|
स्त्री. १ ( धातु , लोणी , मेण इ० ) तापल्या - कढविल्या - वितळविल्यावेळीं गेलेला भाग ; जळालेला , वायां गेलेला भाग ; जळून , तापून कमी आलेला भाग . २ भांडयाच्या बुडाची मस करप . - पु . १ राग ; संताप रोष . त्याला शिवी देतांच जो जळ आला आणि तोंडावर चाखविली . २ आवेश ( वाईट अर्थी ) ताठरपणा ; रग ; दुराग्रह . जिद्द . ३ जळफळाट ; अढी . [ जळणें ] स्त्री. पटईमधील दोन फळयांच्या सांध्यावरील तुकडा , रीप . जंती पहा . ०कट जळका - वि . थोडासा जळलेला , होरपळलेला , करपलेला , भाजलेला . जळका - पु . ( नाशिक ) १ फार उष्णता , लाही ( शरीराची ). २ जोराची खाज , कंडु . ( क्रि० सुटणें ; होणें ). ३ पित्तापासून घशांत जळजळणें . खवखवणें ; पोटांत डांचणें ; आग होणें . ४ हेवा . मत्सर ; जळफळाट , जळ . ( क्रि० येणें ). जळके - न . ( राजा . ) भात शेतीस होणारा एक रोग . - वि . जळकट .
|