मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|क्रीडा खंड|उत्तरार्ध|
अध्याय ९०

क्रीडा खंड - अध्याय ९०

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(गीति)

होतां वर्ष तयाला, पार्वति घाली सुतास बहु लेणीं ।

होतीं सतेज रविसम, थै थै करिं रे वदे सुधावाणी ॥१॥

ऐकुन बालक नाचे, थै थै ऐसा शिवापुढें जेव्हां ।

पाहुन शिव बहु मोदें, नृत्य करी तो सुतासवें तेव्हां ॥२॥

सुत नाथ नृत्य करितां, पाहुन गिरिजा करीत नर्तन कीं ।

रंगुन गेलीं सारीं, वर्णन करण्या अशक्य सुरमुनि कीं ॥३॥

नृत्या करुन पुरतें, धरिलें करिं लेकरास घे अंकीं ।

तेव्हां बालक जड बहु, लागे वदली खरोखरी हें कीं ॥४॥

कारण असूर शिरला, पायींच्या नोपुरांत लघु-रुप ।

गिरिजा सुतास वदली, जड झाला तूं त्वरीत हें रुप ॥५॥

ऐकुन जननीवचना, गणपति उठला त्वरीत अंकींचा ।

झाडी पदकमलांना, व्योमि उडाला असूर नोपुरिंचा ॥६॥

भूवरि आपटे तेव्हां, मुकला जीवास जेधवां व्योमीं ।

विश्रांति नसे त्याला, असूरपीडा निवारणा कामीं ॥७॥

आणखि एके दिवशीं, आश्रमवासी शिशूसवें कुस्ती ।

खेळे गणेश तेव्हां, मागुन मारी ढुशी मुरा मस्ती ॥८।

मेषासुर नांवाचा, होता राक्षस नटून मेंढा कीं ।

मारी तयास पृष्ठीं, धरिला शिंगांस पाहुनी बल कीं ॥९॥

मेषावर आरुढे, गणपति बालक धरीत शिंगांस ।

धरिला त्वरीत आपटि, भूमीवरि तो त्यजीत प्राणास ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP