|
पु. १ नवर्याचा किंवा बायकोचा बाप . २ सासर्याच्या स्थानीं मानला गेलेला नवर्याचा किंवा बायकोचा नातेवाईक . उदा० आजेसासरा , चुलतसासरा , इ० . [ सं . श्वशुर ; प्रा . स ( सा ) सुर ; हिं . ससुर . तुल० फ्रें . जि . सस्त्रो ] म्ह० सासर्या गेली म्हणून काय शिंदळ झाली ? सासुरें , सासूर - सासर पहा . सासुरवाट - स्त्री . स्त्रियांचा डावीकडचा भांग . उजवीकडच्यास माहेरवाट म्हणतात . सासुरवड , सासुरवाडी - स्त्री . १ बायकोच्या बापाचें घर ; बायकोचें माहेर . २ सासरें . कीं भवाब्धिसम सासुरवाडा । - मंराधा ५२ . सासुरवाशी , सासुरवासी , सासुरवाशीण - स्त्री . १ सासरीं राहणारी ( परतंत्र ) मुलगी ; सून . सासुरवाशी । सुन रुसून बसली कैशी । - भोंडला . २ ( ल . ) एखाद्याच्या धाकामुळें स्वतंत्रपणें वागतां न येणारी व्यक्ति ; ताटाखालचें मांजर . सासुरवास - १ सुनेचें सासरीं राहणें . २ ( ल . ) सासरीं सासू , सासरा , नणंद , दीर इ० करतात तो जाच , छळ . ३ ( ल . ) एखाद्याचा होणारा जाच , छळ , परतंत्रपणा . सासू , सासूस - स्त्री . नवर्याची किंवा बायकोची आई ; सासर्याची बायको . [ सं . श्वश्रू ; प्रा . सासू ; हिं . सास ; गु . सासू ; सिं . ससु ] म्ह० १ सासूचा पाय सुनेस लागला तर सुनेनेंच पायां पडावें , सुनेचा पाय सासूस लागला तरी तेंच . २ चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे . सासुडी - स्त्री . ( निंदाव्यं . ) सासू . सासूपण - न . सासुरवास ; सासरचा छळ . सासूबाई सासू हिनं सासूपण केलं . । कपाळीचं कुंकू मला जन्मवरी दिलं । - जात्यावरील गाणें . सासूसून - सासबहू पहा . सास्वासुना - मुलींचा एक खेळ . - मखेपु २६४ .
|