मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|क्रीडा खंड|उत्तरार्ध|
अध्याय ९६

क्रीडा खंड - अध्याय ९६

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(दिंडी)

सात वर्षें लोटतां गणेशाचीं ।

करी शंभू ती सिद्धता मौंजियेची ॥

आणवि गौतम हें कार्य करायासी ।

बघे मुहूर्ताशीं योग्य तपोराशी ॥१॥

शंभु आज्ञें साहित्य सिद्ध झालें ।

चौल सूताचें कर्म आधिं केलें ॥

अणवि बटुल त्या वेदिकेच पाशीं ।

धरी अंतःपट वेदपूर्णराशी ॥२॥

समय साधाया सर्व सिद्ध झाले ।

तेथे राक्षस तों दोन येत झाले ॥

नाम त्यांचें कीं काळ कृतांतारी ।

नटति दोघे ते मत्त करी भारी ॥३॥

चाल करिती ते जेथ बटू होता ।

सकळ भ्याले ते कठिण समय येतां ॥

भीति बटुसी ती मुळिंच नस त्यांची ।

धरी शुंडा त्या दोन करीं तोंची ॥४॥

बटू आपटि तो एकमेक शीर्षां ।

प्राण जाउनियां रुधिर गळे शीर्षां ॥

पुढति गायत्री मंत्र देत विप्र ।

देत भिक्षा त्या देवऋषीं क्षिप्र ॥५॥

अशा समयासी अदिति ऋषी आले ।

बहुत अदरानें बटुस पूजियेलें ॥

पूर्व अवतारीं प्रकट रुप केलें ।

प्रेमपान्ह्यानें बटुस देखियेलें ॥६॥

मुनी कश्यप तों बटुस बाहुपाशीं ।

कवळि प्रेमानें त्वरित तपोराशी ॥

वदत बटुला ती पूर्ण तातमाता ।

नको विसरुं तूं उभयतांस आतां ॥७॥

वदत त्यांना तो बटुहि प्रेमभावें ।

पुन्हां दर्शन हें देत तुम्हां भावें ॥

करी वचनासी पूर्ण मी स्वभावें ।

वसें जवळी मी चित्त असों द्यावें ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP