|
पु. स्वर्ग . ते नाके ( नासिका ) नाक ( स्वर्ग ) माज्या चित्ताचे हा विमूढ लाजेना । - मोमंरा किष्किंधा १ . १० . [ सं . ] न. १ घ्राणेंद्रिय ; नासिका . २ ( ल . ) धान्य , बटाटे इ० काला ज्या ठिकाणी मोड येतो ती जागा ; डोळा . ३ सुई , दाभण इ० काचे भोंक ; नेडे . ४ ( कुटुंब , सभा इ० कांचा ) मुख्य उत्कृष्ट मनुष्य ; देशांतील मुख्य शहर किंवा किल्ला . पुणे हे देशाचे नाक आहे . ५ नथेकरितां नाकास पाडलेले भोंक , छिद्र . नाक तुटणे , बुजणे . ६ धीटपणा ; दम ; खात्री . निलाजरेपणा ; उजळ माथा . तेथे मी कोणत्या नाकाने जाऊं . ७ अब्रू ; चांगली कीर्ति , नांव . माझे नाक गेले , गमावले . [ सं . नासिका ; प्रा . णक्क ; फ्रेंजि . नख ; पोजि . नकी ] ( वाप्र . ) पु. नाईक याचें संक्षिप्त रुप हें महार , बेरड वगैरेंच्या नांवापुढें लावतात . उदा . रामनाक , सिदनाक .( नायक ) ०ओरबाडणे नाकांतील अलंकार हिसकून घेणे . ०कापणे खोडकी , गर्व जिरविणे ; पराभव करणे ; ( आपले ) कापून दुसर्यास अपशकून , अवलक्षण करणे दुसर्याचे नुकसान व्हावे म्हणून आपला स्वतःचा नाश करुन घेणे . ०कापून पुसणे - एखाद्याची मोठी अप्रतिष्ठा करुन नंतर थोडा सन्मान करणे . पाटावाने पुसणे - एखाद्याची मोठी अप्रतिष्ठा करुन नंतर थोडा सन्मान करणे . ०खाजविणे चिडविणे . ०खाली - पाडणे - होणे - गर्व नाहीसा होणे , करणे ; मानहानि होणे . पडणे - पाडणे - होणे - गर्व नाहीसा होणे , करणे ; मानहानि होणे . ०गुंडाळणे आपला कमीपणा , पराभव कबूल करणे ; शरण जाणे ; क्षमा मागणे . ०गेले भोके राहिली आहेत असे म्हणणे - पुन्हा निर्लज्जपणे बोलणे ; वागणे ; मागील गुन्ह्याची लाज सोडून चालणे . तरी भोके राहिली आहेत असे म्हणणे - पुन्हा निर्लज्जपणे बोलणे ; वागणे ; मागील गुन्ह्याची लाज सोडून चालणे . ०चिरुन भरणे - एखाद्यास फजीत करणे ; नकशा उतरविणे . मीठ भरणे - एखाद्यास फजीत करणे ; नकशा उतरविणे . ०घासणे १ आर्जव , खुशामत करणे ; हांजी हांजी करणे . २ क्षमा मागणे ; चूक कबूल करणे . ०चेचणे ठेचणे - १ फजीती , पारिपत्य होणे , करणे . २ नक्षा उतरणे ; खोड मोडणे . ०जळणे नाकांतले केस जळणे - फार दुर्गंधि येणे . ०झाडणे १ नाक चेचणे ; तिरस्कार दाखविणे ; ताठा , गर्व , उतरविणे . २ नाक शिंकरणे . ३ घोडा इ० जनावराने जोराने नाकांतून वारा काढणे . ०तोंड - नापसंति दर्शविणे ; नावे ठेवणे . मुरडणे - नापसंति दर्शविणे ; नावे ठेवणे . ०तोडून खावणे - भीक मागण्याकरिता लाजलज्जा सोडून देणे ; अगदी लोंचट बनणे . कडोस्त्रीस खावणे - भीक मागण्याकरिता लाजलज्जा सोडून देणे ; अगदी लोंचट बनणे . ०धरणे वाट पहावयास लावणे ; खोळंबा करणे . ०धरल्यास दाबल्यास तोंड उघडणे - एखाद्यास पेंचात धरल्याशिवाय तो आपल्या म्हणण्यास कबूल होत नाही या अर्थी . ( नाक व तोंड यांनी श्वासोच्छवास होतो . त्यापैकी एक दाबले तर दुसरे उघडावेच लागते ). किंवा दाबल्यास तोंड उघडणे - एखाद्यास पेंचात धरल्याशिवाय तो आपल्या म्हणण्यास कबूल होत नाही या अर्थी . ( नाक व तोंड यांनी श्वासोच्छवास होतो . त्यापैकी एक दाबले तर दुसरे उघडावेच लागते ). ०धरुन - ( प्राणायामावरुन ) धार्मिक कृत्यांत गुंतलेला असणे , वेळ घालविणे ( ल . ) कर्तव्य न करतां वेळ गमावित बसणे . बसणे - ( प्राणायामावरुन ) धार्मिक कृत्यांत गुंतलेला असणे , वेळ घालविणे ( ल . ) कर्तव्य न करतां वेळ गमावित बसणे . ०पुड्या - फुलविणे - फुगविणे - फुरफुरविणे - फेंदरणे - रागाने खेंकसणे ; अंगावर जाणे ; नाक फुगवून राग दाखविणे . पिंजारणे - फुलविणे - फुगविणे - फुरफुरविणे - फेंदरणे - रागाने खेंकसणे ; अंगावर जाणे ; नाक फुगवून राग दाखविणे . ०फेडणे नाक शिंकरणे . ०नाक धरुन जाणे - निरुपायस्तव , नाइलाजाने शरण जाणे ; अभिमान सोडून जाणे . मुठीत धरुन जाणे - निरुपायस्तव , नाइलाजाने शरण जाणे ; अभिमान सोडून जाणे . ०मुक्यापुढे - चिडविणे ; क्षोभविणे . खाजविणे - चिडविणे ; क्षोभविणे . ०मुरडणे मोडणे नाक वाकडे - तिकडे करुन नापसंति दाखविणे . ०मुष्ट्या - ( व . ) हिणविणे ; नाराजी दर्शविणे . नाकमुष्ट्या हाणूं हाणूंच बेजार , स्वतः तर काम होईना . हाणणे - ( व . ) हिणविणे ; नाराजी दर्शविणे . नाकमुष्ट्या हाणूं हाणूंच बेजार , स्वतः तर काम होईना . ०मोडणे फजीती उडविणे ; गर्व उतरविणे . ०लावून करणे )- क्रिवि . धिटाईने ; निलाजरेपणे . ( करणे )- क्रिवि . धिटाईने ; निलाजरेपणे . ०वर - वर करुन चालणे - वर असणे - १ दिमाख , ताठा , गर्व , निर्लज्जपणा दाखविणे ; वरचढ असणे . २ स्वतः दोषी असतांनाहि दिमाख दाखविणे ; शरम न वाटणे . करणे - वर करुन चालणे - वर असणे - १ दिमाख , ताठा , गर्व , निर्लज्जपणा दाखविणे ; वरचढ असणे . २ स्वतः दोषी असतांनाहि दिमाख दाखविणे ; शरम न वाटणे . ०वाहणे पडसे येणे . ०सावरणे ( बायकी ) मूल जन्मल्याबरोबर त्यास न्हाऊ घालतांना त्याच्या नाकात तेलाचे एकदोन थेंब सोडून त्याच तेलाच्या हाताने नाकाच्या वरच्या भागापासून शेवटपर्यंत हलके चोळणे . नाकाची घाण मरणे जाणे १ संवईमुळे किंवा पडशामुळे वास न येणे ; संवय होणे . २ ( ल . ) वाइटाचा तिरस्कार न येणे . नाकांत काड्या घालणे चिडविणे ; टोमणे मारणे ; कुरापत काढणे ; ( एखाद्यास ) चीड येईल असे कृत्य करणे . हरिच्या पुनःपुन्हां कां काड्या काड्या नाकांत घालिशी शशका । - मोसभा ४ . ८४ . नाकांत काड्या जाणे रुसणे ; चिडणे ; राग येणे . नाकांत काड्या जाणे रुसणे ; चिडणे ; राग येणे . नाकांत दम येणे ( माळवी ) नाकी नऊ येणे . नाकांत बोलणे नाकातून , गेंगाण्या स्वरांत शब्द काढणे ; अनुस्वारयुक्त बोलणे ( कोंकणी लोकांप्रमाणे ). नाकातोंडाची गुंजडी करणे ( नाक , तोंड आवळून , चंबूसारखे करुन ) राग किंवा नापसंति दाखविणे . उंच्या नाकाने ( करणे , बोलणे , वागणे , फिरणे )- मिजासीने , निलाजरेपणाने , ( करणे इ० ). नाकाने कांदे वांगी सोलणे १ नसता , खोटा शूचिर्भूतपणा दाखविणे ; उगीच पावित्र्याच्या गोष्टी सांगणे . २ एखादे वेळी फार चोखंदळपणा करणे पण एरवी वाटेल तसे वागणे ( ढोंगीपणा दाखवितांना वापरतात ). नाकापेक्षा मोती जड होणे ( एखाद्याच्या अंगचा खरा गुण लोकांच्या अपेक्षेहून कमी आहे असे निदर्शनास आल्यावर योजतात ) एखाद्या गौण वस्तूला अधिक महत्त्व प्राप्त होणे ; कनिष्ठ दर्जाचा मनुष्य वरिष्ठाहून वरचड होणे ; ( नाकास शोभा आणण्याकरितां मोती असते पण ते जड झाले तर नाकास इजा होईल यावरुन ). तुल० सासूपेक्षां सून अवजड . नाकाला जीभ लावणे तिरस्कार दाखविणे ; गर्व ; ताठा , दिमाख दाखविणे . नाकाला झिमोटा घालणे तिरस्कार दाखविणे ; नाक मुरडणे . नाकावर असणे अगदी तयार असणे . राग कसा त्याच्या अगदी नाकावर आहे . नाकावरची माशी तरवारीने हाणणे ( व ) लवकर राग येणे . नाकावर निंबु घासणे पिळणे प्रतिपक्ष्यास न जुमानतां आपले कार्य साधणे ; प्रतिपक्ष्यास चीत करणे . नकाला पदर लावणे , लागणे १ लज्जेने , अपकीर्तीमुळे तोंड झांकणे . २ घाणीचा तिरस्कार करणे . नाकावर टिचणे १ एखाद्याचे पैसे ताबडतोब देणे . २ काकूं न करतां , अडथळ्यास न जुमानतां एकदम देणे , करुन टाकणे . नाकावर पदर येणे १ वैधव्य येणे . २ लाजेने लपून एकांतवासांत बसणे . नाकावर पाय देणे विरोधाची पर्वा न करणे ; प्रतिपक्ष्यावर मात करणे . नाकावर बोट ठेवणे गुप्त ठेवण्यास किंवा गप्प बसण्यास सांगणे ; ( रागाने किंवा अन्य कारणाने एखाद्यास ) दबकावणे . नाकावर माशी बसूं न देणे अतिशय चिडखोर , क्रोधी असणे ; अपमान किंवा तिरस्कार अगदी सहन न होणे ; थोडे देखील उणे बोलणे न सोसणे . जागृदवस्थेत जसी नासाग्री बैसली नरा माशी । - मोगदा ५ . २ . नाकावर म्हशीने पाय देणे नाक नकटे , बसके , चपटे असणे . नाकावर वाट करणे विरोधास न जुमानता काम सिद्धीस नेणे , करणे ; नाकावर पाय देणे . नाकाशी सूत धरणे अगदी मरणोन्मुख होणे ( मरतांना श्वास आहे की नाही हे पाहण्याकरितां नाकाशी सूत धरतात ). नाकास चुना लावणे नाकावर लिंबू पिळणे , पाय देणे पहा . सोसे कुलजा मृत्यु , न अयशाचा सोसवे चुना नाकी । - मोद्रोण २१ . ५८ . नाकास पदर येणे बेअब्रू होणे ; लाज वाटणे ; मानखंडना होणे . नाकास मिरची झोंबणे एखादी गोष्ट मनास लागणे ; वर्मी लागणे . नाकासमोर जाणे अगदी सरळ मार्गाने जाणे . नाकाहोंटावर जेवणे चाखतमाखत खाणे ; चोखंदळपणाने जेवणे . ०दुराही नाकधुर्या काढणे - १ अति नम्रपणाने विनविणे ; शरण जाणे ; क्षमा मागणे . सद्गति दे म्हणुनिच तो जाणा काढी मयूर नाकधुर्या । - भक्तमयूर्केकावली प्रस्तावना . २ कृतापराधाबद्दल प्रायश्चित्त भोगणे . नाकी नव - नळ येणे - १ अतिशय कंटाळणे ; दमणे ; भागणे ( कामाने , श्रमाने ). २ ( नऊ इंद्रियांची शक्ति नाकांत येणे ) मरण्याच्या दारी असणे . नाकी वेसण घालणे - एखाद्यास कबजांत , कह्यांत ठेवणे . नाकी - नाकचा नाकाचा बाल - अत्यंत आवडता , जिवलग , मोलवान माणूस ; गळ्यांतील ताईत ; मोठ्याच्या परम प्रीतींतील दुर्जन ( नाकांतील केंस काढतांना फार त्रास होतो म्हणून त्यांस फार जपतात त्यावरुन ). म्ह ० ( व . ) १ नाक नकट तोंड वकट = कुरुप , अष्टावक्र अशा माणसास उद्देशून म्हणतात . २ नाकांत नाही कांटा , रिकामा ताठा -( बायकी , सोलापूरी ) ३ ( गो . ) नाक गेल्यावर काय माझी चवरी गोंडा हाय = निलाजरा मनुष्य आपली कितीहि अब्रू गेली तरी पुन्हां नाक वर करतोच . सामाशब्द - ०चिंबा वि. बसल्या नाकाचा ; नकटा . ०तोडा तोड्या पु . १ एक मोठ्या जातीचा टोळ . २ गवत्या टोळ ( नाक तोडतो यावरुन ). ०दुर राई , ०धुरई धुराई धुरी स्त्री . १ पश्चात्ताप दाखविण्यासाठी नाक घासणे . माझ्या अपमानाबद्दल त्याने किती जरी नाकधुर्या काढल्या तरी ... बोलायची नाही . -- बाबं ४ . ३ . २ ( ल . ) नम्रतेची विनंति ( क्रि० काढणे ). ०पट्टी स्त्री. ( मल्लविद्या ) जोडीदाराच्या कानावरुन व गालावरुन आपल्या हाताची पोटरी जोडीदाराच्या नाकपुडीवर दाबून वर दाब देऊन त्याला चीत करणे . ०पुडी स्त्री. नाकाचे एक पूड ; नासारंध्र . [ सं . नासापुट ] म्ह ० ( व . ) नाकपुडीत हरिकीर्तन = लहान जागेत मोठे कार्य करावयाचे झाल्यास म्हणतात . ०भुंकन वि. नाकावर भोवरा असलेला ( घोडा ). नासिकावर्त पहा . - मसाप २ . ५७ . ०मोड स्त्री. नकार दर्शविणे ; तिरस्कारयुक्त नापसंती . ०वणी न. १ तपकीर ; नस्य . २ नाकांत ओतावयाचा तीक्ष्ण पदार्थ . नाकवणी चुनवणी । - दा ३ . ७ . ६८ . एका देती नाकवणी । काळकुटाचे । - ज्ञाप्र २९५ . [ नाक + वणी = पाणी ] ०शिंकणी स्त्री. एक वनस्पति ; भुताकेशी ; हिच्या पानाच्या वासाने शिंका येतात . ०शिमरो वि. १ ( गो . ) नकटा . २ निलाजरा . [ नाक + शिमरा = बसके ] ०सूर पुअव . नाकांतून बाहेर पडणारी हवा , श्वास . ( क्रि० वाहणे ; बंद होणे ). ०सुरॉ वि. ( गो . ) नाकांतून येणारा ( आवाज ); गणगणा ; गेंगाणा . नाकाचा दांडा वासा पु . नाकाचे लांबट हाड . नाकाचा पडदा , नाकाची पडदी , नाकाची भिंत पुस्त्री . दोन नाकपुड्यांतील पडदा . नाकाच शेंडा नाकाची बोंडी पुस्त्री . नाकाचा अग्रभाग . नाकाची कवळी करप ( गो . ) कंटाळणे . नाकाटणी , नाकाटी स्त्री . रग जिरविणे ; नक्षा उतरविणे ; खरडपट्टी काढणे ; नाक खाली करावयास लावणे . ( क्रि० करणे ). [ नाक + काटणी ] नाकाटणे नाकाटणी पहा . नाकाड डा नपु . ( निंदार्थी ) १ मोठे नाक . २ डोंगराचा पुढे आलेला नाकासारखा भाग . या नाकाडाचे पलीकडे आपला गांव आहे . ३ भूशिर ; जमीनीचे टोंक . ४ आंब्याच्या फळाचा मागील बाजूचा नाकासारखा उंच भाग . नाकाड ड्या वि . मोठे आणि कुरुप नाक असणारा . नाकडोळ्याचा ( कानाचा ) वैद्य पु . साधारण , कामचलाऊ वैद्य . वैद्यकविद्येत फारसा वाकबगार नसलेला वैद्य ; वैदू . नाका डोळ्याने सुरेख वि . सुस्वरुप ; देखणा ; रेखीव बांध्याचा . नाकादाई स्त्री . ( व . ) खोड . खरडपट्टी . ( क्रि० काढणे ). खूप नाकादाई काढली आधी , मग जेवूं घातले . नाकावर रडे न . रडण्याची तयारी , तत्परता ; लवकर रडूं येणे . नाकावर राग पु . चिडखोरपणा ; ताबडतोब रागावणे . नाकीचे मोती न . नथ ; बुलाख . नाकीचे मोती सुढाळ । - ह ५ . १९७ . नाकील वि . सरळ , लांब व सुंदर नाक असणारा . नाकेला पहा . नाकुस्ती , नाकोस्ती , नाकुष्टे , नाकोष्टे स्त्रीन . नापसंति ; नकार दाखविण्याकरितां तिरस्काराने नाक मुरडणे . ( क्रि० मारणे ; देणे ; हाणणे ). नाकेल ला वि . नाकील पहा . नाकेला अन गुलजार । सांवळा नि सुंदर भासे । - बाल शिवाजी . नाकोटा टे पुन . ( निंदार्थी ) नाक .
|