मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|क्रीडा खंड|उत्तरार्ध|
अध्याय ८४

क्रीडा खंड - अध्याय ८४

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(गीति)

दुसरे मासीं बालक, निजवी गिरिजा सु-पालकांमाजी ।

कुशल क्षेम असें हें, मूषकरुपें नटोन मुर-माजी ॥१॥

भांडति परस्परांशीं, भांडत येती गजाननापाशीं ।

तेव्हां गजाननानें, लत्ता मारुन पाडिले भूशीं ॥२॥

जाउन प्राण तयांचा, भीषण राक्षस शवें तिथें पडलीं ।

नंतर शिवदूतांनीं, बाह्यप्रदेशास तीं त्वरें नेलीं ॥३॥

तिसरे मासीं गिरिजा, निद्रित असतां असूर ये क्रूर ।

सजुन बिडालक तेथें, बालक मानीं धरीत तो चोर ॥४॥

त्याला गजाननानें, लत्ता मारुन मारिला घोर ।

शिवगण तयास नेती, गिरिखालीं लोटिला बहू दूर ॥५॥

चवथ्या मासी गिरिजा, हळदीकुंकुम करीत थाटानें ।

बालासुर रुपाचा, राक्षस आला कुमारसोंगानें ॥६॥

गेला गजाननाच्या, संनिध ताडी शिरावरी लाथीं ।

दाबी असूर कंठीं, मारुन केला तयापरी साथी ॥७॥

क्रीडाखंडापैकीं, चवथा झाला समूह कवनांचा ।

अर्पी हार प्रभूला, कोमल शमिचा करुन हा साचा ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP