|
स्त्री. एक झाड ; यांचें मूळ , मुळापासून तयार केलेली पूड ; हळ्कुंड . [ सं . हरिद्रा ; प्रा . हलिद्द ] म्ह० पी हळद आणि हो गोरी = उतावीळपणाबद्दल योजतात . आजपर्यंत लोकांनी जी मोडमोठाली कामें उरकली , ती लागलीच पी हळद हो गोरी या न्यायावर उरकली नाहित . - निच ( वाप्र . ) ०उतरणें लग्नांत वधुवरास लाविलेली हळद मंगलस्नान घालून समारंभाने काढून टाकणें . - ऐरापुविवि १४९ . ०काढणें ( क . ) बाळंतपण , लग्न इ० उरकल्यानंतर त्यांतून मोकळीक देण्यासाठी स्नान घालणें . आज हळद काढावयाची आहे तेव्हां गूळपोळयाचे जेवण आहे . ०खेळणें ( कर्हाड ) विवाहांत नवरानवरीनी स्नानाचे वेळी एकमेकांवर हळद उडविणे . ०लाग णें - १ ( विवाहाचे वेळी वधूवरास प्रथम हळद लावून मंगलस्नान त्यावरून ) विवाह संस्कार होणें २ वैभवास मानमान्यतेस चढणें ; भाव वाढणें . ३ ( ल . ) दुर्मिळ होणें . हल्ली भाद्रपद महिना , भटांना काय हळद लागली अहे ; तेव्हां आम्ही पक्ष लांबविला . हळदीचा डाग लागणें , विटाळ होणें - लग्न झाल्यावर थोडेच दिवसांत नवरा किंवा बायको मरणें . हळकुंड , हळखुंड - न . हळदीच्या मुळाचें कुडे ; ( गो . ) हळकुटा [ हरिद्राखंड ] म्ह० अर्ध्या हळकुंडाने पिवळें होणें = थोडयाशा यशानें , प्राप्तीने , गर्वानें ताठून जाणें . हळकुंडासाठी लग्न मोडणें - एखादी क्षुल्लक बाब न जुळल्यामुळें मोठे जुळत आलेले असून तें मोडून टाकणें . हळदकुंकू , विडे , हळदीकुंकू , विडे - न . पुअव . चैत्रांत किंवा नवरात्रांत सुवासिनी स्त्रियांनी परस्परांस कुमारिकांस वांटावयाचे सौभाग्यदर्शक हळद व कुंकू आणि विडे देणे व ओटया भरणे इ० समारंभ . शेजारच्या मुली आपल्या सासरी जाऊं येऊ लागल्या म्हणजे पुष्कळ वेळां सरोजिनीला हळदीकुंकू करण्याची पाळी येई . - झामू . हळदवणी - पु . ( कु . ) एक ग्रामचार . हळद लेकूरवाळी - स्त्री . एक प्रकारचे फांद्या फुटलेले हळकुंड . हें शुभ मानतात व लग्नांत घाण्यासाठी घेतात . हळदिवा , हळदुवा - वि . हळदीरंगाचा ; पिवळा . [ सं . हळद + इव ] हळदीचा गाभा - पु . अत्यंत सुंदर रंग , अंगकळा हळदुली - स्त्री . हळद लावण्याचा समारंभ . उटिली वधूवरें हळदुली स्वानंदे । - एकनाथ . हळदुटणें , हळदुष्ण - न . ( तंजा . ) सुनमुखानंतर वधूवर परस्परांस हळदकुंकू , पानसुपारी इ० देतात तो समारंभ . [ हळद + उटणें ] हळदेमाळी - पु . हळद पिकविणारा माळी . हळद्या - पु . १ कावेळी सारखा एक रोग ( माणूस , झाड इ० स होतो ). २ एक जातीचें विष . ३ मधाच्या पोळयांतील पिठासारखा एक पिवळा पदार्थ . ( ) णें - १ ( विवाहाचे वेळी वधूवरास प्रथम हळद लावून मंगलस्नान त्यावरून ) विवाह संस्कार होणें २ वैभवास मानमान्यतेस चढणें ; भाव वाढणें . ३ ( ल . ) दुर्मिळ होणें . हल्ली भाद्रपद महिना , भटांना काय हळद लागली अहे ; तेव्हां आम्ही पक्ष लांबविला . हळदीचा डाग लागणें , विटाळ होणें - लग्न झाल्यावर थोडेच दिवसांत नवरा किंवा बायको मरणें . हळकुंड , हळखुंड - न . हळदीच्या मुळाचें कुडे ; ( गो . ) हळकुटा [ हरिद्राखंड ] म्ह० अर्ध्या हळकुंडाने पिवळें होणें = थोडयाशा यशानें , प्राप्तीने , गर्वानें ताठून जाणें . हळकुंडासाठी लग्न मोडणें - एखादी क्षुल्लक बाब न जुळल्यामुळें मोठे जुळत आलेले असून तें मोडून टाकणें . हळदकुंकू , विडे , हळदीकुंकू , विडे - न . पुअव . चैत्रांत किंवा नवरात्रांत सुवासिनी स्त्रियांनी परस्परांस कुमारिकांस वांटावयाचे सौभाग्यदर्शक हळद व कुंकू आणि विडे देणे व ओटया भरणे इ० समारंभ . शेजारच्या मुली आपल्या सासरी जाऊं येऊ लागल्या म्हणजे पुष्कळ वेळां सरोजिनीला हळदीकुंकू करण्याची पाळी येई . - झामू . हळदवणी - पु . ( कु . ) एक ग्रामचार . हळद लेकूरवाळी - स्त्री . एक प्रकारचे फांद्या फुटलेले हळकुंड . हें शुभ मानतात व लग्नांत घाण्यासाठी घेतात . हळदिवा , हळदुवा - वि . हळदीरंगाचा ; पिवळा . [ सं . हळद + इव ] हळदीचा गाभा - पु . अत्यंत सुंदर रंग , अंगकळा हळदुली - स्त्री . हळद लावण्याचा समारंभ . उटिली वधूवरें हळदुली स्वानंदे । - एकनाथ . हळदुटणें , हळदुष्ण - न . ( तंजा . ) सुनमुखानंतर वधूवर परस्परांस हळदकुंकू , पानसुपारी इ० देतात तो समारंभ . [ हळद + उटणें ] हळदेमाळी - पु . हळद पिकविणारा माळी . हळद्या - पु . १ कावेळी सारखा एक रोग ( माणूस , झाड इ० स होतो ). २ एक जातीचें विष . ३ मधाच्या पोळयांतील पिठासारखा एक पिवळा पदार्थ .
|