मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|क्रीडा खंड|उत्तरार्ध|
अध्याय ८७

क्रीडा खंड - अध्याय ८७

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(गीति)

व्योमाची शतमहिषी, भगिनी होती बहूत खादाड ।

तिज नित्य भोजनासी, शतमहिषे लागती क्षुधामोड ॥१॥

तिजला बंधुवधाचें, वृत्त कळे तेधवां करी शोक ।

गणपतिवधार्थ गेली, मेरु-शिखरीं नटे कशी ऐक ॥२॥

इंद्राची पत्‍नी ती, झाली म्हणते नमून पार्वतिला ।

राक्षस पीडा करिती, पतिविरहाचेंच दुःख हो मजला ॥३॥

माझे नाथ कुठें ते, लपले आहेत हें मला न कळे ।

पार्वति वदते तिजला, हे शचि धरिं धीर कीं अशा वेळे ॥४॥

माझेपरि परमात्मा, उपजे तो देवकार्य करण्यास ।

यास्तव चिंता त्यजुनी, नित्य भजें तूं सु-भाव त्या प्रभुस ॥५॥

सत्कार पुरा झाला, जाउन शय्येवरी करी वास ।

बोले सख्यांस शचि ती, आणा बालक मला बघायास ॥६॥

वाते खरीच शचि ती, समजुन आणी पुढें तिच्या शिशुस ।

पाहे निरखुन शिशु ती, राक्षसि आली मला बघायास ॥७॥

जाणें कपट शिशू तें, ओढी कर्ण नि तसेंच नासीक ।

घाली भार तिचेवर, पर्वत जणूं ठेविला असे ठीक ॥८॥

गेला प्राण शचीचा, पडलें शव त्या सुखासनीं व्यासा ।

शिवगण उचलुन नेती, कळला असुरी स्वभाव हा कैसा ॥९॥

सप्तममासीं तेथें, कमठासुर पातला धरारुप ।

शिवमंदिरापुढें तो, पडला रात्रीं सुशांतसा रुप ॥१०॥

दिनमणि उगवे तेव्हां, ठेविति दासी शिशूस अंगणिं त्या ।

जाणुन गजाननानें, राक्षस माया असूररुपीं या ॥११॥

चवदा भुवनें मिळुनी, एक असा भार घालि असुराच्या ।

देहीं क्षणांत मृत तो, झाला तत्काळ पाहती साच्या ॥१२॥

दासी शिवास कथिती, राक्षस पडला सु-भव्य अंगणिं कीं ।

नेलें सत्वर प्रेता, टाकिती गण दूर नेउनी दरिं कीं ॥१३॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP