मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड ४| अध्याय २६ खंड ४ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० अध्याय ५१ अध्याय ५२ खंड ४ - अध्याय २६ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत श्रावणकृष्णचतुर्थीमाहात्म्यवर्णनम् Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः । आषाढ संकष्टीचें महिमान । ऐकतां उत्सुक माझें मन । श्रावणसंकष्टीचें व्रत महान । तेंही विशद मजला करावें ॥१॥दशरथाची ऐकून विनंते । वसिष्ठमुनी त्यांस सांगती । चंद्रवंशांत जगतीं होता युधिष्ठिर राजा ॥२॥तो धर्मशील प्रतापवंत । साक्षात धर्मांचा अवतार वाटत । सत्यवचनी करुणायुत । प्रजापालनीं तत्पर ॥३॥द्रौपदी भ्रात्यांसहित । कुंतीमातेच्या संगतींत । महाभाग तो विख्यात । भूमंडळीं अत्यंत ॥४॥वृष्णिकुलोद्भव कृष्ण असत । सहाय्य त्याचा बळवंत । साक्षात नारायण जो श्रीमंत । भूभारहरणीं रत सदा ॥५॥एकदा युधिष्ठिर कृष्णवर्जित । राजसूय यज्ञ करित । धृतराष्ट्र विदुरा पाठवित । तेथ त्यावेळ यज्ञांसी ॥६॥कुंतुपुत्र त्याचें स्वागत करीत । उत्तम अन्न त्या जेऊं देत । नंतर त्या म्हणे हर्षित । धन्य जन्म कर्मादि माझें ॥७॥तुझ्या अंध्रियुगाचें दर्शन । झालें आज मजला महान । आपण धर्मवेत्तें ताता शोभन । पालन आमुचें करावें ॥८॥कुशल सांगावें स्वजनांचे । येथ का आगमन केलें त्याचें? । कारण वृत्तान्त सांगून आमुचें । समाधान करावें ॥९॥तेव्हां विदुर म्हणे तयाप्रत । स्वजनांचे कुशल असें अत्यंत । दुर्बुद्धी धृतराष्ट्राचा निरोप तुजप्रत । सांगतो तो ऐकावा ॥१०॥पुत्राच्या वात्सल्यानें युक्त । दुर्योधनाचा करी पक्षपात । त्या नृपें पाठविलें तुजप्रत । विचक्षणें धृतराष्ट्रें ॥११॥तो मंदधी इच्छा करित । तुज जिंकावे द्यूतांत । महापापी दुर्योधन असत । कुलक्लेशाचा वर्धक ॥१२॥कर्ण त्यासी प्रेराणा देत । शकुनीही उत्साह अर्पित । दुःशासनासमवेत । आतुर तुझें राज्य हरण्या ॥१३॥ऐसें धृतराष्ट्राचें चित्त । लोभी पापी अत्यंत । तो बोलवितो तुजप्रत । युधिष्ठिरा द्यूत खेळावया ॥१४॥त्या पुत्रपक्षपात्याचें वचन । दुर्मतीचें न मानून । कुंती भ्राते स्त्रीसह गमन । कदापि तेथ करुं नको ॥१५॥विदुराचें ऐकून वचन । युधिष्ठिर महायश निःश्वास सोडून । हितकारक बोलें प्रतिवचन । ऐक ताता विचार माझा ॥१६॥धृतराष्ट्र राजा राज्यावर सुस्थित । भीष्मादी सर्व त्याच्या आज्ञेंत । आम्हीही आहोंत बद्ध तयाप्रत । राजाज्ञा पाळावीं हा धर्म असे ॥१७॥म्हणोनि मीं येतो तुझ्यासहित । जें होणार तें होवो जगांत । ऐसें धर्मयुक्त वचन ऐकून होत । मानस खिन्न विदुराचें ॥१८॥निःश्वास सोडीं कांहीं न बोलत । पांडव विदुरासमवेत । द्रौपदीसहित सर्व जात । धृतराष्ट्राच्या सभास्थानीं ॥१९॥त्यानें आज्ञा देतां खेळती । कौरव पांडव द्युत युक्ती । दुर्योधन प्रमुख करिती । कलह तेव्हां द्यूतक्रीडेत ॥२०॥शकुनीनें तपें साधिलें होतें द्यूत । म्हणोनि तें त्याच्या अधीन असत । त्याच्या साहाय्यें सुयोधन जिंकित । समग्र राज्य पांडवांचें ॥२१॥तो दुर्मती तदनंतर पाठवित । द्यूतपराजयवशें वनवासांत । समस्त पांडवबंधूंस त्वरित । तत्पूर्वीं द्रौपदीं पीडिले ॥२२॥सभेंत आणून विटंबित । म्हणे सुंदरी माझी पत्नी होई विनीत । पांच पती का जगांत । असतात कोणी स्त्रीला सांग ॥२३॥ऐसें कोठें न झालें । परी तूं पांच पती केले । आमच्या कुळाचें नष्ट झालें । सर्व यश दुष्टे तुझ्यामुळें ॥२४॥दुर्योधनाचा भ्राता फेडित । वस्त्रे तिचीं सभेंत । नागवीं तीस करण्या उद्यत । भीष्मादीस तिरस्कारुनी ॥२५॥दुःशासनाच्या समवेत । पांडव होते द्यूतवित । धर्मरक्षणार्थ तें सहन करित । द्रौपदी स्मरी कृष्णातें ॥२६॥त्यानें गुपरुप धरिलें । सभेंत येऊन द्रौपदीस वाचविलें । एकवस्त्र फेडितां दुसरें निर्मिलें । पुनः पुन्हा मायेनें ॥२७॥ऐसीं अनेक वस्त्रें फेडिली । परी दौपदी नग्न न झाली । परमेश्वरानें राखिलीं । लाज आपुल्या प्रिय भगिनीची ॥२८॥तदनंतर कौरव झाले व्यथित । स्वगृहासी परतत । पांडवांसह जात वनांत । द्रौपदी मुक्तता लाभून ॥२९॥तेथे श्रीकृष्ण त्यांस भेटत । युधिष्ठिरासी म्हणे प्रतापवन्त । होऊनियां क्रोधयुक्त । ऐक प्रतिज्ञा राजशार्दूला ॥३०॥दुर्योधनास ठार मारीन । राज्यकामुका त्या शासन करीन। तुला राज्यावरी स्थापीन । वनवासा तूं जाऊ नको ॥३१॥तें ऐकून श्रीकृष्णवचन । धर्मराज म्हणे हितकर वाक्य नमून । महाबाहो क्रोध त्यजून । धर्म रक्षी जनार्दना ॥३२॥वृष्णिकुलोद्भवा धर्म युक्त । राज्य अर्पावें मजप्रत । तेव्हां कृष्ण सांगे तयाप्रत । गणेश उपासना तूं करी ॥३३॥सर्व भावांसहित पत्नीसहित । पूजी तूं गणेशासी व्रतयुक्त । तो आमुचें कुलदैवत स्वानंदास कर्ता असे ॥३४॥तो सत्य असत्यांत समान । चतुर्विधरुपें झाला प्रकटन । ऐसें बोलून दशाक्षर मंत्र पावन । कृष्णें दिला युधिष्ठिरासी ॥३५॥विधिपूर्वक हर्षयुक्त । सर्वसिद्धिकर तो गणेशमंत्र पुनीत । तैसेंच व्रताचें माहात्म्य कथित । केशव पुण्यद भ्रांतिनाशी ॥३६॥सर्वांदींत करावेम हें व्रत । जें चतुर्विधप्रद पूर्ण असत । तें करितां सकल कर्मे जगांत । सफल होतें सर्वदा ॥३७॥केशव म्हणे युधिष्ठिराप्रत । हें व्रत नष्ट झालें तव राज्यांत । म्हणोनि राज्यम्रष्टता तुजप्रत । चतुविम्धपद नष्ट झालें ॥३८॥तें ऐकून युधिष्ठिर । मनीं विस्मित झाला फार । गणेशास मनीं ध्याऊन सत्वर । विधिपूर्वक व्रत केलें ॥३९॥प्रथम आली श्रावणी संकष्टी । कृष्णपक्षीं चतुर्थी आचरती । पांडव सारे द्रौपदीही प्रीती । नंतर शुक्ल कृष्ण चतुर्थ्या करिती ॥४०॥दौपदीसहित वनांत । सर्व सोख्यें पांडवांसी प्राप्त । अंतीं स्वराज्य मिळवून भोगित । ऐहिक सर्व सुखोपभोग ॥४१॥सुयोधनासी ठार मारिलें । पक्षपाती नृपासही नष्ट केलें । कृष्णचातुर्यें पांडव झाले । सुखी प्रसन्न तदनंतर ॥४२॥युधिष्ठिरें पृथिवीतलावर । विख्यात केलें चतुर्थीं व्रत सुंदर । शुक्लकृष्ण चतुर्थी नर । समस्त आचरती राज्यीं त्यांच्या ॥४३॥इहलोकांतील भोग पांडव भोगिती । अंतीं नातवास राज्य देती । पांडव सारे ज्ञानयुक्त चित्तीं । स्वअंशांत विलीन झालें ॥४४॥त्याचे अन्य प्रजाजन । क्रमें जाहले गणेश्वर पदयुक्त महान । गणेश्वरासी पाहून । ब्रह्मभूत सारे झाले ॥४५॥ऐसें व्रतमाहात्म्य तुजप्रत । नृपोत्तमा सांगितलें पुनीत । दुसरा एक असे वृत्तान्त । महापुण्यप्रदे परम ॥४६॥कर्नाटकांत एक कारुक । होता महापापी निःशंक । वनांत तो शस्त्रधारक । ठार मारी वाटसरुंस ॥४७॥परस्त्री एकाकिनी पाहत । तरी बलत्कार तिजवरि करित । ऐसा तो महा खळ अत्यंत । गोवध ब्राह्मणहत्या करी ॥४८॥द्रव्यलाभार्थ मारित । मांसभक्षणार्थ पापें करित । अनेक पापें आचरित । नित्य जाऊन वनांत ॥४९॥गावांतील जनांस मारित । त्यांचें द्रव्य हरी समस्त । महाचोर दुर्मती तो असत । एकदा गेला होता वनीं ॥५०॥लोकांस मारण्या उद्यत । बैसला होता गृहेंत । तेव्हां वृष्टी अकस्मात । मुसळधार तेथ झाली ॥५१॥जेथ तेथ पाणी तुंबत । नद्याविहिरी । पाण्यानें भरत । वृष्टिभय गुहेंत । अडकला तो महाचोर ॥५२॥दैवयोग ती चतुर्थी होती । कांहीं न मिळे खावया तयाप्रती । श्रावण कृष्णपक्षी निश्चिती । उपवास घडला तयासी ॥५३॥अन्नहीन त्यास व्रत घडत । संपूर्ण दिनभरी अकस्मात । चंद्रोदय होतां येत वाहत । शहाळें एक गृहेजवळी ॥५४॥त्यांतेल खोबरे तो खात । नारिकेलाचें जल पीत । रात्र संपता बाहेर पडत । गृहेंतून तो महापापी ॥५५॥तेथ एक वाघ भयंकर । अवचित आला उग्र । त्यानें भक्षिलें त्यास सत्वर । पंचमीस मृत्यू त्याचा झाला ॥५६॥त्या पुण्यानें तो पापी जात । स्वानंदपुरीं होऊन पुनीत । व्रतप्रभावें होत । ब्रह्ममय तदनंतर ॥५७॥न कळत घडलें व्रत । त्याचा एवढा प्रताप दिसत । तरी ज्ञानपूर्वक जे करित । त्यांसी लाभ अवर्णनीय ॥५८॥नाना जन व्रत करुन । ऐहिक भोग लाभून । अन्तीं स्वानंदलोकीं जाऊन । मुक्ति जाहले असे ख्यात ॥५९॥ऐसें श्रावण कृष्ण चतुर्थीचें महिमान । ऐकती वा वाचती पावन । त्या नरांसी भुक्तिमुक्ति लाभून । अंतीं गणेशसायुज्य लाभे ॥६०॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे चतुर्थे खण्डे गजाननचरिते श्रावणकृष्णचतुर्थीमाहात्म्यवर्णन नाम षड्विंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु । N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP