मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|क्रीडा खंड|उत्तरार्ध|
अध्याय ८६

क्रीडा खंड - अध्याय ८६

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(गीति)

पार्वति सुतास पाहे, उपवेशन हा विधि करायास ।

आणवि गौतम-मुनिंना, सांगा विधि कीं म्हणे करा त्यांस ॥१॥

गौतम गजाननाचा, उपवेशन हा विधी तिथें करिती ।

ऐशी संधी साधुन, व्योमासुर पातला तिथें सुगती ॥२॥

आश्रम संनिध तरुवर, होता तो त्यामधें शिरे असुर ।

त्यानें तेथें बैसुन, देखियला तो प्रकार जणुं चोर ॥३॥

हलवी वृक्ष बळानें, पडतो आतां खचीत वाटे कीं ।

धामांतुन पळती ते, राहे तेथेम गणेश एकाकी ॥४॥

घामावर वृक्ष पडे, बालक लीलें तयास आकळितो ।

दिधला तेव्हां उडवुन, पडला अवनीवरी जसा गिरि तो ॥५॥

एणेंकरुन सहजीं, व्योमासुर जाहला गतप्राण ।

विधि सांगे व्यासाला, भृगु कथि भूपा करीतसे श्रवण ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP