Dictionaries | References

माणूस

   
Script: Devanagari
See also:  जळमनुष्य , माणूसपण , माणूसपणमा , माणूसबळ

माणूस     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
काणूस, ठेकस, ठोमस. भरल्या माणसांतून उठविणें-काढणें-घालविणें To cast out of society. माणसाकाणसीं By or through human beings. माणुसाचें काणूस होणें To become emaciated or reduced; or to become poor and wretched; i. e. to cease being माणूस and to become any non-descript thing. माणूस काणूस ओळखावें- जाणावें-पाहावें-ध्यानांत धरावें &c. Make distinction betwixt man and man.

माणूस     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
See मणुष्य &c.

माणूस     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : व्यक्ती, मानव

माणूस     

पुस्त्रीन .
 पु. १ मत्स्यकन्या - पुत्र ; पाण्यांत राहणारी एक कल्पित मनुष्यजात व तींतील व्यक्ति ; जलमनुष्य पहा . गोपांनीं जळमनुष्य मारिलें । - ह १३ . १६८ . २ ( ल . ) कोळीजात ; कोळी . ३ अतिशय लहान खुजा , माणूस .
मानव ; मनुष्य ; मानवी प्राणी .
( कु . ) रखेली ; अंगवस्त्र .
मानव ; मनुष्यजाति .
पुस्त्री . रोजंदारीनें कामावर लावलेला मजूर ; गडी . सासान्यतः श्रेष्ठ दर्जाच्या मनुष्याची कोमलता , नाजुकपणा यापासून तों रानटीपणा , रांकटपणा , दांडगेपणा इ० अवस्था दाखविण्यासाठीं माणूस , शब्दास जोडून काणूस , माणूस ठेकस , माणूस ठोमस इ० . ( समासांत ) रानमाणूस , जळमाणूस , बाईलमाणूस इ० [ सं . मनुष्य ; आर्मेंजि . मनुस ; पोर्तु . जि . मनु , मनुश ] म्ह०
( व . ) माणूस फिरलें तर फिरलें पण घराचे वासेहि फिरले = घरांतल्या मुख्य माणसाची नाराजी झाली ती झालीच . पण त्यामुळें घरांतील लहानमोठीं सर्वच माणसें विरुद्ध झाली .
( व . ) माणसांतला , रांड्या बायकांतला देशपांड्या = पुरुष मंडळींत कांहींच चालत नाहीं पण बायकांत मात्र बढाई मारणारा . ( वाप्र . ) माणसाकाणशीं - मानवी प्राण्याकडून . भरल्या माणसांतून उठविणें , काढणें , घालविणें - समाजांतून बाहेर टाकणें . माणसानें काय बोलावयाचें - ( बायकी ) १ आतां कांहीं बोलावयाचें उरलेंच नाहीं या अर्थी उदगार .
आतां यापुढें शब्द करणें - काढणें व्यर्थ . माणुसाचें काणूस होणें - आजार , दुःख , काळजी यांमुळें मनुष्य किडकिडीत , कृष होणें ; दरिद्री व दुःखी होणें . माणूस काणूस , ओळखावें , जाणावें , पाहावें , ध्यानांत धरावें - माणसामाणसांतील भेद लक्षांत आणावा ; कोण चांगला , कोण वाईट ओळखावा . माणसळणें , माणसाळणें , माणसावणें --- अक्रि .
माणसाच्या संवयीचा होणें ; क्रूरपणा टाकून गरीब होणें ; ( रानटी पशु ).
मनुष्य खाण्यास वखवखणें ( मनुष्याच्या रक्ताची एकदां चव घेतलेला वाघ , लांडगा इ० ) माणसाचा अवतार , कांदा , लेंक - पु . ठोंब्या , दगड मनुष्य . सामाशब्द -
०कंटाळ्या   गंधारा गंध्या घाण्या घाण - वि . एकलकोंडा ; मनुष्याच्या संगतीचा कंटाळा करणारा . [ माणूस + कंटाळणें , गंध , घाण ]
०पण   पणा - नपु . माणुसकी पहा .
०बळ  न. 
माणसांच्या संख्येच बळ ; संघशक्ति . हें काम एकट्याचें नव्हे , माणूसबळ पाहिजे .
मनुष्यरुप शक्ति ( सैन्य , नोकर इ० ) विद्याबळ , द्रव्यबळ , पुण्यबळ यांच्याहून भिन्न शक्ति .
०मार्‍या वि.  
माणसें मारणारा ; मानवहत्यारा ; खुनी .
( ल . ) क्रूर ; निर्दय . माणसामाणसीं - क्रिवि .
आपल्या नोकरा - चाकरा मार्फत .
मनुष्यांकडून ; मानवी प्राण्यांकडून . माणुसकी - स्त्री .
सुधारलेल्या मनुष्याचे गुण व भावना , चाली व रीती ; सभ्यता ; शिष्टता ; सुजनता ; थोरपणा ; मनुष्यांतील सात्विक गुण . या सात्विक गुणांच्या समुच्चयास आपण तूर्त माणुसकी असें नांव देऊं . - गीर ९२ .
मानवी धर्माची जाणीव ; मानुषी दयाधर्म ; मनुष्यपण .
व्यवस्थित वर्तन ; नियमितपणा व मनमिळाऊपणा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP