|
स्त्री. इंगा ; नांगा . ईर्षा ; मिजास ; मस्ती ; जोर ; गुर्मी ; ताठा ; मग्रुरी . मराठ्यांची रग जिरविल्याशिवाय तें गप्प बसावयाचे नाहींत . ( क्रि० धरणें ; बाळगणें ; येणें ; मोडणें ; जिरविणें ) उत्साह ; जोर ; सहनशक्ति . तीव्रता ; कडकपणा ; प्रभाव ; वेग ; सोसाटा , गळवाचें रक्त काढतांच त्याची रग मोडली . उन्हाची - पावसाळ्याची - वार्याची रग . कळ ; वेदना ; दुःख ; अवघडणें . ( क्रि० लागणें ; येणें ) टवकारुनी दृष्टि लावूनिया रग । दावी झगमग डोळ्यापुढें । - तुगा ४०७ . धमनी ; नस ; स्नायु ; शीर ; नाडी . मिठी मारा सळसळती सार्या रगा । - प्रला १३१ . वेदना ; पोट , हातपाय , डोकें , डोळे इ० अवयवांमध्यें सारख्या होणार्या कळा . [ फा . रग = धमनी ] ( वाप्र . ) ०जिरविणें मोडणें - खोडकी जिरविणें ; खोड मोडणें ; शासन करुन एखाद्याचा ताठा नाहींसा करणें . ०जिरणें उतरणें - मस्ती शमणें ; नरम येणें . मदनरगा या त्वरितगती जिरुं देरे । - प्रला १८७ . मणगटाला रग लावणें रग लावणें - मनगट घट्ट पकडणें ; अवळून धरणें ; पिळणें ; वेदना होतील अशा रीतीनें दाबणें . कामाची रग - कामाची आच , त्रास , घाई ; जाचणूक . ( क्रि० लावणें ; लागणें ) सावकाराची रग देणेदाराची रग - स्त्री . सावकारानीं किंवा देणेदारांनीं मागें लाविलेली टोचणी , तगादा , त्रास , दुःख ; छळणूक . सामाशब्द - रगदार - वि . जोरदार ; पाणीदार ; मस्त ; रगेल , उन्मत्त ; मिजासखोर ; ऐटबाज . जिवंत ; उत्साही ; ईर्षेबाज तगडा ( मनुष्य , पशु इ० ). रग पहा . रगदारी - स्त्री . उत्साह ; ईर्षा ; कस ; जिवंतपणा ; चैतन्य . रगमोड - स्त्री . गर्वहरण ; मानहानि ; नाक खालीं होणें ; मस्ती घालविणें ; जाणें . रगेल - वि . अंगांत पुष्कळ रग असलेला . ( मनुष्य ; घोडा ); ताठलेला ; गर्विष्ठ ; मस्त ; गुर्मीखोर अहंमन्य ; मिजासखोर ; बेगुमान ; दिमाखी .
|