|
स्त्री. १ चाल ; हल्ला ; परचक्र ; दरवडा ; घाला ; एकदम येणारा , पसरणारा , नाश करणारा , हल्ला . संकट ( उदा० शत्रूचा हल्ला , चोरांचा दरोडा , टोळ , अग्नि यांपासून नाश ). ( क्रि० घालणे ; मारणे ; पडणे ; बसणे ). तुम्हावरी येत आहे धाडी । - नव २५ . १० . अग्नीची धाड त्याचे घरावर पडून सर्वस्व जळले . गांवावर नुकतीच टोळांची धाड आली होती . २ परके लोक , पाहुणे , मुले , भिकारी इ० चे टोळके , जमाव . यांचे एकदम येणे . ३ रोग ; आपत्ति ; विकार . ( क्रि० होणे ; भरणे ; पडणे ). त्याला येथे येण्यास काय धाड भरली आहे ? ४ त्रासदायक , हट्टी मुलालाहि लावतात . [ सं . धाटी ; प्रा . धाडी ] स्त्री. मागावरील हत्या , ( ज्यांत फणी बसविलेली असते ती चौकट ). वह्या अडकविण्याचे साधन . स्त्री. ( गो . ) वाघाची वाट , माग . ०पडणे ( उगीच अडचणी सांगणार्या बद्दल वापरतात ). संकटांत असणे ; आपत्ति ओढवणे . तुला काय धाड पडली आहे एवढे ओझे उचलावयास . ०बडवणे धाड भरणे . काय धाड बडवली आहे त्याला ? - माटे - अस्पृश्यडायरी पाने . ०घोडा पु. १ सुंदर व मोठा पाणीदार घोडा ( गरीबास हा बक्षीस दिला असतां त्याच्यावर एक धाडच पडल्यासारखे होते यावरुन ). २ आडदांड व लठ्ठंभारती पोरगा ; ढमाली , रानवट स्त्री . म्ह ० धाड पडावी पण चीत पडूं नये = आपणावर टोळधाड इ० घाले आले तरी हरकत नाही पण चित्रा नक्षत्राचा पाऊस मात्र पडूं नये ( कारण हा पाऊस नव्या पिकाला मारक आहे ).
|