Dictionaries | References आ आपण व्हावें ऐसे म्हणतों, ईश्र्वर इच्छी तैसे करतो Script: Devanagari Meaning Related Words आपण व्हावें ऐसे म्हणतों, ईश्र्वर इच्छी तैसे करतो मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 आपल्या मनांत एखादी गोष्ट व्हावी असे असते. पण परमेश्र्वराच्या मनांत दुसरीच काही तरी योजना असून त्याप्रमाणे घडून येते. मनुष्यानें कोणतेहि बेत केले तरी सर्व गोष्टी परमेश्र्वराधीन असून त्याच्या इच्छामात्रेकरून सर्व गोष्टी घडून येतात. ईश्र्वरेच्छा बलीयसी। (अ) स्वयं महेशः श्र्वशुरो नगेशः सखा धनेशस्तनयो गणेशः। तथापि भिक्षाटनमेव शंभोर्बलीयसी केवलमीश्र्वरेच्छा।। -सुर १२.५२. (आ) भ्रमन्वनान्ते नवमंजरीषु न षट्पदो गन्धफलीमजिघ्रत्। सा किं न रम्या स च किं न रन्ता बलीयसी केवलमीश्र्वरेच्छा।। -सुर ९२.५९. ‘आपण म्हणतों एक०’ पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP