Dictionaries | References उ उठविणें Script: Devanagari See also: उठवणें Meaning Related Words उठविणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . उठविणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v t Raise; fig. excite. Make to ache (the head). Arouse. उठविणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उ.क्रि. उठणें प्रयोजक .उचलणें ; वर करणें ; उच्च स्थितीला नेणें ; उंच करणें ; उभें करणें .जागृत करणें ; जागें करणें ; उठावयास लावणें . म्ह० निजलेल्याला कोणी उठवील , जाग्याला कोण उठवील ?चेतना देणें ; प्रवृत्त करणें ; क्षोभविणें ; उठावणी करणें .दुखावयास लावणें ( डोकें ).( कंडी ) पिकविणें ; जाहीर करणें ( बातमी , गोष्ट ).उत्पन्न करणें ; काढणें . जे उठवी शब्दांकुर । वदे वैखरी अपार । - दा १ . ३ . २ . विचार न करतां बांधा उठवून ... अडथळा आणूं नये . - स्वारीनियम ( बडोदें ) ४७ .पार पाडणें ; बजावणें . सूचना होतील त्याप्रमाणें नोकरी उठविण्याची आहे . - स्वारीनियम ( बडोदें ). २४ .चोरणें ; लांबविणें . चोरट्यांनीं स्वयंपाकाचीं दोन भांडीं उठविलीं . - विवि ८ . ११ . २०८ .रक्कम कर्ज काढणें ; उचल करणें ; खर्च करणें . [ सं . उत्थापन ; प्रा . उठ्ठवण ] घरांतून उठविणें - नादीं लावून पळविणें ह्या स्वतंत्र बायका केव्हां कोणच्या म्हातार्याला घरांतून उठवतील कांहीं नेम नाहीं . - बाय २ . १ . जन्मांतून उठविणें - आयुष्याचें मातेरें करणें ( जार कर्मामुळें ). माझ्या पोरीला अशी जन्मांतनं उठवलीन . - निचं १२५ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP