Dictionaries | References

उठविणें

   
Script: Devanagari
See also:  उठवणें

उठविणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.

उठविणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v t   Raise; fig. excite. Make to ache (the head). Arouse.

उठविणें     

उ.क्रि.  उठणें प्रयोजक .
उचलणें ; वर करणें ; उच्च स्थितीला नेणें ; उंच करणें ; उभें करणें .
जागृत करणें ; जागें करणें ; उठावयास लावणें . म्ह० निजलेल्याला कोणी उठवील , जाग्याला कोण उठवील ?
चेतना देणें ; प्रवृत्त करणें ; क्षोभविणें ; उठावणी करणें .
दुखावयास लावणें ( डोकें ).
( कंडी ) पिकविणें ; जाहीर करणें ( बातमी , गोष्ट ).
उत्पन्न करणें ; काढणें . जे उठवी शब्दांकुर । वदे वैखरी अपार । - दा १ . ३ . २ . विचार न करतां बांधा उठवून ... अडथळा आणूं नये . - स्वारीनियम ( बडोदें ) ४७ .
पार पाडणें ; बजावणें . सूचना होतील त्याप्रमाणें नोकरी उठविण्याची आहे . - स्वारीनियम ( बडोदें ). २४ .
चोरणें ; लांबविणें . चोरट्यांनीं स्वयंपाकाचीं दोन भांडीं उठविलीं . - विवि ८ . ११ . २०८ .
रक्कम कर्ज काढणें ; उचल करणें ; खर्च करणें . [ सं . उत्थापन ; प्रा . उठ्ठवण ] घरांतून उठविणें - नादीं लावून पळविणें ह्या स्वतंत्र बायका केव्हां कोणच्या म्हातार्‍याला घरांतून उठवतील कांहीं नेम नाहीं . - बाय २ . १ . जन्मांतून उठविणें - आयुष्याचें मातेरें करणें ( जार कर्मामुळें ). माझ्या पोरीला अशी जन्मांतनं उठवलीन . - निचं १२५ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP