मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|क्रीडा खंड|उत्तरार्ध|
अध्याय १३२

क्रीडा खंड - अध्याय १३२

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(शिखरिणी)

सभेमध्यें बोले असुर सकळां गर्व करुनी ।

असा आहे कोणी त्रिजगीं मजसी युद्ध करुनी ॥

स्वयें सामर्थ्यानें अपयश मशीं देइल असा ।

ध्वनी झाला तेथें असुर श्रवणीं जाइल असा ॥१॥

नसे दैत्या गर्वे चढुन वदणें योग्य तुजला ।

उमेपोटीं होई सकल जगताधार असला ॥

प्रभू तूतें मारी झडकरि तुझा माज जिरव ।

अशी वाणी व्योमीं ध्वनित अशि झाली श्रवि रव ॥२॥

(इंद्रवज्रा)

सिंधूर आधीं गिरि आक्रमितो । तेथें नसे शंकर भेटला तो ।

जाई वनीं सत्वर पातला तो । मारावया पार्वति धांवला तो ॥३॥

तेथें प्रभू तो शिशुरुप झाला । इच्छेपरी तो शिशु देखियेला ।

सिंधूर मारी नच पार्वतीला । दोघांस नेई मुर त्या क्षणाला ॥४॥

विचार केला बुडवूं द्वयाला । तेथून गेला मग सागराला ।

केला प्रभूनें जड देह जेव्हां । टाकी शिशूशीं जलिं दैत्य तेव्हां ॥५॥

होती नदी सोज्ज्वल नर्मदा ती । रक्तें खडे ताम्र सुवर्ण होती ।

झालें तिथें कुंड पवित्र नामी । झालें प्रसिद्ध प्रभुकुंड नामी ॥६॥

झाली नदी पावन याच योगें । होती खडे हेच गणेश योगें ।

वाटे तया शत्रु बरा निमाला । कुंडांतुनी भीषण वीर आला ॥७॥

बोले तया शत्रु दुजेंच धामीं । वाढे तुझा शत्रु जगांत नामी ।

बोलोन तो गुप्त तिथेंच झाला । सोडी उमा दैत्य तसाच गेला ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP