Dictionaries | References क कुंकू Script: Devanagari Meaning Related Words कुंकू मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun हळदीच्या कुड्यास लिंबू,टाकणखार इत्यादिंची पुटे देऊन,रंगवून त्याची केलेली लाल पूड Ex. विवाहित स्त्रिया कपाळाला कुंकू लावतात ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benকুমকুম gujકુમકુમ hinकुमकुम kanಕುಂಕುಮ kasکُم کُم kokपिंजर malകുങ്കുമം oriକୁମକୁମ panਸੰਧੂਰ sanकुङ्कुमम् tamகுங்குமம் telకుంకుమ urdکم کم , رولی , کمکم कुंकू महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. एक मुलींचा खेळ . - मखे ३३८ . न. हळदीच्या कुड्यास लिंबु टाकणाखार इ० ची पुटें देऊन रंगवून त्याची केलेली लाल पुड . हें कुमारिका व विवाहित स्त्रिया आपल्या कपाळास लावतात . हें तेलांत मिसळुन डबींत भरून ठेवतात . ' बायकांना जसें कुंकू तसें पुरुषांना स्वातंत्र्य ' - दौ ५६ . ( सं . कुंकुम ) ( वाप्र .)०अधिक - वाढणें - कुंकु कमी होणें , संपणें पुसटणें .होणें - वाढणें - कुंकु कमी होणें , संपणें पुसटणें .०जाणें १ वैधव्य येणें . २ ( ल .) भरभराट , कीर्ति उत्कर्ष यांस ओहोटी लागणें ( धंदा व्यापार इ० )०पुसुन लावणें -( कुण ) ( सधवेनें ) नवर्याल सोडचिट्ठी देऊन पाट लावणें ; विधवेनें ; दुसरें लग्न करणे .शेण लावणें -( कुण ) ( सधवेनें ) नवर्याल सोडचिट्ठी देऊन पाट लावणें ; विधवेनें ; दुसरें लग्न करणे .०बळकट पुष्कळ दिवस सौभाग्य टिकणें ; नवर्याला दीर्घायुष्य होणें .होणें पुष्कळ दिवस सौभाग्य टिकणें ; नवर्याला दीर्घायुष्य होणें .०लावणें ( खा .) वधू पाहाण्याच्या वेळीं मुलाच्या बापानें अगर दुसर्या वडील माणसानें वधूला साखरपुडा देणें . ' शेनफड्याच्या पोरल्ये कुकू लावाल्यें मीन् माह्या भासा धरनगायी गेलतु ' ( खानदेशी )०सरसें - करणें - सौभाग्य कायम राहणें ; टिकणें .होणे - करणें - सौभाग्य कायम राहणें ; टिकणें .०संरक्षणें संरक्षण करणें - सौभाग्याची काळजी घेणे ; नवर्याची काळजी वाहणें ; जपणें . म्ह० बोडकीला कुंकू वांझेला कातबोळ कशाला पाहिजे ? = विधवेला कुंकुवाची उठाठेव . कशाला ? सामाशब्द - कुंकवाचा , कुंकवाला धनी - पु . नामधारी , सत्वहीन नवरा , मालक . ' इंदु - मला कुंकाअला धनी पाहिजे .' - भा ९० . कुंकुगोप चंदन - न . १ ( ल .) मिश्र विवाहाची संतति . २ ( ल .) चांगला न शिजलेला , गोळा झालेला भात . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP