मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|उपदेश| मनास उपदेश २१ ते २६ उपदेश संसारिकांस उपदेश १ ते २ संसारिकांस उपदेश ३ ते ५ संसारिकांस उपदेश ६ ते ८ संसारिकांस उपदेश ९ ते ११ संसारिकांस उपदेश १२ ते १४ संसारिकांस उपदेश १५ ते १८ संसारिकांस उपदेश १९ ते २१ संसारिकांस उपदेश २२ ते २५ संसारिकांस उपदेश २६ ते ३० संसारिकांस उपदेश ३१ ते ३६ खलदुर्जनांस उपदेश १ ते ७ खलदुर्जनांस उपदेश ८ ते १३ वेषधार्यांस उपदेश १ ते ५ वेषधार्यांस उपदेश ६ ते ८ वेषधार्यांस उपदेश ९ वेषधार्यांस उपदेश १० ते १२ वेषधार्यांस उपदेश १३ ते १६ वेषधार्यांस उपदेश १७ ते २० वेषधार्यांस उपदेश २१ ते २५ वेषधार्यांस उपदेश २६ ते ३१ वेषधार्यांस उपदेश ३२ वेषधार्यांस उपदेश ३३ ते ३५ वेषधार्यांस उपदेश ३६ ते ४० वेषधार्यांस उपदेश ४१ ते ४५ वेषधार्यांस उपदेश ४६ ते ५० वेषधार्यांस उपदेश ५१ ते ५६ उपासकांस उपदेश जनांस उपदेश १ ते ५ जनांस उपदेश ६ ते १० जनांस उपदेश ११ ते १३ जनांस उपदेश १४ ते १७ जनांस उपदेश १८ ते २० जनांस उपदेश २१ ते २५ जनांस उपदेश २६ ते २८ जनांस उपदेश २९ जनांस उपदेश ३० ते ३५ जनांस उपदेश ३६ ते ४० जनांस उपदेश ४१ ते ४५ जनांस उपदेश ४६ जनांस उपदेश ४७ ते ४८ जनांस उपदेश ४९ ते ५० जनांस उपदेश ५१ ते ५५ जनांस उपदेश ५६ ते ६० मुमुक्षूंस उपदेश १ ते ५ मुमुक्षूंस उपदेश ६ ते १० मुमुक्षूंस उपदेश ११ ते १५ मुमुक्षूंस उपदेश १६ ते २० मुमुक्षूंस उपदेश २१ ते २५ मुमुक्षूंस उपदेश २६ ते ३० मुमुक्षूंस उपदेश ३१ ते ३५ मुमुक्षूंस उपदेश ३६ ते ४० मुमुक्षूंस उपदेश ४१ ते ४५ मुमुक्षूंस उपदेश ४६ ते ५० मुमुक्षूंस उपदेश ५१ ते ५५ मुमुक्षूंस उपदेश ५६ ते ६० मुमुक्षूंस उपदेश ६१ ते ६४ मनास उपदेश १ ते ५ मनास उपदेश ६ मनास उपदेश ७ ते १० मनास उपदेश ११ ते १५ मनास उपदेश १६ ते २० मनास उपदेश २१ ते २६ उपदेश - मनास उपदेश २१ ते २६ संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangnamdevpandurangvitthalअभंगनामदेवपांडुरंगविठ्ठल मनास उपदेश २१ ते २६ Translation - भाषांतर २१.लाजों नको मना हरीच्या कीर्तना । संसार पाहुणा दो दिवसांचा ॥१॥कंठीं नाहीं आइती ह्मणोनि सांडूं नको ज्योति । इतुकिये प्रांती पडूं नको ॥२॥बाळकाचे बोल माउली प्रीति करी । तैसी कीर्ति हरी परिसे चित्तें ॥३॥भलतिया परी बोले बा श्रीहरी । तो भवसागरीं तारील जाणा ॥४॥येणें तारुण्यपणें भ्रमलसि झणीं । भोगिसी पतनी जन्मतरीं ॥५॥तूं होय मागता हरि होय दाता । शरण जांई अनंता ह्मणे नामा ॥६॥२२.बोलिलें वेदांतीं ऐकिलें सिद्धांतीं । बोल नेति नेति अनिर्वाच्य ॥१॥तोचि हा बोल बोलरे मना । बोल नारा -यणा समर्पावे ॥२॥माझा मायबापें सोडवूनि गळा । केशवीं बांधला बोला बोल ॥३॥नामा ह्मणे बोल बोलतांहि बोल । खेचरें दाविला प्रेमभक्ति ॥४॥२३.मन धांवे सौरावैरा । मन मारूनि केलें एकमोरा ॥१॥मन केलें तैसें होय । मन धांवडिलें तेथें जाय ॥२॥मन लांचावलें न राहे । तत्त्वीं बैसलें कधिं नव जाये ॥३॥नामा म्हणे सोहं-शुद्धि । मन वेधलें गोविंदीं ॥४॥२४.सुख दु:ख जिवाचें सांगेन आपुलें । ह्लदय फुगलें फुटों पाहे ॥१॥धरूनि पीतांबर नेईन एकांतीं । सांगेन जिवींची खंती तया पुढां ॥२॥संतसमागमें खेळवील कौतुकें । प्रेमाचें भा-तुकें देऊनियां ॥३॥अंतरींची आवडी तोचि जाणे एक । जिवलग जनक पंढरीरावो ॥४॥नामा ह्मणे ऐसा आहे पैं भरंवसा । मना तूं विश्वासा दृढ धरीं ॥५॥२५.परब्रह्म विश्वाकारें अवतरलें भक्तिकाजा । मूर्ति सु-नीळु सांवळी केशिराजु स्वामी माझा ॥१॥गोविंदारे तुझें ध्यान लागो मना । पाहिजे प्रेमपद निर्मळ होत ज्ञान ॥२॥मन हें वोवरी असे सुमनाचे चित्रशाळी । दोन्ही चरण सुकुमारे वरीं अष्टदळ क-मळी ॥३॥संध्याराग रातले सुनीळ दिशातळवटीं । ध्वज वज्रांकुश चिन्हें साजती गोमटीं ॥४॥इंदिरा तिथें थोकली तिच्या सुखा नाहीं पारु । ते चरणीं स्थिर झाली ह्मणोनि ह्मणती लक्ष्मीवरु ॥५॥घवघवीत वांकी चरणीं ब्रिदाचा तोडरु । नखप्रभा फांकली तिनें लोपला दिनकरु ॥६॥सृष्टि घडीत मोडीत उत्पत्ति स्थिति प्रळय अवघें नवें । तो चतुर्मुख ब्रह्मा चरण पूजितो स्वभावें ॥७॥देवा धिदेव शंभू कैलासींचा राणा । गंगा मुगुटीं धरिला तिचा जन्म अं-गुळीं चरणा ॥८॥दैत्यकुळीं जन्मला देव पळती ज्याचेनि धाकें । पावो पाठीसी लागला ह्मणऊनि दारवंटा राखे ॥९॥शेष वर्णितां श्रमला वेद परतले माघारीं । नामा ह्मणे अरे मना याचे चरण धरीं झडकरी ॥१०॥२६.मनाचें मनपण सांडितां रोकडें । अंतरींचें जोडे परब्रह्म ॥१॥नाथिला प्रपंच धरोनियां जीवीं । सत्य तें नाठवीं कदाकाळीं ॥२॥अझूनि तरी सांडीं नाथिलें लटिकें । तरसील कव-तुकें ह्मणे नामा ॥३॥ N/A References : N/A Last Updated : December 22, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP