Dictionaries | References

ढालगज

   
Script: Devanagari
See also:  ढाल

ढालगज     

वि.  १ ( १ ज्याच्या गंडस्थळावर संरक्षणसाठीं ढाल बांधली आहे अशा लढाईंतील हत्तीप्रमाणे शूर , धीटमोल . २ ज्यावर सैन्याचें मुख्य निशाण आहे अशा म्होरक्या हत्तीप्रमाणें धीट ). अमर्याद ; निर्लज्ज उद्धट ( पुरुषाप्रमाणें बागणार्‍या स्त्रीविषयीं अथवा तिच्या शिरजोर , धीट , उद्धट , स्त्री जातीला अयोग्य अशा वर्तनाविषयी योजतात ). २ बेछूट ; दांडगी ; ताळतंत्र सोडेलेली ( स्त्री . तिचीं कृत्यें ). ३ . ( बायकी ) उपव्द्यापी ; उलाढाली ; दंगखोर ( मुलें व त्यांच्या खोडया ). ४ अतिशय मोठी व स्थूल ( स्त्री ). ५ दंगेखोर ; शिरजोर ; बेकायदेशीर ( मनुष्य ). ६ ( सामा .) निष्कारण उठाठेवी करणारा ; फाजील . [ ढाल = निशाण + गज = हत्ती निशाणाचा हत्ती मोठा असतो यावरुन ]. ढालगजपण - १ . उलाढाल ; उठाठेव . तयासि द्रव्य पाहिजे म्हणौन । केलें असंभाव्य ढालगजपण। - स्वादिओ २ . २ . १७ . ढालगज भवानी - स्त्री . १ . साहसाचे , आचरटपणाचें , अमर्याद , अनुचित कृत्य करणारी स्त्री २ . उलाढाली , उपव्द्यापी स्त्री .

ढालगज     

ढालगज भवानी
[ढालगज=निशाणाचा हत्ती. ज्‍या हत्तीवर सैन्याचें मुख्य निशाण लावलेले असते तो. हा हत्ती फार धीट व शूर असावा लागतो.- आपटे कोश]
मोठी शूर, धीट, उपद्‌व्यापी बाई. (वाईट अर्थी वापरतात.)
ढालगज हत्ती सव्र सैन्याच्या पुढे मिरवत असतो त्‍याप्रमाणें नटून थटून पुढे पुढे करणारी जहांबाज स्‍त्री.
साहसी, अमर्याद स्‍त्री. (सामा.) उलाढाली, उपद्व्यापी स्‍त्री.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP