|
वि. १ अनार्द्र ; शुष्क ; जलहरित ; आर्द्रताविरहित ' ते रडे भरतही तसा रडे जोंवरी नयन होति कोरडे । ' - वामनभरत भाव १६ . म्ह० कोरड्याबरोबर ओलेंहि जळतें = आपराध्याबरोबर निरपराधी गरीबहि चिरडला जातो . २ नुसतें ; कोंरड्यास बरोबर कांही नसलेलें ; दूध , दहीं , वगैरे पातळ पदार्थ्याचें कलावण नसलेलें ( अन्न ). ३ नक्त ( जेवण्याशिवाय मजूरी ); उक्ते . ' मला कोरडे तीन रुपये मिळतात .' ४ ( लक्षणेने निरनिराळ्या ठिकाणीं हा शब्द योजतात . - जसे ) औपचारिक ; शुष्क ; पोकळ ; वरकांती ; निष्फळ ; बिनंहंशिलाचा ; बिनफायद्याचा ; निरर्थक ; ओला ( विशेषत ; ओलाव्याचा ) याच्या उलट . ' कीं वेदांतज्ञाना वाचुन । कोरडी व्यर्थ मतिशुन्य । ' ' बारा वर्षे पढत होतों परंतु कोरडा .' कोरडा - आदर , मान , प्रतिष्ठा - ममता - बोलणें - व्यवहार - श्रम इ० पहा . ५ व्यर्थ , फुकट . ' हिंडणवारा कोरडा । तैसा जया ' ज्ञा १३ . ६८९ . ' कांही लाभावाचून कोरडी खटपट कोण करतो .' ६ ( ल .) वांझ . म्ह० कोरड्या अंगी तिडका , बोडक्यो डोई लिखा .' सामाशब्द - पु. १ कातडी चाबूक ; असुड . २ तडाखा , मार फटकारा . ( अर . कोर = नवी दोरी ) ०ओढणें -( पाठीवर )- चाबुक लगावणें ; मारणें . ०अधिकार पु. १ नुसता पोकळ . नांवाचा अधिकार . २ बिनपगारी अम्मल , हुद्दा ; बिनावेतन काम . ०अभिमान पु. पोकळ मोजस ; रिकामा डौल ; अज्ञानी अहंकार ०आग्रह पु. वरवरचें आमंत्रण ; इच्छा नसतांना बाह्मात्कारें बोलावणें . पैठणी आग्रह . ०आदर पु. औपचारिक सन्मान . मनांत कांहीं पुज्यभाव नसतां बाह्मात्कारें केलेला गौरव . ( विवाहादि समारंभांत ) शाब्दिक सन्मान . ०खडक पु. १ अतिशय कथिण , टणक खडक पहा . २ ( ल .) अडाणी . ३ कोरडा पाषाण पहा . ०टांक वि. ( अतिशयितता व्यक्त करण्यासाठीं ) अतिशय शुष्क , कोरडी ( नदी , विहीर , तलाव वगैरे ). ( कोरडा + टांक = बिंदु . कण ) ०डौल - पु . रिकामा दिमाख ; खोटा बडिवार मोठेपणा . ०दरमहा पगार मुशारा - पु . नक्त वेतन ( जेवणाशिवाय ) ०द्वेष पु. विनाकारण मत्सर . ०धंदा पु. आत वट्याचा , बिन नफ्याचा उद्योग . ०पाषाण - पु . १ कठिण ठणठणीत दगड . २ ( ल .) उपदेशाप्रमाणें आचरण न करणारा असा माणुस ; चांगल्या गोष्टीचा परिणाम न झालेला माणुस . म्ह० लोकां सांगे ब्रह्माज्ञान । आपण कोरडा पाषाण . ०ब्रह्माज्ञानी वि. भोंदू ; ढोंगी . स्वतःब्रह्माज्ञानाचा अनुभव नसलेला पण लोकांना त्याचा उपदेश करणारा मनुष्य . ०मान पु. पोकळ , रिकामा , काम न करतां मिळणारा . दिलेला मान ; कोरडा - आदर पहा . ०विचार पु. १ निष्फळ , निरर्थक , चौकशी शोध . २ निष्क्रिय बडबड , विचर . ०विश्वास पु. वरवरचा विश्वास . ०व्यवहार पु. १ कोरडा धंदा पहा . २ रिकाम्या , निष्कारण उद्योग . ०सत्कार पु. १ पोकळ वरवर सन्मान . २ गैरफायद्याचा मानमरातव . निरर्थक बहेजाव . ०सा वि. वाळल्याप्रमाणें ; शुष्कप्राय ०स्नेह पु. वरवरची प्रीति ; पोकळ मैत्री . कोरडेकष्ट ०श्रम पु. ( अव .) बिनाफायदा . निरर्थक श्रम ; व्यर्थ मेहनत . कोरड्या टांकाचा हिशेब - हिशोब - हिसाब - पु . ज्यांत यत्किंचितहिक फेरबदल . करण्यासाठी लेखणीचा टांक शाईत बुडविला गेला नाहीं असा स्वच्छ , शुद्ध , बिनचुक लिहिलेला जमाखर्च तत्का ; चोख हिशेब ( क्रि० देणे ; करणें ) कोरड्यास - ला , कोरडेशास - ला , कोरड्याशास - ला . क्रिवि . ( कोरडा - यांचे विमक्तिरुप ) भाकर इत्यादि कोरडी खाववत नाहीं म्हणुन त्याबरोबर घेण्याकरितां ( तूप , वरण वगैरे पातळ कालवण ); तोंडी घालण्यास ( गो .) कोरड्याक .- न . कालवण , तोंडीलावणें . ' आज कोरड्याशास काय केलें ? - कढी केली भाजी केली .' कोरडी - वि . शुष्क ; वाळलेली ; कोरडी पव्हा सामाशब्द .- ०आग स्त्री. भंयकर मोठी आग . याचे उलट ओली = अतिपृष्ठिनें होणारें नुकसान . म्ह० कोरडी आग पुरवते पण ओली आगपुरवत नाही .= पाठीवर मारलेलें चालतें पण उपासमान झालेली सोसवत नाहीं . ०ओंकारी स्त्री. १ घशांत बोटे घालुन मुद्दम काढलेली ओकारी . सकाळी तोंड धुतांना घशांतबोटें घालुन काढलेले खाकारे . ( क्रि० देणें ; काढणें .) २ ओकारी येतेसें वाटणें . ( क्रि० येणें ) पोटांत ढवळल्याप्रमाणें होऊन मळमळ सुटते आणि थुंकी पडते , हृद्याअंत पीडा होते , ओकारी येते परंतु अन्न पडत नाहीं . अशी वेळीं म्हणतात . - योर १ . २७७ . ०सवाशीण - स्त्री . जेवणाखेरीज ओटी भरून कुंकू लावून जिची बोळवण करतात अशी सवाशीण . ब्राह्मणेतरांच्या घरी अशी ब्राह्मण सवाशीण बोलावितात . ०किटाळ स्त्री. १ ( शब्दाश ;) कोरडी ठिआणगी . २ ( ल .) तोहमत ; आळ . ( क्रि० घालणें ; उठावणें ; घेणें ). ०किरकिर स्त्री. विनाकारण कटकट , तक्रार पिरपीर भुणभुण ; निष्कारण त्रास . ०खाकरी स्त्री कोरडी ओकारी पहा . ( क्रि० देणें , काढणें .) ( खाकरणें ) ०चाकरी स्त्री. १ वेतन . मजुरी घेतल्याशिवाय चाकरी ; निवेंतन सेवा . २ रोख पैसा घेऊन जैवण्याशिवाय चाकरी ; कोरडा दरमहा . ०जाभई जांभळी - स्त्री . श्रमामुळें आलेली ( झोंपेंमुळे नव्हे ) जांभई . ०दारु स्त्री. वाय . बाराची दारू ; वायबार . ०प्रतिष्ठा स्त्री. औपचारिक मानसन्मान . हातीं पैसा नसतां अगर अंगांत कर्तबगारी नसतांमिरवलेला डौल . कोरडा मान पहा . ०भिक्षा स्त्री. तांदुळ , गौं , वगैरे धान्याची भिक्षा ( शिजविलेलें अन्न , मधुकरी शिवाय ). ०ममता माया - स्त्री . विरकांती दाखविलेलें प्रेम ; लोकाचारास्तव दाखविलेला सभ्यतपणा . ०मेजवानी स्त्री. अन्नाशिवाय मेवामिठाइची आणि फळफळावळीची मेजवानी ; उपहार . ०मैत्री स्त्री. वरवरचें प्रेम ; अंत ; करणापासुन प्रेम नाहीं अशी मैत्री . - ड्या गाथा - स्त्री . अव . बनावट बातम्या ; भुमका ; कंड्या . ( कोरडी + गाथा ) कोरडें - वि . वाळकें ; निष्फळ ; शुष्क . कोरडा - डी पहा . सामाशब्द - कोरडें खाणे - आवश्यक वस्तुंचा अभाव भासणें ; आवश्यक म्हणिन इच्छिणें त्यामुळें त्रास होणें ( निषेधार्थी रचना ). ' मी काय त्यांवाचुन कोरडे खातों ' = तें नाहीं म्हनुन माझें नडतें कीं काय ? ०अंग - न . वांझपणा ; वांझ कूस . ०काम - न . १ विटाळशेपणी व पांचवें दिवशीं न्हाऊन शुद्ध होण्यापुर्वी करावयाचें काम . ' चौथ्या दिवशीं बायका कोरडें काम करतात .' २ वेळ घालविण्याकरितां केलेलें सटरफर काम . ०तुप न. श्रद्धाहीन , भक्तिहीन तपश्चर्या , आराधना . ' जळो जळो त्याचा प्रताप । काय चाटावें कोरडें तप जैसें विगतधवेचें स्वरुप । यौवन काय जाळावें । ' ०बोलणें भाषण - न . वरकांती , मनापासुन नव्हें असें भाषण . बडबड ; ०ब्रह्रज्ञान न. आचरण नसतां सांगितलेला वेदांत , परमार्थविद्या ; बकध्यान ; भोंदुपणा , ढोंग . ०वैर न. निराधार द्वेष , मत्सर . ०वैराग्य न. विषयाचा खरा तिटकारा आल्याखेरीज दाखविली जाणारी पोकळ विरक्ति ; साधुपणाचें ढोंग ; निवृत्तिमार्गाची घतावणी . ०सुख न. उपभोगाशिवाय सुख ; नांवाचा आनंद . कोरड्या अंगीं तिडका - १ गर्भ नसतां बाळंतपणाच्या वेदना भासविणें . २ ढोंग ; भोदुपणा .
|