मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड ४| अध्याय २५ खंड ४ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० अध्याय ५१ अध्याय ५२ खंड ४ - अध्याय २५ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत आषाढकृष्णचतुर्थीमाहात्म्यवर्णनम् Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः । आषाढ संकष्टीचें व्रत । महिम्यासह सांगा मजप्रत । ऐसें दशरथ प्रार्थित । वसिष्ठ तेव्हां म्हणे त्यासी ॥१॥ऐक इतिहास पुरातन । आचरितां व्रत हें पावन । सर्वसिद्धिलाभ होत महान । नृपात्मजा या जगतांत ॥२॥एकदा वृत्रासुरानें पीडित । महेंद्र जाहला चिंताक्रान्त । राज्यादिक सोडून वनांत । भयभीत तो राहिला ॥३॥श्रुतिहीन मुनी भ्रष्टाचार । भयोद्विग्न सर्व वर्ण अनिवार । कर्मखंडित होऊन अमर । परम विव्हल झाले होते ॥४॥तयांसी उपोषणे घडत । हविर्भाग ना मिळत । सर्व मरणोन्मुख दुःखार्त । गिरिगुहांत राहती ॥५॥तेथ योगिगुरु गुत्समद येत । त्यास साष्टांग ते नमित । इंद्रमुख्य देव समस्त । पूजन करुनी सत्कारिती ॥६॥तदनंतर इंद्र पार्थित । धन्य माता पिता आमुचें व्रत । धन्य यज्ञ ज्ञानादिक वाटत । तुमच्या अंध्रिदर्शनानें मनीं ॥७॥तुमच्या दर्शनमात्रें होईल । कल्याण आमुचें निश्चल । साक्षात योगीश्वर प्रबल । सर्वसिद्धिप्रद तुम्हीं ॥८॥वृत्रासुर दुष्ट मजला । त्यानें स्वर्गलोक जिंकिला । आमुचा पराभव झाला । राज्य त्यागून वनीं राहतों ॥९॥पशूसम आमुची स्थिती । कर्मनाशें उपास घडती । आता मरण ओढवेल निश्चिती । ऐसें भय वाटतसे ॥१०॥तथापि पुण्ययोगें प्राप्त । जाहलें तुमचें दर्शन पुनीत । आतां दया करुन आम्हांप्रत । वृत्रनाशाचा उपाय सांगा ॥११॥जग सर्व भ्रष्टाचारी असत । संहार समीप आला वाटत । ऐशा समयीं योगींद्रा दिसत । भविष्य काय तुम्हांसी ॥१२॥गृत्समदं तेव्हां सांगत । वाटोनिया दया मनांत । विश्व रक्षणार्थ उद्यत । दुष्टनाशकर वचन ॥१३॥देवेन्द्रं तूं व्रतभ्रष्ट झालास । राज्य मिळतां विसरलास । चतुर्थीच्या उत्तम व्रतास । म्हणोनि कष्ट पावलासी ॥१४॥ज्ञानमदानें त्यजिलास । विघ्नेशाचा मंत्र सुरस । होवोनियां मदलालस । म्हणोनि राज्यहीन झालासी ॥१५॥ऐसें बोलून उपदेशित । चतुर्थीचें माहात्म्य पुनीत । गणेशमंत्र पुन्हां देत । मुनिश्रेष्ठ तो इंद्रासी ॥१६॥तदनंतर तो मुनी परत । जेव्हां आपुल्या स्थानाप्रत । इंद्र तेव्हा व्रत आचरित । पूजन करी गणेशाचें ॥१७॥त्यानंतर आषाढी संकष्टी येत । इन्द्र ती परमादरें आचरित । गणेशाची मनीं ध्यात । ऐसें संपूर्ण व्रत केलें ॥१८॥दधीचीच्या अस्थींपासून । घडविलें होतें वज्र महान । तें दिव्य आयुध करी धरुन । वृत्रासह लढण्या गेला ॥१९॥चतुर्थीव्रताच्या प्रभावें मारित । वज्रराघातें वृत्रसुरासी रणांत । महाघोर त्याचें युद्ध चालत । अन्तीं विजय इन्द्राचा ॥२०॥महावीरा वृत्रासुरासी मारित । तदनंतर शतक्रतु परतत । अन्य देवां समवेत । अमरावतींत आनंदें ॥२१॥तेव्हांपासून देवगण समस्त । शुक्लकृष्ण चतुर्थीचें व्रत । आपापल्या स्थानीं आचरित । सर्वसिद्धिकर महान ॥२२॥मन्वंतर जेव्हां होत समाप्त । तेव्हां इंद्र स्वानंदलोकीं जात । विघ्नेश्वरासी पाहत । ब्रह्मभूत जाहला ॥२३॥पृथ्वीवरी नर समस्त । चतुर्थीचें व्रत करित । व्रतपुण्यं ते मुक्त होत । गणेशसायुज्य लाभले ॥२४॥ऐसाचि दुसरा वृत्तान्त । या व्रतसंबंधीं असत । पापकंचुकाचा नाश होत । ऐकता तो भक्तीनें ॥२५॥एक ब्राह्मण गुर्जर देशांत । बाल्यापासून पाप करित । परस्त्रीयांसी भोगित । जीवहत्या बहु केली ॥२६॥एकदां आपुली बहीण एकान्तीं । पाहूनी तो दुष्टमती । मदाप्रभावें तिच्या संगती । रममाण तो जाहला ॥२७॥अभक्ष्यभक्षण तो करित । वनामाजी संचार करित । द्रव्यलोभीं तो द्विजां मारित । पशुपक्षीही असंख्य ॥२८॥नित्य यवनांसह भोजन । करी तो दुष्ट दुश्चितमन । त्याचीं पापें करण्या वर्णन । अशक्य असे सर्वथा ॥२९॥एकदां हिंडत होता वनांत । परी देवशभरी त्यास अन्न न मिळत । अति दुःखार्त तो भटकत । पर्वतावरी क्षुधार्थ ॥३०॥परी खावया कांहीं न लाभत । म्हणोनि दुःखी होत मनांत । सायंकाळी गृहीं परतत । तेथही अन्न जल त्यास न मिळे ॥३१॥यवनीस आलिंगोनी घालवित । आपुला समय तो क्षुधार्त । चंद्रोदय होता अवचित । कोणी अन्न आणून दिलें ॥३२॥ते त्यानें भक्षिलें सूतांसमवेत । मायेनें मोहित तो अत्यंत । नंतर होत ज्वरग्रस्त । पापी भोगी फार पीडा ॥३३॥यवनी त्यास स्पर्श ना करित । पंचमी तिथीस तो मरत । गणेशदूत त्यास नेत । आनंदलोकी तत्काळ ॥३४॥तदनंतर तो ब्रह्मभूत । गणेशसायुज्य लाभत । ऐशापरी महापापी उद्धरत । व्रतप्रभावें चतुर्थीच्या ॥३५॥अजाणतां घडता व्रत । जरी एवढे पुण्य लाभत । तरी ज्ञानपूर्वक जे करित । वर्णनातीत लाभ त्यासी ॥३६॥विधियुक्त व्रत जें नर करिती । त्यांच्या दर्शनानें जन तरती । ऐशापरी या जगतीं । असंख्य झाले ब्रह्मभूत ॥३७॥त्यांची चरित्रें अनंत । वर्णन करण्या अशक्य असत । आषाढी संकष्टीचें व्रत महिमान असत । अद्भूत पावन या जगीं ॥३८॥जो हें ऐकेल अथवा वाचील । त्यास सवार्थाचा लाभ होईल । अन्तीं तो विमुक्त होईल । यांत संशय कांहीं नसें ॥३९॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे चतुर्थे खण्डे गजाननचरिते आषाढकृष्णचतुर्थीव्रतवर्णनं नाम पंचविंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु । N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP