कार्यारंभीं करावें हें व्रत । चार पुरुषार्थदायक ॥१२॥तूं नानाविध पुण्य केलें । तें चतुर्थीलोपें नष्ट झालें । सर्व जनांसह तुजवरी ओढवलें । नरकपाताचें भय ॥१३॥परी तूं हें मुख्य व्रत । काल केलेंस न कळत । म्हणोनी मी प्रीतियुक्त । तुज गणेशमंत्र देतों ॥१४॥अष्टाक्षर मंत्र उपदेशित । गणनाथाचा त्यास विधियुक्त । गणेशाचें स्वरुप वर्णित । प्रार्थनेस्तव हरिश्चंद्रांच्या ॥१५॥राजा तूं संकष्टीचें व्रत । जरी करिशील असत । तरी प्रजेसह सौख्यलाभ तुजप्रत । होईल यांत न संशय ॥१६॥गणेश्वराचें महिमान । सांगतों तुज मी पावन । जगीं गणेश एक सत्त्वभाव मान । सर्व त्याचे गण असती ॥१७॥मनोवाणीमय जें असत । तें विश्व गणवाचक समस्त । नाना भावें समायुक्त । वर्णन त्याचें अशक्त असे ॥१८॥मनोवाणीविहीन । जें नाना ब्रह्मविधान । गणरुप तें पावन । ऐसें वेद सांगती ॥१९॥सिद्धि भ्रांति करी ख्यात । बुद्धि ती भांतिधर असत । त्या उभयत सवें खेळत । विघ्नेश चिंतामणि हा हृदयीं ॥२०॥त्यांस तूं विधिपूर्वक भजशील । तरी शांतिसुख लाभशील । राज्यकर्ता वंद्य होशील । योगिवन्द्य या जगांत ॥२१॥चित्त पंचविध ख्यात । त्यांत मोहही पंचविध वर्तत । मी समरुप असत । चित्तत्यागें चिंतामणिपद ॥२२॥ऐसें सांगून व्रताचें महिमान । सांगून त्यास अंतर्धान । विश्वामित्र जाहला प्रसन्न । हरिश्चंद्रा मोद झाला ॥२३॥अयोध्येसी तो परतत । प्रधान त्याचें स्वागत करित । प्रजाजनांसह आचरित । संकष्टीचें व्रत वरदेचें ॥२४॥हरिश्चंद्र नृप आपुल्या राज्यांत । चतुर्थीव्रत प्रशंसित । राजाज्ञेचें पालन करित । प्रजाजन सारे भक्तिभावें ॥२५॥हया व्रतासम कांहीं नसत । अन्य व्रत जगतांत । रोगमुक्त होऊन हर्षयुक्त । प्रजाजन सारे झाले ॥२६॥राजा गणपतीस भजत । अनन्यभावें सतत । वृद्ध होतां जात वनांत । पुत्रास राज्य देऊनियां ॥२७॥स्त्रीसहित वनांत । गणराजाचें तप करित । शांति लाभून विशेषयुक्त । योगी जाहला तो राजा ॥२८॥अंतीं स्वानंदवासी होऊन । नृप जाहला गणेशाधीन । ऐसें हें व्रत महिमान । अन्यजनही मुक्त झाले ॥२९॥अन्यही एक वृत्तान्त । वसिष्ठ दशरथास सांगत । माळव्यांत एक असत । कर्णा नामक एक वेश्या ॥३०॥ती नर विमोहिनी अत्यंत । हावभावें भुलवी क्षणांत । स्वधर्म सोडून आसक्त । नाना जन भजती तिसी ॥३१॥आपापल्या स्त्रीस सोडून । तिच्या नादीं लागले जन । मद्य मांसांचें सेवन । करविलें त्यांसी तियेनें ॥३२॥ऐसें ब्राह्मणादि भ्रष्ट झाले । चौयर्मादिर्कांत गुंतले । बहुविध दोष त्यांनीं केले । परदोष कथनीं दोष असे ॥३३॥ती कर्णा वेश्या पापी असत । अतिदारुण लोभी अत्यंत । नाना जनांसह नरकाप्रत । मार्ग तिचा सुनिश्चित ॥३४॥परी एकदा ती ज्वरग्रस्त । मार्गशीर्ष कृष्ण चतुर्थी दिनांत । तापानें पोळली अत्यंत । कांहीं दिनभरी न भक्षिलें ॥३५॥परी चंद्रोदयीं अल्प खाऊन । पंचमी तिथीस मृत होऊन । नकळत घडलें व्रत महान । त्या पुण्ये ती मुक्त झाली ॥३६॥तिच्यासम अन्य जन जे आचरित । चतुर्थी तेही मुक्त होत । होऊनियां ब्रह्मभूत । प्रभाव वर्णनातीत ऐसा ॥३७॥मार्गशीर्ष चतुर्थीचें महिमान । ऐकतां वाचितां पुण्यपावन । सर्वसिद्धि लाभतील जन । चिंतामणीच्या कॄपाप्रसादें ॥३८॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे चतुर्थे खण्डे गजाननचरिते मार्गशीर्षकृष्णचतुर्थीमाहात्म्यवर्णनं नाम त्रिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाजनार्पणमस्तु । N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP