Dictionaries | References व वाढ { vāḍha } Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 वाढ A dictionary, Marathi and English | Marathi English | | The head of a sugarcane. वाढीस लागणें To begin to grow. 2 To renew its growth;--used of a f̣œtus that has been stationary. Rate this meaning Thank you! 👍 वाढ Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m f growth. f increase. n The head of a sugar-cane. Rate this meaning Thank you! 👍 वाढ मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. आधिक्य , वाढावा , वृद्धी ; ना. उन्नती , प्रगती , विकास , सुधारणा ; ना. व्याप , पसारा . Rate this meaning Thank you! 👍 वाढ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun प्रमाण, संख्येत आधिक्य येण्याची क्रिया Ex. या वर्षी शाळेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली HYPONYMY:दरवाढ ONTOLOGY:इत्यादि (ACT)">कार्य (Action) ➜ इत्यादि (ABS)">अमूर्त (Abstract) ➜ इत्यादि (INANI)">निर्जीव (Inanimate) ➜ इत्यादि (N)">संज्ञा (Noun) SYNONYM:वृद्धी अभिवृद्धीWordnet:asmবৃদ্ধি benবৃদ্ধি gujવૃદ્ધિ hinवृद्धि kanವೃದ್ಧಿಯಾಗುವುದು kasہُریٚر malവര്ദ്ധനവ് nepवृद्धि oriବୃଦ୍ଧି panਵਾਧਾ sanवृद्धिः tamமுன்னேற்றம் telవృద్ది urdاضافہ , بیشی , زیادتی , فروغ , بڑھوتری , بڑھت , ترقی , برکت noun वाढण्याची किंवा वर येण्याची क्रिया Ex. दुपारनंतर तापमानात वाढ झाली. ONTOLOGY:इत्यादि (ACT)">कार्य (Action) ➜ इत्यादि (ABS)">अमूर्त (Abstract) ➜ इत्यादि (INANI)">निर्जीव (Inanimate) ➜ इत्यादि (N)">संज्ञा (Noun)Wordnet:kasہُریر , اضافٕہ oriବଢ଼ିଚାଲେ panਵਾਧਾ urdاضافہ , بڑھوتری see : विकास Rate this meaning Thank you! 👍 वाढ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. १ शरीराची उत्तरोत्तर होत जाणारी वृद्धि ; आकार मोठा होणें ; जाडें होणें . २ आधिक्य , प्रमाणांत , मापांत , संख्येंत अधिक भरणें ; वाढावा . ३ व्याज ; वाढावा ( उसनें धान्य वगैरे परत देतांना जें अधिक देतात तें ) ४ - स्त्रीन . मोड येण्याची जागा ; डोळा ; अंकु फुटण्याचे स्थान . ५ - न . ( वाढें ) उंसाचा अप्रभाग , शेंडा . - वि . उंच ; थोर ; मोठा . कवी उपासकांची वाढ कीर्ति । विस्तारली । - दा १ . ७ . १३ . [ सं . वृध् - वर्ध् ; प्रा . वढ्ढ ] वाढआविंज , वाढाविंज --- स्त्री . भातलावणीची अखेर , शेवट , आविंज पहा . वाढणी --- स्त्री . वाढ ; मोठें होणें ; उंच होणें ; वाढणीस लागणें ; वाढू लागणें . [ वढ ] वाढणें --- अक्रि . १ मोठेम होणें ; आकार , उंची , संख्या वगैरे अधिक होणे . २ वय , काल इत्यादीनीं प्रगत होणें ; पक्क दशेप्रत जाणें . ३ पुढें जाणें ; हला करणें ; समोर जाणें ; चालून जाणें . राउळांपुढे वाढत । राजवाहन पुआळित। - शिशु ५३० . पवार कांहींसे पुढें वाढून गेले . - भाब १५ . ४ ( प्रत्यक्ष उच्चारानें येणारे अशुभ टाळण्याकरितां स्त्रिया वगैरेमध्यें रुढ ) कमी होणें ; नाहींसें होणें ; संपणें ; खर्च होणें ( कुंकु . इ० ) ५ वारविलें जाणें ( धान्य ) ६ अंगांत येणें ; संचार होणें ( देव , भूत , पिशाचादिकांचा ).- आडिवर्याची महाकाली १०३ . [ सं . वधू - वर्ध् ; प्रा . वड्ड ; हिं . बढना ; बं . बडिवा ; उरि . बढिवा ; सिं . गु . वधणुं - वुं ] वाढणें वर्तणें ---- अक्रि . सामान्यत ; वाढणें व राहणें ; आयुष्यक्रम चालविणें . तुमच्या अन्नावर वाढलों व वर्तलों तो मी तुमचाच आहें . [ वाढणे + वर्तणें ] वाढता - वि . १ वाढत जाणारा ; पूर्णतेस जाणारा ; मोठा होणारा . २ अधि होत जाणारा ; वृद्धि पावणारा उद - वाढता धंदा - रोजगार - चाकरी - मुदत - बुद्धि - लक्ष्मी - राज्य - कळा . ३ शुभंदायक , मंगलदायक म्हणून वर्ताला दिलेला . [ वाढ ] वाढत्या अंगाचा - वि . १ जलद वाढणारा , मोठा होनारा ; उंच होत जाणारा . २ सैल ; डगळ ; वाधला तरी अंगास येईल असा ( कपडा वगैरे ). वाढता चुडा --- पु . बांगडया भरल्यावर शुभदायक म्हणून कासार जी अधिक बांगडी भरतो ती . वाढती --- स्त्री . १ मुलांच्या उचकीस शुभदायक शब्द ( अमंगल टाळन्यास ). २ वाढदिवस . की वाढती करिती उल्हासें। उभविती गुढिया। - ज्ञा ९ . ५१२ . वाढदिवस , वाढदिस --- पु . जन्मदिवस ; जन्मदिनीं करावयाचा विधि , समारंभ ( प्रारंभीं मुलाच्या प्रत्येक महिन्याच्या जन्मदिवशीं हा विधि करतात व एक वर्षानंतर वार्षिक करतात .). वाढवण --- स्त्री . १ वाढण्याची , अधिक होण्याची क्रिया . २ वृद्धि ; वाढ ; बढती ३ संपणें ; खलास होणें ; खुंटणें ( अभाव , नाश वगैरेचा प्रत्यक्ष निर्देश अशुभसूचक मानून त्याअर्थी उलट वृद्धिवाचक शब्द योजतात ). ४ केरसुणी ; खराटा . [ सं . वर्द्धनी ] वाढवणें - विणें --- अक्रि ( वाढणें प्रयोजक ) १ मोठें करणे ; अधिक करणें ; विस्तृत करणें . २ वाढावयास लावणें ; पालनपोषण करणें ; संभाळणें . ३ फुटणें ( बांगडी वगैरे ); संपणें ; खुंटणें ; नाश पावणें ( अशुभ निर्देश टाळन्याकरितां कुंकू , बांगडया वगैरेसंबंधी ). ४ आसडणें ; पाखडणें ; वारवणें ( धान्य ). [ सं . वर्धापनम् ] वाढवा - पु . वाढ ; वाधलेला भाग ; जास्तीपणा . वाढविणें वर्तविणें --- उक्रि . पालनपोषण करणें ; लहानाचा मोठा करणें संभाळ करणें . वाढवावाढव --- स्त्री . १ विस्तार ; आधिक्य ; वृद्धि करणें ( औत्सुक्य , पुरस्कार , नेट प्रगति इत्यादि ध्वनित होतात ). २ ( ल .) चेतवणी ; भडकविणें ; वाढविणें ( कलह , भांडण , तंटा , आग ). वाढवीस --- पु . वाढदिवस ; जन्मदिवस ; वर्षगांठ . वाढिनणें - निणेंन्नणें --- क्रि . वाढणें पहा . यादव प्रतापतरु , वाढिनला। - शिशु २ . त्यावरी वाढिन्नली तृणजाळी। - भुवन १५ . ७६ . वाढी --- स्त्री . १ वृद्धि ; वाढ . २ उसना घेतलेला धान्यादि पदार्थ परत करावयाचाच्या वेळीं अधिक द्यावयाचा तो ; व्याज . ३ पातळ पदार्थ वाढन्याचें तोटींचे भांडे ; झारी . [ वाढ ]०दिढी स्त्री. उसने धान्यादि दीडपटीनें परत द्यावयाचा करार , रिवाज , रीत .०मोडी स्त्री. , चढउतार - शर . ( वाप्र .) उंसांत जाऊन वाढें आणणें समृद्धीच्या स्थळाहून क्षुद्र वस्तु आणणें . वाढीव स्त्री . थोरपणा ; बडेजाव . वाढिवेच्या गोष्टी बोलती । घाय घालिती अधर्म। - रावि १९ . ११५ . वाढणीस , वाढीस लागणें १उंच , रुद्र , लठ्ठ होऊन लागणें . २ खुंटलेली वाढ पुन्हां सुरु होणें . Rate this meaning Thank you! 👍 वाढ A Sanskrit English Dictionary | Sanskrit English | | वाढ see बाढ॑. Rate this meaning Thank you! 👍 वाढ The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English | | वाढ [vāḍha] see बाढ. Rate this meaning Thank you! 👍 वाढ Shabda-Sagara | Sanskrit English | | वाढ mfn. (-ढः-ढा-ढं) 1. much, abundant, exceeding. 2. hard, firm. Adv. n. or Ind. (-ढं) 1. much, excessive, excessively. 2. very well, well, (assent, promise.) 3. A particle signifying conclusion, de- duction. E. वह् to take, to bear, aff. क्त; form. irr. ROOTS:वह् क्त; Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP