मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|क्रीडा खंड|उत्तरार्ध|
अध्याय ९४

क्रीडा खंड - अध्याय ९४

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(गीति)

खेळे मुलांसवें तो, नानाविधशा प्रकार बहु लीला ।

खेळे बहूत अवधी, भान नसे राहिलें तईं सकलां ॥१॥

मातापितरें आलीं, शोध कराया तया स्थळीं सकळ ।

तेथें गणेश झाला, गुप्त असा तो बघोन तीं सकळ ॥२॥

पुनरपि प्रकटे तेथें, मित्रांना जवल आणिलें त्यानें ।

वदला तयांस तुम्हां, लागतसे कीं क्षुधा बहू पानें ॥३॥

माझ्यासंगें यावें, घालीं भोजन तुम्हांस सुग्रास ।

ऐसें वदोन नेलें, गौतमसदनीं त्वरीत कीं त्यांस ॥४॥

गौतमभार्या दृष्टी, चुकवुन गेला सुपाक सदनीं कीं ।

ओदनपात्र त्वरें तो, उचलुन आणी मुलांस वाढी कीं ॥५॥

थोडा अवधी जातां, गौतमसतिला कळून दोघांस ।

आला प्रकार तेव्हां, गौतम सांगे म्हणून गिरिजेस ॥६॥

गिरिजेस राग आला, सूताचा तेधवां करीं यष्टी ।

घेउन त्वरीत गेली, पळतां सुत तेधवांच ती पृष्ठीं ॥७॥

चोपी सुतास गिरिजा, बंधन केलें समक्ष त्या मुनिच्या ।

कोशांत कोंडिलें कीं, खेळे बाळांसवें पुढें मुनिच्या ॥८॥

कळतां उमेस तेव्हां, पाहे द्वारीं मुलांसवें खेळे ।

वदला गणेश तिजला, गणपति नाहीं तुझा इथें खेळे ॥९॥

ऐसें भाषण ऐकुन, पार्वति गेली गृहांत बघण्यास ।

कोशा त्वरीत उघडी, गणपति दिसला तसाच कीं तीस ॥१०॥

कोशांतुन काढी त्या, बंधन सोडुन त्वरीत घे अंकीं ।

प्राशी दुग्ध तया ती, प्रेमें पाहे शिशूमुखा ती कीं ॥११॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP