|
न. १ सौंदर्य . २ भाग्य ; नशीब एवढे एक सौभंग। - ज्ञा १५ . १७ . ३ ज्याचे योगानें आपणांस मान्यता , शोभा , प्रतिष्ठा , तेज इ० लाभतें असा अधिकार , विद्या , वतन , सामर्थ्य इ० विषय . ४ सवाष्णपणामुळें काजळ , शेंदूर , कुंकू , मंगळसुत्र , बांगड्या , इ० वस्तु धारण करण्याचा बायकांचा अधिकार ; सुवासिनीत्व . ५ कुंकू , शेंदूरं . [ सं . सुभग ; सौभाग्य ] म्ह० गौर रुसली आणि सौभाग्य घेऊन बसली = रुसून बसलेल्याची कोण पर्वा करतो अशा अर्थी योजतात . तोरा मिरविणें . सौभाग्याचा टिका - सौभाव्याचें चिन्ह , कुकू . ०चिन्ह द्रव्य न . कुंकू , बांगड्या वगैरे . तंतु पु . १ मंगळसूत्र . २ ( ल .) नवरा . ०धन न. नवरा . घातला तिच्या दृष्टानें सौभाग्यधनावर घाला। - विक १४ . ०वती स्त्री. सुवासिनी स्त्री . ०वायन - न . स्वत : ला सौभाग्य चिरकाळपर्यंत लाभावें म्हणून सुवा सिनी स्त्रिया सौभाव्यद्रवाचें ब्राह्मणांस जें दान ( वाण ) देतात तें . वाण - न . स्वत : ला सौभाग्य चिरकाळपर्यंत लाभावें म्हणून सुवा सिनी स्त्रिया सौभाव्यद्रवाचें ब्राह्मणांस जें दान ( वाण ) देतात तें . ०शुंठी सुठ - स्त्री . ज्यांत प्रमुख्यानें सुंठ घातलेली असते असा एक औषधी पाक ,
|