मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|क्रीडा खंड|उत्तरार्ध|
अध्याय १२४

क्रीडा खंड - अध्याय १२४

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(गीति)

समरीं सिंधु निमाला, कळलें हें चक्रपाणि जनकास ।

माता उषा नि दुर्गा, करिती शोकास जाति समरास ॥१॥

दुर्गा अंकावरती, सिंधूचें घेउनी शवा करी शोक ।

अनिवार शोक झाला, अवरुन दहना करीत तो तोक ॥२॥

चंदन बेल पुनितशा, काष्ठांची तेधवां चिता रचिली ।

सिंधुसह दुर्गा ती, परलोकींच्या पथास अनुसरली ॥३॥

स्तविलें गजाननाला, भक्तीनें चक्रपाणिरायानें ।

त्यानें आज्ञा दिधली, वर मागें तूं रुचेल तो सुमनें ॥४॥

सदनीं अपुल्या यावें, मागे वर एक वार त्या देवा ।

मयुरावर बैसुनियां, गंडकि नगरींत जाइ तद्भावा ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP