Dictionaries | References

उठाठेव

   
Script: Devanagari
See also:  उठाठव

उठाठेव     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Idle meddling or interference. Foil and trouble. Brother and fuss.

उठाठेव     

ना.  ढवळाढवळ , पंचाईत , लुडबूड , हस्तक्षेप ( नसती );
ना.  खटपट , खटाटोप , दगदग .

उठाठेव     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  इकडच्या तिकडच्या कुचाळक्या करण्याची क्रिया   Ex. तू दुसर्‍यांच्या उठाठेवी करण्यापेक्षा स्वतःचे दोष आधी बघ.
SYNONYM:
पंचाईत
See : उचापत

उठाठेव     

 स्त्री. 
रिकामी लुडबुड , खटपट ; पंचाईत ; दुसर्‍याच्या कामांत ढवळाढवळ ( क्रि० करणें ). पंचभूतिक उठाठेवी । न चले तेथें । - दा १ . ४ . ३० . म्ह० विधवेला ( बोडकीला ) कुंकवाची उठाठेव कशाला पाहिजे .
बरदास्त ; सरबराई ; व्यवस्था . घायाळ समशेर बहाद्दर कुंभेरीस आला , तिथें सुरजमल्ल जाट याणें त्याची बहुत उठाठेव करुन घोडी व पालखी देऊन वाटेस लाविला . - भाब १६२ .
कामाची दगदग ; खटाटोप ; खटपट .
इकडच्या तिकडच्या कुचाळक्या करणें ; भलतें सलतें उठविणें . [ उठविणें + ठेवणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP