Dictionaries | References

वृध्द

   
Script: Devanagari

वृध्द     

वि.  
  1. वयातीत ; म्हातारा ; जरठ . वृध्द तपस्वी पितृपद सेवन सर्वस्व पुंडरीक मुनी । - भक्तमयूरकेका १२ .
  2. पूर्ण वाढ झालेला ; योग्य विकास पावलेला .
  3. मोठा ( गुणादिकानीं ); ( शहाणपण , ज्ञान इ० त ) प्रगति झालेला . ( समासांत ) विद्यावृध्द ; वयोवृध्द ; तपोवृध्द ; ज्ञानवृध्द .
  4. श्रेष्ठ . तरी अवघाचि गुणीं वृध्द । जे महर्षीमाजि प्रबुध्द । काश्यपादि प्रसिध्द । सप्तऋषी । - ज्ञा १० . ९२ .
  5. वृध्दि पावलेला ; जमून , सांठून वाढलेला ; पूंजीभूत . [ सं . ]

०कपि  पु. 
  1. जख्ख , फार म्हातारा .
  2. ( ल . ) चांगला अनुभवी ; मुरलेला . पंचवीस वर्षे काम केलेले वृध्दकपी कौन्सिलर सांगतात . - टि २ . १४६ .
  3. ( विशेषतः अनादरानें ) वृध्द गृहस्थ . तुझ्या ओळखीच्या गृहस्थाकडे गेलों आणखी ते एखादे जर कां वृध्दकपी असले तर आपल्या हिंडण्या फिंडण्याला विनाकारण अडथळा यायचा . - पिंगला . [ सं . ]

०काक  पु. ( म्हातारा कावळा ) टणक , निरोगी वृध्द गृहस्थास योजतात . काटक म्हातारा .
०गंगाधर  न. एक प्रकारचें औषधी चूर्ण ( संग्रहणी , अतिसार यांवर देतात ) - योर १ . ४४८ .
चूर्ण  न. एक प्रकारचें औषधी चूर्ण ( संग्रहणी , अतिसार यांवर देतात ) - योर १ . ४४८ .
०पतंग  पु. मावळणारा सूर्य तया गीती तेणें उणिव क्षण ये वृध्द पतंगा । - वामन , विराट ८ . १२ . [ सं . पत ( तं ) ग = सूर्य ]
०परंपरा  स्त्री. 
  1. मागच्या वृध्दवृध्द माणसांकडून चालत आलेली वहिवाट , चाल .
  2. ( ल . ) प्रमाणभूत , पूज्य आचार , वर्तन .

०प्रमदा   , भठ - तरुणी दांपत्य न्याय , ( प्रमदा = अतिशय मदनावेग असलेली स्त्री तिच्यापुढें वृध्द पुरुष न टिकून त्याची फजिती होते यावरून ). हे अवहेलना करणारे मात्र कल्पनेचे जड ठरून वृध्दप्रमदा न्यायानें उपहास्य होतात . - नि ७९ .
न्याय   , भठ - तरुणी दांपत्य न्याय , ( प्रमदा = अतिशय मदनावेग असलेली स्त्री तिच्यापुढें वृध्द पुरुष न टिकून त्याची फजिती होते यावरून ). हे अवहेलना करणारे मात्र कल्पनेचे जड ठरून वृध्दप्रमदा न्यायानें उपहास्य होतात . - नि ७९ .
०संघ  पु. वयोवृध्द मंडळीची सभा ; वडील माणसांचा संघ [ सं . ]
०जीविका  स्त्री. व्याजावर किंवा सावकारीच्या धंद्यावर उपजीविका ; सावकारी .
०प्रमाण  न. ( गणित , भूमिति श्रेढी ) वाढीचें प्रमाण . [ सं . ]
०श्राध्द  न. नांदीश्राध्द .
०सूतक  न. सोयेर . सूतक पहा .
वृध्दिंगत वि.  वाढीस लागलेलें ; प्रगति होत असलेलें ; वाढणारें ; वृध्दि पावत चाललेलें .
वृद्‍ध्याजीव  पु. सावकारी करणारा माणूस .
वृध्दाचार  पु. वृध्दपरंपरेनें चालत आलेली , पूर्वापार वहिवाट , रिवाज ; पूर्वजांची , वडील माणसांची अतएव आदरणीय रीत . परमामृते भरूनि वाटी । देवकी लावी सुनेच्या वोटीं । पुसे वृध्दाचार गोष्टी । सुने घालीली पोटीं निजमाये । - एरुस्व १८ . ३८ . - एभा १३ . १५४ .
वृध्दाचारीचे देव  पु.अव. जुने देव ; कुलदेवता . वृध्दाचारीचे पूजिले देव । - दावि ३३ . [ वृध्द + आचार ]
वृध्दापकाळ  पु. म्हातारपण ; म्हातारपणचा काळ ; वार्धक्य . कठिण काळीं वृध्दापकाळीं । सर्वकाळीं अंतकाळी । नामस्मरण असावें . - दा ४ . ३ . १४ .
वृध्दाप्य पहा .
वृध्दाप्य  न. 
  1.  म्हातारपण . [ वृध्द + अवस्था ( आकार , वय , संपत्ति , दर्जा इ० ची ). रिगे मन्वंतर मनूपुढें । वंशावरी वंशांचे मांडे । जैसी इक्षुवृध्दी कांडेनकांडें । जिंके जेवीं । - ज्ञा १५ . १२८ .
  2. व्याज ; वाढ ; ( उसना दिलेला पैसा , धान्य इ० ची ) वाढी .
  3. सोयेर ; घरांत कोणी प्रसूत झालें असतां येणारें अशुचित्व .
  4. चंद्र व सूर्य यांच्या कलांची वाढ ; चढती दशा .
  5. सूर्योदयापूर्वी सुरू होऊन दुसर्‍या सूर्योदयानंतर संपणारा चांद्रदिवस किंवा तिथि . नक्षत्र , योग यांचें आधिक्य .
  6. अंडवृध्दि .
  7. ( व्या . ) अ , इ ( ई ), उ ( ऊ ), ऋ यांच्या बद्दल अनुक्रमें आ , ऐ , औ व आर हे वर्ण येणें . 
  8. पु . ज्योतिषशास्त्रांतील सत्तावीस योगांपैकीं अकरावा योग .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP