(गीति)
शंकर निद्रित असतां, मस्तकिंचा चंद्र काढुनी सूत ।
गेला खेळायाला, तो तेथें मंगलाख्य मुर येत ॥१॥
झाला होता किरि तों, गणपति पाहे तयास अवचीत ।
धरिला दंतीं ओष्ठीं, चिरला तत्काळ तेधवां त्वरित ॥२॥
इकडे शंकर उठले, मस्तकिंचा चंद्र नाहिंसा झाला ।
करिती शोध तयाचा, गण करवी शोध तो पुरा कळला ॥३॥
शिवगण शिवास म्हणती, मयुरेशाच्या करीं असे चंद्र ।
कथिती शिवास तेव्हां, आणा म्हणती सुतासही चंद्र ॥४॥
गर्वे शिवगण नंदी, गेले अणण्या त्वरीत सूतास ।
दिसतां तयास तेथें, जाती धरण्यास तेधवां त्यास ॥५॥
गुप्तें प्रकते तेथें, जड होई पळवि दूर हुंकारें ।
केलें जर्जर त्यांना, शक्ती जिरवी प्रचूरशा तोरें ॥६॥
शिवचरणांसंनिध तो, बसला आहे गणेशशिरिं चंद्र ।
आहे प्रकार ऐसा, दिसला त्यांना खरोखरी भद्र ॥७॥
शिवगण म्हणती तेव्हां, चंद्र शिरीं नी समीप सूत बैसे ।
बघते झाले शंकर, दिसला शिरिं चंद्र सूतही बैसे ॥८॥
तेव्हांपासून शिवगण, मयुरेशाचाच वर्तती बोला ।
यास्तव गणेश नामीं, सूत शिवाचा प्रसिद्ध तो झाला ॥९॥