|
पु. पु. पु. साहाय्य ; मदत ; कुमक . आणि स्वामीसही परम असाध्य होऊन त्याचा उपराळा ताम्राकडून होणार । - मराआ [ सं . उपरि + आलुच ; हिं . उप्राला = मदत ; चित्पा . उपराळो ] दोहों बाजूंस सारखें ओझें करण्याकरितां जनावराच्या पाठीवरील एका बाजूस घातलेलें ( लांकडें इ० चें ) वजन . आरोप ; आळ ; खोटी सबब . वाजवीपेक्षां अधिक सामग्री , संग्रह ( माल , द्रव्य वगैरेचा ); राखून ठेवलेला जिन्नस ; खर्च भागवून उरलेला माल , द्रव्य , पदार्थ इत्यादि ; जरुर लागल्यास उपयोग करतां येईल अशी तरतूद ( दारुगोळा , सैन्य इ० ). कुरापत ; आगळिक ; निमित्त ( कज्जा , युद्ध इ० स ). आम्ही केल्या नियमास टळलों नाहीं , परंतु तुमचेकडून उपराळा झाला तेव्हां अम्हाला उठणें प्राप्त . ठराविक वजनापेक्षां अधिक असलेला माल . ( गो . ) तक्रार . ०घेवप नांव ठेवणें , आळ घेणें . [ उपर + आळ ] वर्चस्व ; वरचढपणा ( वादांत , भांडणांत ). विकत घेतलेल्या मालावर ठरलेल्या वजनापेक्षां थोडा अधिक मिळणारा माल ( गुळाची ढेप , लांकडाचा गठ्ठा इ० चे तोललेल्या वजनापेक्षां ओझ्यांत अधिक वजन भरतें तें वाणी कांहीं न आकारतां देतात ). जनावराच्या ओझ्यावर टाकलेले किरकोळ जिन्नस ( काटक्या इ० ); किरकोळ भरती . भरपाई ; वजावाट ; मोबदला . ( क्रि . करणें ) कच्च्या गड्यास कांहीं टोल्यांचा किंवा वद्यांचा उपराळा द्यावा . कुबडी चेंडू -( बडोदें ) १७ . ( इं . ) हॅंडीकॅप . एखादा जिन्नस वजन करतांना दुसर्या पारड्यांत घातलेलें वजन , दडपण . ( ल . ) आटापीट ; खटाटोप . ब्रह्मसूत्राची भार - दोरी गळां । मंत्रोपदेश भिक्षेचा सोहळा । लेहण्यावाचण्याचा उपराळा । पोट भरावयाकारणें ॥ - स्वादि ३ . ३ . १० . [ चि . उपराळो = प्रत्युपकार ] [ सं . उपरि + आलुच ; हिं . उप्राल = वर , अधिक ]
|