Dictionaries | References

अस्सल ते अस्सल आणि नक्कल ती नक्कल

   
Script: Devanagari

अस्सल ते अस्सल आणि नक्कल ती नक्कल     

जी गोष्ट अस्सल ती कितीहि वाईट असली तरी तिच्या नकलेपेक्षां खात्रीनें अधिक चांगली असणार व नक्कल कितीहि हुबेहुब असली तिला अस्सलाची बरोबरी करतां येणार नाही. त्या दोहोंत काहीतरी अंतर हे असणारच. अनुकरण कितीहि हुबेहुब करण्याचा प्रयत्‍न केला तरी मुळाबरोबर तंतोतंत जमणें शक्य नसते. त्यांत थोडा फार तरी कमीपणा राहतोच. कृत्रिम गोष्टीस खर्‍याची बरोबरी कधीहि करतां येणार नाही. तुलना-काचः काचो मणिर्माणिः।

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP