Dictionaries | References

करील ती पूर्वदिशा

   
Script: Devanagari

करील ती पूर्वदिशा     

एखाद्याच्या हाती अप्रतिबंध सत्ता असणें. तो ज्‍या दिशेला पूर्व म्‍हणेल तिला बाकीचे सर्वांनी मान्य करणें. आपल्‍याच तंत्राने एखादा माणूस कोणीहि हरकत न करतां करीत असला म्‍हणजे म्‍हणतात. निंदार्थी प्रयोग. ‘राजा करील ती पूर्वदिशा व भट करील ती अमावास्‍या’ अशी कोकणी म्‍हण आहे. ‘दरबार भरविणें, आटोपणें त्‍यांच्या मर्जीवर. करतील ती पूर्वदिशा.’-उदयास्‍त.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP