Dictionaries | References

११

   { एकादश, अकरा }
Script: Devanagari

११

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   See : ग्यारह, ग्यारह

११

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : अकरा, अकरा, अकरा

११

Sanket Kosh | Marathi  Marathi |   | 
अकरा अंगें उपासनेचीं   
१ श्रवण, २ कीर्तन, ३ नामस्मरण, ४ सेवा, ५ अर्चन, ६ वंदन, ७ दास्य, ८ सख्य, ९ आत्मनिवेदन, १० प्रेमभक्ति व ११ पराभक्ति.
अकरा अर्थ उपनिषत् शब्दाचे   
१ आत्मबल, २ उत्थान, ३ ब्रह्मचर्य, ४ गुरुसेवेंत देह झिजविणें, ५ गुरु (ह्रदय) सांनिध्य, ६ जीवन - निरीक्षा, ७ श्रवण, ८ मनन, ९ अवबोधन, १० आचरण व ११ अनुभूति. (ईशावास्य वृत्ति)
अकरा अक्षौहिणी सैन्याचे अकरा सेनापति (कौरव पक्षीय)   
१ कृपाचार्य, २ द्रोणाचार्य, ३ शल्य, ४ जयद्र्थ, ५ सुदक्षिण, ६ काम्बोज, ७ कृतवर्मा, ८ अश्वत्थामा, ९ भूरिश्रवा, १० शकुनि व ११ बाल्हिक. ([म. भा. उद्योग १५५-३२])
भीष्माचार्य सर सेनापति होते आणि कर्णानें भीष्म असेपर्यंत मी लढणार नाहीं असेंज ठरविलें होतें.
अकरा आनंद   
१ मानुष आनंद, २ मानुष्य - गंधर्वांचा आनंद, ३ देव - गंधर्वांचा आनंद, ४ पितृ लोकांचा आनंदा, ५ आजान - ज नामक देवांचा आनंद, ६ कर्म - देवांचा आनंद, ७ देवांचा आनंद, ८ इंद्राचा आनंद, ९ बृहस्पतीचा आनंद, १० प्रजापतीचा आनंद आणि ११ ब्रह्मानंद, ([तैत्तिरीय उपनिषद् आनंदवल्ली])
अकरा इंद्रियें   
१ पंचकर्मेंद्रियें, ५ ज्ञानेंद्रियें व १ मन, हीं मिळून अकरा."इंद्रियाणि दशैकं च"([भ. गी. १३-५])
अकरा करण   
तिथीच्या अर्धास करण म्हणतात. १ बव, २ बालव, ३ कौलव, ४ तैतिल, ५ गर, ६ वणिज, ७ भद्रा, हे सात करण चल आणि ८ शकुनि, ९ चतुष्पाद, १० नाग व ११ किंस्तुघ्न हे चार करण स्थिर, असे मिळून अकरा करण आहेत. ([ज्योतिष])
अकरा कला (अग्नीच्या)   
१ दीपिका, २ रजिका, ३ ज्यालिनी, ४ विस्फुलिंगिनी, ५ प्रचंडा, ६ पाचिका, ७ रौद्री, ८ दाहिका, ९ रागिणी, १० शिखावती आणि ११ ज्वाला, या अग्नीच्या अकरा कला असून ज्योति ही स्वःची बारावी कला होय. (दर्शन - संग्रह)
अकरा कौरवपक्षीय रथी   
१ दुर्योधन, २ दुःशासन, ३ दुःसह, ४ दुर्मर्षण, ५ विकर्ण, ६ चित्रसेन, ७ विविंशति, ८ जय, ९ सत्यव्रत, १० पुरुमित्र व ११ युयुत्सु, ([म. भा. आदि ६३-१२०])
अकरा गंधर्व गण   
१ स्वात, २ भ्राज, ३ अंधारी, ४ बंभारी, ५ हस्त, ६ सुहस्त, ७ कृशानु, ८ विश्वावसु, ९ मूर्धन्वान् ‌, १० सूर्यवची व ११ कृति ([म. ज्ञा. कोअ वि. २])
अकरा गुण दूताचे अंगीं असावेत   
१ पटुता, २ धाष्टर्य, ३ इंगिताकारज्ञता, ४ अनाकुलत्व, ५ परमर्मज्ञता, ६ प्रमाणता, ७ प्रतारण, ८ देशज्ञान, ९ कालज्ञान, १० विषह्म (सहन करण्याजोगा) बुद्धित्व, आणि ११ लघुप्रतिपत्तिसोपाया ([वात्सायन - कामसूत्रें अधि. १])
अकरा गुण महंतास आवश्यक (समर्थ सांप्रदाय)   
१ परिभ्रमण, २ चाळणा, ३ विवेक, ४ कष्ट, ५ मरणाविषयीं वेफिकीरपणा, ६ कीतींची चाड ७ निस्पृहता, ८ मृदुवचन, ९ क्षमा शांति सहिष्णुता १० परोपकार आणि ११ उत्कटता.
ऐसा जाणे जो समस्त। तोचि महंत बुद्धिवंत ॥ ([दा. बो. ११-६-७])
अकरा गोष्टी अनन्य ईश प्रार्थनेनें साध्य   
१ श्रद्धा, २ मेघा, ३ यश, ४ प्रज्ञा, ५ विद्या, ६ बुद्धि, ७. श्री, ८ बल, ९ आयुष्य, १० तेज व ११ आरोग्य (प्रार्थना मंत्र)
अकरा चर्म वाधें   
१ मृदंग, २ तबला, ३ डफ, ४ समेळ, ५ खंजीर ६ नौबत, ७ तास, ८ मर्फा, ९ चौघडा, १० डंका व ११ ढोल.
अकरा पांडवांचे प्रमुख साहाय्यकर्ते   
१ सात्यकि, २ धृष्टकेतु, ३ जयत्सेन, ४ पाण्डय, ५ द्रुपद, ६ विराट् ‌, ७ श्रीकृष्ण, ८ चेकितान, ९ केकेय, १० काशीपति आणि ११ घटोत्कच. ([म. भा. सभापर्व])
अकरा पूजास्थानें   
१ सूर्य, २ अग्नि, ३ ब्राह्मण, ४ गाय, ५ वैष्णव, ६ आकाश, ७ वायुअ, ८ जल, ९ भूमि, १० आत्मा व ११ सर्व प्राणिमात्र, हीं परमेश्वरपूजेचीं अकरा पूजास्थानें होत. ([भागवत स्कंध ११-११-४२])
इयें अकराहीं अधिष्ठानें। मत्प्राप्तिकर अतिपावनें।
म्यां सांगितलीं अनुसंधानें। पूजा करणें यथाविधी ॥ ([ए. भा. ११-१४ ५५])
अकरा प्रकार भक्तीचे   
१ गुणमाहात्म्यासक्ति, २ रूपासक्ति, ३ पूजासक्ति, ४ स्मरणासक्ति, ५ दासासक्ति, ६ सख्यासक्ति, ७ कांतासक्ति, ८ वात्सल्यासक्ति, ९ आत्मनिवेदनासक्ति, १० तन्मयासक्ति आणि ११ परमविरहासक्तित. ([नारदभक्ति सूत्रें ८२])
अकरा प्रमुख कुलें सपुष्ष वनस्पतीचीं   
१ ज्वारीकुल, २ तूरकुल, ३ कोबीकुल, ४ वांगीकुल, ५ हळदकुल, ६ कर्दळकुल, ७ लिंबुकुल, ८ कापूसकुल, ९ तुळसीकुल, १० कारळाकुल आणि ११ मिरिकुल, (आमची शेती)
अकरा मागण्या (अग्निदेवतेजवळ मागावयाच्या)   
१ श्रद्धा, २ मेधा, ३ यश, ४ प्रज्ञा, ५ विद्या, ६ बुद्धि, ७ श्री, ८ बल, ९ आयुष्य, १० तेज आणि ११ आरोग्य. (वैश्वदेव मंत्र)
अकरा मारुती (समर्थस्थापित कालानुक्तमें)   
१ शहापूर, २ मसूर, ३ व ४ चाफळ येथें, ५ शिंगणावाडी, ६ माजगांव, ७ जंब्रज, ८ बत्तीस शिराळें, ९ पारगांव, १० मनपाडळें व ११ बाहेबोरगांव. हीं अकरा समर्थस्थापित मारुतिस्थानें सातारा जिल्ह्मांत आहेत. ([दासायन])
अकरारुद्र   
शरीरांत असणारीं १० इंद्रियें, व ११ वा आत्मा मिळून अकरारुद्र. ([योगी - याज्ञवल्क्य])
अकरा वानर सेनापति   
१ गज, २ गवाक्ष, ३ गवय, ४ शरम, ५ गंधमादन, ६ मैंद, ७ द्विविद, ८ सुषेण, ९ जांबुवंत, १० नळ व ११ सुनीळ. सुग्रीवाच्या वानर - सैन्यांत हे अकरा प्रमुख सेनापति होते. ([भा. रा. किष्किंधा.]).
अकरा विद्या (भगवान् शंकरापासून आविर्भूत)   
१ व्याकरण, २ गांधर्ववेद, ३ सामुद्रिक, ४ वैद्यक, ५ अस्त्र - विद्या, ६ योगशास्त्र, ७ भक्तिशास्त्र, ८ रुद्रयामल आदि तंत्रशास्त्र, ९ सावर आदि मंत्रशास्त्र, १० स्वरोदय आणि ११ सर्व प्रकारच्या कथा, ([कल्याण शिवांक])
अकरा शुद्ध आहार   
१ मैक्ष्य, २ यवागू (भाताची पेज), ३ ताक, ४ दूध, ५ सातूचा पदार्थ, ६ फल, ७ मूल, ८ राळे, ९ कण, १० पेंड व ११ सातु, हे अकरा आहार योग्यांना सिद्धि देणारे आहेत. ([मार्केडेय, ३८-११]).
अकरा स्त्री - पुरुष स्वभाव अथवा गुणवैशिष्टयें   
स्त्री - १ सौंदर्य, २ कोमलता, ३ धर्मनिष्ठा, ४ साहस, ५ कलनिपुणता, ६ सहनशीलता, ७ लज्जाशीलता, ८ तेजस्विता, ९ चातुर्थ, १० वत्सलता व ११ त्यागवृत्ति,
पुरुष - १ मामर्थ्य, २ सुद्दढता, ३ तर्कनिष्ठा, ४ घैर्य, ५ कल्पकता, ६ काटकपणा, ७ उच्छृंखलपणा, ८ मानीपणा, ९ बुद्धिमत्त, १० न्यायनिष्टुरता व ११ उपभोगवृत्ति, (गृहसौख्य)
अकरा सर्वप्रसिद्ध पतिव्रता   
१ सुवर्चला, २ शची, ३ अरुंधती, ४ रोहिणी, ५ लोपामुद्रा, ६ सुकन्या, ७ सावित्री, ८ श्रीमती, ९ मदयंती, १० केशिनी व ११ दमयंती. ([वा. रा. ५-२४-१२]).
अकरा स्थानें व त्यांचे मंत्री (मानव शरीराचे)   
१ मेंदू - पंत - प्रधान, २ लहानमेंदू - उपपंतप्रधान, ३ कान - नमोवाणीमंत्री, ४ त्वचा - संरक्षणमंत्री, ५ पाय - दळणवळणमंत्री, ६ पोट - अन्नमंत्री, ७ मस्तक - जंगलमंत्री, ८ बुद्धि - शिक्षणमंत्री, ९ ह्रदय - अर्थमंत्री, १० नाक - आरोग्यमंत्री, आणि ११ फुप्फुस - गृहमंत्री. (नवशक्ति दि. २८-७-६१)
अकरा ज्ञान साधनें   
१ विवेक, २ वैराग्य, ३ षट्‌‍संपत्ति, ४ मुमुक्षता, ५ गुरुसंपत्ति, ६ श्रवण, ७ तत्त्वज्ञानाभ्यास, ८ मनन, ९ निदिध्यास, १० मनोनाश व ११ वासनाक्षय. (तत्त्व - निज - विवेक)
अकराजण गुरूप्रमाणें होत   
१ उपाध्याय, २ पिता, ३ माता, ४ ज्येष्ठबंधु, ५ राजा अथवा शासनाधिकारी, ६ मामा, ७ सासरा, ८ मातेचे वडील, ९ पित्याचे वडील, १० ब्राह्मण व ११ चुलता."वर्णज्येष्ठः पितृव्यश्च सर्वे ते गुरवः स्मृताः"([कूर्म पुराण])
अकराजण ब्रह्मसूत्रावरील भाष्यकार   
१ श्रीमदाद्यशंकराचार्य, २ यादव प्रकाशाचार्य, ३ भास्कराचार्य, ४ विज्ञानमिक्षु, ५ रामानुजाचार्य, ६ ६ नीलकंठाचार्य, ७ श्रीपति आचार्य, ८ निंवार्काचार्य, ९ श्रीमध्वाचार्य, १० बल्लमाचार्य आणि ११ बलदेवाचार्य (पुरुषार्थ सप्टेंबर १९६०)
एकादशाक्षरी मंत्र   
जय जय रघुवीर समर्थ ([रामदासी सांप्रदाय])
एकादश गति (संगीत)   
१ भानवी, २ मीनवी, ३ गजगति, ४ तुरंगिणी, ५ हंसिनी, ६ हरिणी, ७ खंजनी, ८ लावकी, ९ मयूरगति, १० तित्तिरीगति आणि ११ कुक्कटी. (संगीत मकरंद नृत्त्याध्याय)
एकादश गीता रामचरित मानसांतर्गत   
१ श्रीशिवगीता, २ लक्ष्मणगीता, ३ पतिव्रतागीता, ४ रामगीता, ५ शबरीगीता, ६ सुग्रीवगीता, ७ बिभीषणगीता, ८ धर्मगीता, ९ श्रीराम - भक्तिगीता, १० श्रीभुशुडीगीता व ११ सप्तप्रश्नगीता. (गूढार्थमंद्रिका)
एकादश गंधर्व गण   
१ स्वान, २ भ्राज, ३ अंधारी, ४ बंभारी, ५ हस्त, ६ सुहस्त, ७ कृशानु, ८ विश्वावसु, ९ मूर्धन्वान् ‌, १० सूर्यवर्चा व ११ कृति. ([ऋग्वेदाचे - म. भाषांतर])
एकादश द्वारें (शरीर संज्ञक नगरीचीं)   
१ मुख, २-३ नासिकेचीं, ४-५ दोन डोळे. ६-७ दोन कान, ८ नाभि, ९ शिश्न, १० गुद व ११ मस्तकाच्या ठिकाणीं असलेलें ब्रह्मारंध्र.
"पुरमेकादशद्वारमजस्यावक्रचेतसः"॥ ([काठकोपनिषद् २-५-१])
एकादश रुद्र   
अकरा रुद्रांचीं नांवें निरनिराळ्या पुराणांत निरनिराळीं आढळतात. त्यांत एकवाक्यता नाहीं, सामान्यतः
(अ) १ वीरभद्र, २ शंभु, ३ गिरीश, ४ अजैकपाद, ५ अहिर्बुध्न्य, ६ पिनाकी, ७ अपराजित, ८ भुवनाधीश्वर, ९ कपाली, १० स्थाणु व ११ भव ;
(आ) १ मन्यु, २ मनु, ३ महिनस्, ४ महान्, ५ शिव, ६ ऋतुध्वज, ७ उग्ररेता, ८ भव, ९ काल, १० वामदेव व ११ धृतव्रत. ([भागवत स्कंध ३-१२-१२]);
(इ) (कलियुगांतलीं नांवें) १ भूतेश, २ नीलरुद्र, ३ कपाली, ४ वृजवाहन, ५ त्र्यंबक, ६ महाकाल, ७ भैरव, ८ मृत्युंजय, ९ कामेश, १० योगेश आणि ११ शंकर.
एकादश रुद्राणी   
१ धृ, २ वृत्ति, ३ उशना, ४ उमा, ५ नित्युत्सर्पि, ६ इला, ७ अंबिका, ८ इरावती, ९ सुधा, १० दीक्षा व ११ रुद्राणी. हीं अकरा रुद्रदेवतेच्या स्त्रियांचीं नांवें. ([भा. स्कंध ३-१२-१३])
अकरा गुणधर (प्रमुख शिष्य) महावीराचे   
१ गौतम (इंद्रभूति), २ अग्निभूति, ३ वायुभूति, ४ शुचिदत्त, ५ सुधर्म, ६ मांडाव्य, ७ मौर्यपुत्र, ८ अकंपन, ९ अचल, १० मेदार्य आणि ११ प्रभास हे मूळचे ब्राह्मण व क्षत्रिय असून त्यांनी श्रीमहावीराकडून जैन धर्माची दीक्षा घेतली व त्यांनीं जैन धमतत्त्वांचा प्रचार केला (अरिष्टनेमि पुराण संग्रह - हरिबंश)

११

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 
   See : एघार

Related Words

११   11   xi   eleven   कृतशस   नावाथिला   सुयाण   सुयाणें   कस्तुरी भेंडी   गांवकीर्दसार   मुर्गीस बिस्मिल्ला तो कशास   खिस्ततगार   काठाडी   इसाला   इसोळा   तस्करणे   मुरगीस बिसमिल्ला तो कशास   नकसीरी   नैबंधिक   कव्हाळ   कडक्या   औदभारि   खचीचा व्यायाम   खडुवा   अंतुता   गोवाइ   घाटांबा   वावणे   वावने   शाऊ दिवस   शृंगारवेली   सईल   समाइणें   संजोडा   संव्हारणें   वाजिवाह   वोसाड   वोसाडा   अप्रांत   गुठण   दिधडा   थुड्डी   तुळशीपत्र तोलणें   तडकफाशी   लक्ष्मीनिधि   मागतेन   मागुतमागुतां   माघरेन   मर्वारीद   नावाणिगा   नुगडणे   हतियेर   कुळभरण   दस्तन   आडवारा   आर्थिक दाब   वाहर   दशकु   धबाबणे   आधली आधलें   आपोशण   आपोष्णी   आप्तई   ख्रिश्चन   कवीठ   कव्ह   उधाइणें   उपवधू   उपाडा   उलटी जनेऊं   इंद्रजानु   इबीन   इब्न   उजिती   उतळवट   कढंक   कथिका   एकबगीं   ओडवी   कोंभणें   कुलपबंदी   कुळबांगडी   अंगवे   अंघ्र   अंघ्री   गोखला   चंडु   विरवणें   सवाईगवत   साऊ   शिराजणें   सदेठ   श्वसणें   संगणें   संव्हार   वसे   वोतटी   वोल्हाटणे   अडन   अतिबध्द   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP