मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|क्रीडा खंड|उत्तरार्ध|
अध्याय ८५

क्रीडा खंड - अध्याय ८५

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(गीति)

जेव्हां गणेश होई, जन्मुन तो पांच मास परिपूर्ण ।

मरिची ऋषींस कळतां, शंभू धामास येति ते तूर्ण ॥१॥

पार्थति मुनींस बोले, दर्शन दिधलें अम्हांस येऊन ।

तेणेंकरुन आम्ही, धन्यचि झालों असें वदे लीन ॥२॥

नंतर मुनी म्हणाले, पार्वति हें भाग्य आपुलें थोर ।

झाला गणेश तुमचा, सूत खरोखर धरुन अवतार ॥३॥

रक्षीं पार्वति सूता, राक्षस हे मातले बहू भारी ।

पार्वति उतरे मुनिंना, महिन्यापासून बाळ मुर मारी ॥४॥

राक्षस पीडिति बाळा, सत्य असे म्हणुन रक्षणा कंठीं ।

बंधन करण्यासाठीं, द्यावा ताईत दोर वा पेटी ॥५॥

पार्वति इच्छा जाणुन, पिशाच्चभयनाशनास कीं उचित ।

मंत्रुण रक्षण दिधली, गिरिजा बांधी सुतास ती त्वरित ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP