Dictionaries | References

उटणें

   
Script: Devanagari

उटणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English

uṭaṇēṃ n A composition of fragrant ingredients to rub on the body. 2 The application of this composition.

उटणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  A composition of fragrant ingredients to rub on the body.
v t   Rub, scour, scrub.

उटणें     

 न. 
उ.क्रि.  
माखणें ; चोपडणें ; लावणें ; चर्चिणें . श्रीमहादेवो कापुरें उटिला ॥ - ज्ञा ११ . २२२ . हळदी भीनली हेमकळा । तेणें उटिलें मुखकमळा । - एरुस्व ७ . ३४ . भीमकी सुकुमार गोमटी । कृष्णा इसीं हळुचि उटीं । - एरुस्व १६ . ८७ .
अंगास लावण्यासाठीं केलेला अर्गजा इ . सुगंधी पदार्थ ; उटी . उटणें लावूनि घातलें स्नान . - कमं ५७ . कां सूर्याचिया आंगा उटणें । लागत असे ॥ - ज्ञा १० . १० .
( राख , माती इ . नीं भांडें वगैरे ) घांसून साफ करणें . हां हो उटोनिया आरिसा । - ज्ञा ११ . १५७ . कापुरासी काय लावुनी उटावें । काय ओवाळावें दीपकासी ॥ - तुगा ४४२३ . अन भांडीं उटाया गेलों होतों . - सागो प्र . १ . १ .
उटी ; उटणे अंगाला लावणें , माखणें ; मर्दन . [ सं . उद्वर्तन ; का . ऊटणे = अंगाला तेल , लेप लावणें ]
धुणें . वृध्द परंपरा ऐसी आहे । वरचरण उटी वोहमाये । - एरुस्व १४ . ८९ . मग ते मंगळरुप पाऊलें । ते सुमेधेनें उटिलें ॥ वेसीस्व ९ . २९ . क्षणभंगुर जाउनी दु : ख मायीक लोटलें । वदन उटिलें । रोमांच आंगीं उठले ॥ - पला ४५ . [ सं . उद्वर्तन ; हिं . उवटन ; गु . उटणु ; सिं . उवटणु ; का . उटणी - णें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP