मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|क्रीडा खंड|उत्तरार्ध|
अध्याय १३०

क्रीडा खंड - अध्याय १३०

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(गीति)

दश मास पूर्ण होतां, पार्वति झाली प्रसूत शुभदिनिं ती ।

पुत्र तियेला झाला, सर्वांसह हर्षयुक्त शिव होती ॥१॥

वदनीं द्वयरद शुंडा, चंद्र शिरीं वेदपाणि सुत झाला ।

केवळ परमात्मा हा, अपुल्या उदरीं जनीत कीं झाला ॥२॥

मूषक वहनीं बैसुन, सिंधुर नामें असूर बघणार ।

शिव पार्वतीस सांगति, तें ऐकुन वदत काय तें कुमर ॥३॥

शिव भाकित साच असें, सिंधुरहननाशिवाय कार्य असें ।

लोकांच्या अज्ञाना, नाशुन वैदिक सुकर्म करिति असें ॥४॥

वर्तन करण्यासाठीं, ज्ञानाचा योग्य बोध शिकवावा ।

यास्तव वरेण्य भूपति, सदनिं मशिं कीं त्वरीतसा न्यावा ॥५॥

निःसिम भक्त असे तो, राहे सदनीं कुमारपणिं मी कीं ।

अश्वासिलें तयांना, यास्तव न्यावें असेंच तेथें कीं ॥६॥

भूपतिसतिनें माझीं, द्वादश वर्षे सुभक्तिनें तपसा ।

केली म्हणून तिजला, वर दिधला तो करीन पूर्ण असा ॥७॥

राणी निद्रित असतां, बालक नेलें अतांच असुरानें ।

जागी झाल्यावर ती, विव्हळ होइल बहूत दुःखानें ॥८॥

मरणास सिद्ध होइल, यास्तव न्यावें मला तिथें त्वरित ।

जागी होण्यापूर्वी, ठेवावेम जवळ वेळ ही उचित ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP